शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी विकास पॅनल कटिबद्ध; आमदार श्यामसुंदर शिंदे

 

शेकाप- काँग्रेस युतीच्या शेतकरी विकास पॅनलचे पारडे जड!

बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी होणार मतदान

 

कंधार; प्रतिनिधी

कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून बाजार समिती निवडणुकीत शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकरी कामगार पक्ष व काँग्रेस पुरस्कृत युतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या बाजूने तालुक्यातील मतदार ठामपणे उभा असल्याचे चित्र सध्या दिसून येत असून शेकाप काँग्रेस पुरस्कृत युतीच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा मतदारांसमोर जाहीर केला आहे.

 

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 जागा आहेत, यात सेवा सहकारी संस्था मतदारसंघ 11 जागा,( सर्वसाधारण 07, महिला 02, इतर मागास 01, भटक्या विमुक्त जाती जमाती 01, ग्रामपंचायत मतदारसंघ 04 जागा, सर्वसाधारण 02, अनुसूचित जाती जमाती 01, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 01,) व्यापारी मतदारसंघ 02 जागा, व हमाल व मापारी मतदारसंघ 01 जागा अशा 18 जागांचा समावेश आहे .बाजार समिती निवडणुकीची एकूण मतदार संख्या 2 हजार 604 एवढी असून यात सेवा सहकारी संस्थेचे 936 ,व्यापारी 450, हमाल 205, ग्रामपंचायतीचे 993 मतदार आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणुका असल्याने कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीला महत्त्व प्राप्त झाले आहे. शेकाप काँग्रेस पुरस्कृत युती कडून कंधार बाजार समितीच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकासाचा व व्यापारी, हमाल, मापारी यांच्या सर्वांगीण विकासाचा जाहीरनामा शेतकरी विकास पॅनल कडून मतदारांसमोर जाहीर केला असून लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताईं शिंदे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर, काँग्रेस तालुका अध्यक्ष बालाजीराव पांडागळे, मा.जि.प.सदस्य चंद्रसेन पाटील,लोहा तालुका अध्यक्ष शरद पवार, शाहुजी पाटील नळगे,शेकाप जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर, ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे,स्वप्नील पाटील लुंगारे,रामराव पवार,मोहम्मद हमीद सुलेमान,उपसभापती श्याम अण्णा पवार,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरू भाई, शेकाप कंधार तालुका अध्यक्ष अवधूत पेठकर, सह शेतकरी कामगार पक्ष काँग्रेस युतीचे शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे .आमदार श्यामसुंदर शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी व युतीतील काँग्रेस व शेकाप पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्त्यानी कंधार तालुक्यातील सर्कल निहाय सर्व गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन मतदारांशी संवाद साधला आहे, शेतकरी हा केंद्रबिंदू मानून बाजार समितीची निवडणूक शेतकरी कामगार पक्ष,काँग्रेस युतीच्या शेतकरी विकास पॅनल कडून लढवल्या जात असून शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मतदारराजा शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस युतीच्या शेतकरी विकास पॅनलच्या सर्व 18 उमेदवारांना बहुमताने विजयी करतील असा विश्वास यावेळी लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, शेकापाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *