काल एकांकिका स्पर्धा पहायला गेले होते.. खुप वेगळे विषय पहायला मिळाले .. खुप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या..आकार नावाची एकांकिका होती ज्याचा विषय होता की आई वडील दोघेही शिक्षक त्यांना ३ मुलं त्यातील मोठ्या मुलाला गणित विषयात फार रुची नसते किवा त्याच्या डोक्यात काही शिरत नसतं .. इतर दोन मुलांचं गणित चांगलं आणि वडील गणितचे शिक्षक त्यामुळे त्यांच्या मुलाने गणितात चांगले मार्क मिळवावे अशी त्यांची अपेक्षा पण त्यांची मुलगी तेच गणित घरातील जात्याचा गोल आकार.. त्याचा केंद्रबिंदु त्याचा परीघ किवा पताक्याचा त्रिकोणीआकार यावरुन त्याला गणित शिकवते आणि ते त्याला समजतं त्यामुळे तो खुश होतो त्यातुन त्यांनी पारंपरिक वस्तु नाही महत्व दिलय.. जेव्हा वडील तुळशीला प्रदक्षीणा घालतात तेव्हा तोच मुलगा परीघ मोजतो .. संस्कृत श्लोक असतील किवा भाषेतील शुध्दता असेल सगळच सुंदर होतं.. मग ती मुलगी वडीलांना म्हणते तुमची शिकवण्याची पध्दत बदला अशा आशयाची ती सुंदर एकांकिका होती.. आज उद्या दिवसभर यशवंतराव नाट्यगृह कोथरूड येथे दिवसभर एकांकिका आहेत.. मुलांना घेउन जरुर पहा.. निरीक्षणातुन खुप गोष्टी शिकता येतात..
ती एकांकिका पहात असताना मी माझ्या बालपणात गेले कारण गणित माझाही नावडीचा विषय.. जेमतेम काठावर पास आणि भाषा किवा सायन्स यात मात्र पैकीच्या पैकी.. मला गणिताचे शिक्षकही आवडायचे नाहीत कारण त्यांची शिकवण्याची पध्दत आवडत नसे पण इंग्रजी ,मराठी शिक्षकांवर प्रचंड प्रेम.. लहानपणी पहिला नंबर सोडला नाही आणि निबंध वक्तृत्व यात कायम बक्षीसे मिळायची पण माझ्या आई वडीलांनी मला गणितावरुन कधीही काहीही ऐकवलं नाही किवा त्यावाचुन माझं कधीही काहीही अडलही नाही.. आजही माझ्या कामात ज्याचा उपयोग होतो तो भाषा आणि वक्तृत्व ..
यातुन मला हे सांगायचय की आपल्या आवडी मुलांवर लादु नका त्यांना ज्यात रस आहे त्यात त्यांना पुढे जाऊ द्या..
मी डॉक्टर झालो नाही म्हणुन तु हो किवा माझी डांस ची आवड होती म्हणून तु शिक यापेक्षा तुला काय करायचय याने मुलं चांगली शिकतात आणि कर्तृत्ववान होतात.. माझ्या घरातील माझ्या मुलीचं उदाहरण आहे.. आणि विशेष म्हणजे ज्याच्याकडे ज्या कला आहेत त्यांनी त्या जरूर जोपासा ..
यावरुन पुल देशपांडे यांचं एक वाक्य आठवलं..नोकरी किवा धंदा तुम्हाला जगायला कामी येइल पण एखादी कला तुम्ही का जगावं हे शिकवेल..
पुण्यात भरपुर एकांकिका , राज्यनाट्य स्पर्धा असतात .. अनेक वेगवेगळे कार्यक्रम असतात.. चांगले गाण्याचे कार्यक्रम असतात.. आध्यात्मिक कार्यक्रम असतात.. भरपुर वाचनालय आहेत.. काय करु , नैराश्य आलय .. कोणाशी बोलु असे प्रश्न आयुष्यात पडायला नकोत इतक्या असंखय गोष्टी करायला आहेत.. फक्त घरातुन बाहेर पडा आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहुन मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आयुष्याला हवा तो आकार द्या.. अगदी व्यायामाने सुध्दा शरीराला हवा तो आकार देता येइल त्यासाठी पुण्यात अनेक टेकड्या आहेत..
इच्छा तिथे मार्ग नाहीतर आहेच बीपी शुगर..
choice is yours.. हरे कृष्ण
सोनल गोडबोले.. लेखिका