मन्याड खोर्यांतील कोहिनूर ; पेंटर सावळाराम कुरुडे…!वासुदेवाची वेशभुषा …भाग -१

कंधारच्या गणेशोत्सवाची रंगत कलावंत पेंटर कुरुडे यांनी विविध वेशभुषांनी वाढवली..

=============================

राष्ट्रकुट घराण्याचे वैभव लाभलेल्या कंधार शहराला कला,संस्कृतिक,राजकिय,शैक्षणिक,सामाजिक अशा अनेक क्षेत्रात कंधार अवघ्या महाराष्ट्रात सुपरीचीत आहे.पण कंधार म्हणटले आठवते.दोन भाईंची जोडी म्हणजे राजकिय,सामाजिक,शैक्षणिक, क्षेत्रात खांद्याला खांदा लावून चळवळीच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा लढा, हैद्राबाद मुक्ती संग्रामाचा लढा, मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा लढा,आणीबाणी विरुध्दचा लढा, मन्याड धरणाचा लढा असो का प्रतापगडाच्या नेहरुजींना निषेधाचे काळे झेंडे दाखवण्या मातोश्री मुक्ताई धोंडगे यांच्या नेतृत्वाचा  लढा असो या लढ्यातून लढवय्य क्रांतिनगरी  बहाद्दरपुरा ता.कंधार जि.नांदेडची ओळख देशपातळी सहित संपुर्ण महाराष्ट्राला आहे.

अनेक चळवळींचे केंद्र म्हणजे”क्रांतिभुवन बहाद्दरपुरा”हे नगर आहे क्रांतिचे.   देशात सत्याग्रहाची सुरुवात महात्माजी गांधी यांनी केली,तर शे पाचशेच्या वरतीचे अनोखे सत्याग्रह काढून न्याय मिळवून घेतला.मला वाटते देशपातळीवर क्रांतिनगरी बहाद्दपुराचे भुमीपुत्र डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांनी साकारले.त्यांना माजी आमदार भाई गुरुनाथरावजी कुरुडे, पहिले सरपंच बहाद्बदरपुरा जरंगलाल चौधरी,भाई राजेश्वरराव आंबटवाड,भाई बापुरावजी वाडीकर,भाई संभाजी पा.पेठकर,भाई शंकरराव कुरुडे काका,भाई पंढरीनाथराव कुरुडे,भाई विठ्ठलराव पा.पेठकर,भाई केरबाजी पा.पेठकर,भाई रामराव पा.पेठकर,कृषीरत्न भाई राघोबाजी पा.पेठकर, आदीसह सर्व समाज बांधवांची साथ मिळाली.लोकसभेचा खासदार,आमदार,लोकलेखा समिती सभापती,कंधार पंचायत समिती सभापती,नगराध्यक्ष,या सारखे पदावर बहाद्दरपुरी मातीतला वाघ विराजमान झाला.

या मातीत जन्मलेला कुरुडे घराण्यातला कलावंत म्हणजे कंधार पंचक्रोशीत गाजलेले पेंटर सावळाराम जळबाजी कुरुडे या अस्सल कलावंताने संगणकाचे मोबाईल युग येण्या आधी आपल्या कलेचा ठसा आपल्या कलेने व गणेशोत्सवात वेशभुषा करुन उमटविला. गणेशोत्स हा मराठवाडा पातळीवर नावारुपास आहे.या गणेशोत्सवात आमच्या लहान पणापासुनच मुनिम संघ गणेश मंडळ,महाराष्ट्र गणेश मंडळ,लाल बहाद्दुर शास्त्री गणेश मंडळ,एस.टी.महासंघ गणेश मंडळ,नळगे गल्ली गणेश मंडळ,अजाद हिंद गणेश मंडळ,सिता नगर गणेश मंडळ,आर्यवैश्य गणेश मंडळ,जय भवानी युवा गणेश मंडळा सहित अनेक गणेश मंडळाच्या माध्यमातून गणेशांची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

अनेक मनोरंजनाचे कार्यक्रम दहा दिवस मोठ्या प्रमाणावर चालत असत.पण शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या कलेतून सर्व गणेशभक्तांना 80 व 90 च्या दशकात दरवर्षी विविध सोंगे करुन गणेशोत्सवाची रंगत वाढविणारा कलावंत म्हणजे पेंटर सावळाराम जळबाजी कुरुडे हा अवलियाचे गाव आणि आजोळ क्रांतिभुवन बहाद्दरपुरा असल्यामुळे लहानपणा पासुन मामाच्या घरी म्हणजे कोंडिबाजी एमेकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव सोन्याचांदीचे व्यापारी आमचे एमेकर परिवार बहाद्दरपुरा आजुळ आहे. कै.रुक्माजीराव कोंडीबा एमेकर,कै.गोविंदराव एमेकर.कै.पुंडलिकराव एमेकर यांच्या घरी आई पार्वतीबाई जळबाजी कुरुडे अन् बहिन चंपाबाई यांच्या सोबत बाल्यावस्थे पासून राहत.त्यांच्या धर्मपत्नी सौ.सुलोचना सावळाराम कुरुडे या माऊलीचे तोलामोलाचे सहकार्य लाभले.म्हणतात ना यशस्वी पुरुषा मागे,हातभार नारी शक्तीचा असतो. 

त्यांना ३ कन्यारत्न सौ.प्रमोदिनी बालाजीराव गरुडकर देगलूर वडिल कन्या,तर मदवी कन्या सौ.अपेक्षा संजयजी झंम्पलकर नांदेड अन् छोटी कन्या सौ.लक्ष्मी विनोद पारेकर डिघोळ देविचे सोनपेठ जि.परभणी.कुरदीपक विवेकानंद सावळारामजी कुरुडे हे पुत्ररत्न लाभले.त्यांचा उदरनिर्वाहचे साधन त्यांनी आपल्या कलेला केले.त्यांना जनता हायस्कूल कौठा या ज्ञानालयात कलाध्यापक म्हणुन सेवेची संधी मिळाली होती पण…मामाचे घर पुर्वी सधन असल्यामुळे त्यांना ती सेवा करण्यास संमती मिळाली नाही.बालपण बहाद्दरपुरी गेल्यामुळे मामानी त्यांना जागा देवून येथेच स्थाईक केले.माझी आत्या माझ्यावर जिवापाड प्रेम करायची व मला लाडाने “दासू” या टोपण नावाने हाका मारत.त्यांच्या व त्यांचे चिरंजीव पेंटर सावळारामजी यांचे मुळे आमच्या हालाखीच्या परिस्थितीत मदत झाली.आजी-आजोबा सौ.अनसुयाबाई व कोंडीबाजी यांचा स्नेह या कुरुडे परिवारास मिळाला चे पेंटींगचे कलादालन कंधार शहरात गेली पंन्नास वर्षा पासून आहे.

यांच्या कला दालनात 89/90 ईसवी सनात नुकतेच काॅलेज जीवनाच्या सुरुवातीस त्यांच्या कडे प्रशिक्षण घेण्याचा योग आला.जवळपास सहा महीने ते एक वर्ष ट्रेनिंग केली असेल मी त्यांना कलेच्या गुरुठायी मानतो. माझे जेवढे वय तेव्हढी त्यांची कलेची साधना आहे.या कलाप्रेमी कलावंत अवलियांच्या कलेचे दर्शन घेणारे आजही त्या कलेची साक्ष देतात.त्यांचे सहकारी छायाचित्रकार चंद्रकांत फुके,विधीज्ञ गंगाधर बनसोडे,गुलाबराव काका नळगे,आझाद हिंद गणेश मंडळाचे कोंडीबाजी बनसोडे, गणेशराव अमिलकंठवार सावकार,श्रीधरराव धोंडगे गुरुजी,संतोष मुखेडकर,अभियंता वारद साहेब,उमेश पाठक,सखाराम नवघरे,अनिल कुर्हाडे,बबन शेंडगे अशा सवंगड्यासह वेशभुषा साकारत असत.त्या वेशभुषांचे छायाचित्र चंद्रकात फुके हे आपल्या कॅमेर्याने टिपत असत.

या सर्व सहकार्यांच्या मदतीने त्यांनी गणेशोत्सवाची रंगत आपल्या वेशभुषेच्या कलेतून वाढवली. अशा कलेच्या  माध्यमातून कंधारकरांची सेवा कलेच्या माध्यमातून केली आहे.त्यांनी आज पर्यंत 80 व 90च्या दशकात तब्बल 20/25 वर्ष अनंत चतुर्दशी दिनी कलेतून गणराया निरोप देत असत.एका रस्ते अपघातात व दिग्रस येथील कृष्ण मःदिर अपघातात त्यांना गंभीर अघात झाला पण आपल्या जिद्दीच्या जोरावर त्यांनी मात करुन वयाच्या सत्तर-पंचाहत्तरीतही आपल्या कलेची साधना करत आपली उपजिवीका अव्याहत पणे चालवुन जीवन जगतात.आज पर्यंत कोणताही पुरस्कार मिळाला नाही किंवा शासन स्तरावरची  मदत त्यांना मिळाली नाही.हे खेदाने नमुद करावे लागत आहे.त्यांनी गणेशोत्सवाच्या कालखंडा आदिवासी नागा लोकांचा पेहराव,वासुदेव, मनकवडा,गोंधळी सहीत बाराबलुतेदार बनतांना सोबत बहाद्दरपुचे कलावंत अॅड.प्रकाश डोम्पले सर हे संबळ व तुणतुणे वादक म्हणुन सहकार्य केले.पोतराज,रामप्रभु,महाराज अशा कितीतरी वेषभुषा करुन गणेशोत्सवाची रंगत वाढवत असत.मला कांही दिवसापुर्वी सहज त्यांच्या वेषभुषेच्या फोटो पाहता आल्या.

करोना काळातील गणेत्सवात ही पोस्ट करावी वाटली पण….त्या फोटो मला उपलब्द झाल्या नाहीत.क्रमशः

dattatrya yemekar
dattatrya yemekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *