प्रतिनिधी,
कैलास शेटवाड,
पेठवडज गावातील दि 7. सप्टेंबर 2023 रोजी पासून उपोषणनास बसलेल्या नामदेव डावकोरे (ग्रा.पं सदस्य)व श्री.संभाजीराव गोंधळे यांना आजच्या 6 व्या दिवशी सर्व समाज बांधवांनी या ठिकाणी समाजाला गोंधळे व डावकोरे यांची प्रकृती बिघडलेली असता त्यांना संबंधिताचे तक्रारी नुसार व संबंधित अधिकारी यांचे आदेशानुसार मौजे. प्राथमिक आरोग्य केंद्र पेठवडज यांनी संबंधितांकडून सूचना दिल्या असता संबंधितांकडून त्या ठिकाणाहून त्यांनी त्यांची प्रकृतीची बिघडलेली काळजी घेतली आहे.
तसेच त्याप्रमाणे त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे.व प्राथमिक आरोग्य केंद्र व तसेच सर्व पोलीस अधिकारी व बीट जमादार व कर्मचारी बांधवांचे सहकार्य लाभलेले आहे व त्यांचे कर्मचारी रात्रभर संरक्षण करीत आहेत व उपोषणकर्त्यांना संरक्षण म्हणून व तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र पेठवडज येथील कर्मचारी औषधोपचार, वेळोवेळी वरिष्ठांच्या सूचनेनुसार व पोलीस विभागाच्या संबंधित अधिकाऱ्याच्या सूचनेनुसार व संबंधित गाव उपोषणकर्त्यांच्या आयोजका नुसार ॲम्बुलन्स येऊन त्यांची प्रकृती तपासणी केली जात आहे
यावेळी श्री.संभाजीराव उर्फ (पप्पू) शिवाजीराव दामले, (ग्रा.सदस्या.प्रतिनिधी पेटवडज) व सकल कुणबी मराठा आरक्षणाबद्दल गेली सात दिवस झाले असता यांचे संबंधित दोन्हीही उपोषण/उपोषणकर्त्याकडे लक्ष आहे.तसेच मा.श्री.पांडुरंग व्यंकटरावजी कंधारे यांचे पण गेली सात दिवस परिश्रम झाले असून सर्वांची काळजीपूर्वक लक्ष कारण नियोजन केले आहे.
यावेळी मा.श्री.बळीराम पा.पवार, श्री.ज्ञानेश्वर चोडे.(कृषी उत्पन्न बाजार संचालक कंधार),व श्री.रमाकांत जोगदंड . श्री.नितीन रावजी बोकाटे (अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, कंधार ), श्री.व्यंकट पांढरे (नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक सहकारी चेअरमन पेटवडज ),यांचा जाहीर पाठिंबा असल्याचे मा. श्री.संभाजी उर्फ पप्पू पाटील दामले (ग्रा पं.सदस्या प्रतिनिधी पेटवडज ) यांचे वतीने आजच्या दिनांक 12. 9.2023 रोजी च्या जनतेला व नागरिकांना व सर्व समाज बांधवांना व उपोषणकर्त्यांना आजचा सहावा दिवस म्हणून सर्वांची मा.श्री श्री.संभाजीराव उर्फ पप्पू दामले (ग्रामपंचायत सदस्य पेठवडज) सदस्या त्यांनी सर्वांचे स्वागत केले
तसेच यावेळी श्री.धनराज बाजीराव लुंगारे तसेच मा.श्री. कैलास पाटील बुढे व तसेच मा.श्री.मनोहर पाटील कदम( सरपंच सिरसी) तसेच मा. श्री.कैलास शेटवाड (माजी सरपंच पेटवडज) तसेच अशोक पाटील मादळीकर व तसेच ज्ञानेश्वर दामले व तसेच सर्व सकल मराठा जनसमुदाय तसेच सर्व गावातील नागरिक आदींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य केलेले आहे…