कंधार ; आज दि.१४ सप्टेंबर २०२३ रोजी बैलपोळा सणाच्या निमित्ताने फलक लेखनातून सदिच्छा श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार संस्थेतील
मातृशाळा संस्थापक व संचालक मुक्ताईसुत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब व त्यांच्या सहकारी मित्रांनी सत्तर वर्षापूर्वी म्हणजे १५ जुन १९५३ साली श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव माणिकराव काळे रोड
कंधार या ज्ञानालयातील इयत्ता आठवा “ब”सेमि वर्गातील चिमुकली कु.कांचन ज्ञानोबा मुंडे हीने आभ्यासा बरोबरच या शालेय विद्यार्थी जीवनात फलक लेखन कौशल्य आत्मसात करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
श्री शिवाजी हायस्कूल कंधारचे मुख्याध्यापक सदाशिव आंबटवाड सर, उपमुख्याध्यापक अनिल जाधव सर, पर्यवेक्षक आनंद भोसले सर, रमाकांत बडे सर,वैभव कुरुडे सर,गणित विषय तज्ज्ञ कानिंदे मॅडम,संगीत तज्ज्ञ गोविंद अन्नकाडे सर, एमेकर गुरुजी यांनी कौतुक केले.पहिल्यांदाच प्रयत्न केलेल्या या चिमुकलीच्या फलक लेखनास लक्ष-लक्ष सदिच्छा व मानाची कोटी-कोटी जयकांति!