नांदेड ; जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे सेवानिवृत्ती उपदान व अंशराशीकरणाच्या रकमा व सातव्या वेतन आयोगाचे थकबाकीच्या तिसऱ्या चौथ्या हप्त्याच्या रकमा तात्काळ मिळण्यासंबंधी सर्व सेवानिवृत्तांची बैठक जि प प्रा शा पोलीस कॉलनी श्रीनगर नांदेड येथे संपन्न झाली.
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी सुधीर गोडघासे यांचे अध्यक्षतेखाली व राज्य संघटक तथा महाराष्ट्राचे केंद्रप्रमुख संघाचे राज्य उपाध्यक्ष बालाजी डफडे लातूर जिल्हाध्यक्ष बालासाहेब शिंदे , नांदेड जिल्हाध्यक्ष विनायकराव दासरे ,भोकर तालुका सेवानिवृत्त संघटनेच्या अध्यक्षा तथा नगरसेविका विजया घिसेवाड, ज्येष्ठ शिक्षक नेते एकनाथराव कल्याणकर, प्रकाश पाटील मुंगल* , *मदन नायके इ .च्या *प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.*
*बैठकीत माहे सप्टेंबर 2022 ते* *ऑगस्ट 2023 पर्यंत सेवानिवृत्त झालेल्या सेवानिवृत्तांचे सेवानिवृत्ती उपदान व अंशराशीकरणाच्या पूर्ण 100% टक्के रक्कमा तात्काळ येत्या पंधरा* *दिवसापर्यंत संबंधिताच्या बँक खात्यात जमा करण्यात याव्यात. सातव्या वेतन आयोगाचे थकीत तिसऱ्या* व *चौथ्या हप्त्याची रक्कम व्याजासह देण्यात यावी या मागण्याबाबत बैठकीत एक मताने मागणी करण्यात आली.
तसेच पदोन्नत मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख शिक्षण िस्तार अधिकारी इ.ना पदोन्नतीची वेतनवाढ देण्यात यावी.
केंद्रप्रमुखांना कायम प्रवास भत्ता पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करण्यात यावा. संचित अर्जित रजेचे रोखीकरण ,निवड श्रेणी इ. मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून घेण्यासाठी न्यायालयीन लढा धरणे, उपोषणे इ. लोकशाही मार्गाने लढा देण्याचे ठरले.
येत्या पंधरा दिवसापर्यंत सेवानिवृत्तांचे उपदान व अंशराशीकरणा रकमा संबंधी त्याच्या बँक खात्यात जमा करण्यात न आल्यास येत्या 2 ऑक्टोबर 2023 रोजी मा. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा सर्वानुमते बैठकीत निर्धार करण्यात आला.
यावेळी संघटनेचे जिल्हा कार्यकारणी निवडण्यात आली. जिल्हाध्यक्षपदी -सौ. विजया घिसेवाड, जिल्हा उपाध्यक्ष- रमेश गोवंदे कार्याध्यक्ष -एमपी शेख कोषाध्यक्ष- व्ही के लोखंडे, सहसचिव- शेख फजलुल, एस एस यनवळ., एस एस गडमवार, श्रीमती आर सी चोथवे, जी एस चिद्रावार ई ची निवड करण्यात आली. नूतन जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकारी यांचा बैठकीत सत्कार करण्यात आला.
जिल्हाध्यक्ष निवड बद्दल सौ विजया घिसेवाड यांनी त्यांच्या निवडीबद्दल सेवानिवृत्तांच्या अडीअडचणी सोडविण्यासंबंधी न्याय मिळवून देण्याचे आश्वासित केले .
तसेच या बैठकीत सेवानिवृत्त केंद्रप्रमुख यांची जिल्हास्तरीय समन्वय समितीत मदनराव नायके ,शेख रियाजोदिन, टी एन कंधारे, टी पी पाटील,व्ही बी कुरुडे, जी बी कल्याणकर ,श्री उईके सर इ. ची निवड करण्यात आली.
बैठकीस उपस्थित सेवानिवृत्तांना जेष्ठ शिक्षक नेते एकनाथराव कल्याणकर, बालाजीराव डफडे ,शेख रियाजोद्दीन, बालासाहेब शिंदे ,बी वाय पवार, जीवनराव शेवाळकर इ.नी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपातून सुधीर गोडघासे यांनी सेवानिवृत्तांना आपल्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे लढा देण्याचे आवाहन केले.
बैठकीस वाय टी कदम, जी एम बागल, जीवन शेवाळकर ,टी एन कंधारे ,एन एस भालेराव, वाय बी पवार ,एन व्ही वंगावार , श्रीमती आ सी चोथवे ,एन ए पठाण, एस एस गडमवार इ. बहुसंख्येने सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख ,शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते.
आभार प्रदर्शन सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी व्यंकट लोखंडे यांनी मानले.