खेळाडूंनी खिलाडूवृत्ती सोडू नये-प्रा.डाॅ. पंढरीनाथ थोटे

मुखेड -संस्थेत प्रत्येकांनी प्रामाणिक काम केल्यास संस्था व विद्यापीठ निश्चितच न्याय देते. ग्रामीण भागात खरोखरच सर्व क्षेत्रात गुणवत्ता पाहावयास मिळते.राठोड बंधूंनी या दुर्गम भागात केलेले काम कौतुकास्पद आहे. या महाविद्यालयाने क्रीडा स्पर्धेत वेळोवेळी यश संपादन केले आहे तसेच महाविद्यालयाने अ दर्जा प्राप्त करणे सोपी गोष्ट नाही ते ही प्राप्त केले आहे .खेळाडू हे ताकदवान असतात. खेळामुळे वैयक्तिक जीवनात व महाविद्यालय जीवनात शिस्त निर्माण होते.क्रीडा मैदानावर कुठलाच भेदभाव नसतो.

 

 

खेळाडूंनी यश अपयश पचवायला शिकले पाहिजे. प्रत्येक खेळाडूने खिलाडूवृत्ती सोडू नये असे प्रतिपादन लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथील सेवानिवृत्त क्रीडा संचालक प्रा.डाॅ. पंढरीनाथ थोटे यांनी स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड व ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित वसंतनगर येथे हॉलीबॉल स्पर्धा मुले -मुली उद्घाटन प्रसंगी उद्घाटकीय वक्तव्य करताना केले.

 

 

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ब विभागाचे सचिव तथा स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर ताजबंद ता. अहमदपूर येथील क्रीडा संचालक प्रा.डाॅ. भास्कर माने म्हणाले की ग्रामीण भागात शहरी विभागापेक्षा गुणवत्ता अधिक असते. हे या महाविद्यालयाने सिद्ध केले आहे. आजचे विद्यार्थी खेळात व अन्य उपक्रमात सहभाग न नोंदवता मोबाईल मध्ये गुंतले जात आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याने चांगले खेळाडू बरोबरच चांगले माणूस बनन्याचा प्रयत्न करावा.शिक्षण हे पवित्र क्षेत्र आहे.तुम्हाला खेळामुळे पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. या संधीचे सोने करा.

 

 

अध्यक्षीय समारोप करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास राठोड म्हणाले की आमचा बीभीषण राठोड नावाचा खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळतो आहे.महाविद्यालयातील क्रीडा विभाग अगदी सक्षमपणे काम करीत आहे. विद्यार्थ्यांनो तुम्हाला पाहूनच आम्हाला उत्साह मिळतो. घरात, समाजात,महाविद्यालयात खिलाडूवृत्ती ठेवा.

 

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तावीक क्रीडा संचालक प्रा.डाॅ. सुभाष देठे यांनी करून महाविद्यालयाचा क्रीडा विभागाचा यशाचा आलेख सर्वांसमोर मांडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रा.डाॅ.व्यंकट चव्हाण व प्रा.डाॅ.रामकृष्ण बदने यांनी केले.

 

स्पर्धेत प्रथम पारितोषिक संभाजी केंद्रे महाविद्यालय,जळकोट, द्वितीय पारितोषिक ग्रामीण (कला, वाणिज्य व विज्ञान) महाविद्यालय वसंतनगर ता. मुखेड तर तृतीय पारितोषिक महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर यांनी पटकाविले. तर शिवाजी महाविद्यालय, उदगीर येथील मुलींच्या संघाने सहभाग नोंदवला.

 

यावेळी संस्थेचे सदस्य मुख्या. गोविंद पवार, प्राचार्य दिलीप गायकवाड, उपप्राचार्य बालाजी मेघाजी उपस्थित होते.
पंच म्हणून विक्रम पाटील,निरज कुमार उपलेंचवार,प्रा.निहालखान, प्रा.डाॅ. तात्याराव केंद्रे, प्रा.आर.एफ. पवार,रफिक शेख,लिंबराज बीडवे, प्रा.डाॅ. सतीश मुंडे,प्रा.बाबु गंदपवाड, प्रा.डाॅ. आर.डी. मुंडे, बावनगावे शुभम यांनी काम पाहिले.

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.डाॅ.सूभाष देठे,प्रा.डाॅ.शंकरय्या कळिमठ,प्रा.संजय पाटील,प्रा.डाॅ.सखाराम गोरे,प्रा.डाॅ.महेश पेंटेवार सर्व प्राध्यापक, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. खेळाचा आनंद वसंतनगर संकुलातील सर्व विद्यार्थ्यांनी घेतला.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *