मुखेड ; प्रतिनिधी
मुखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक-२०२३ प्रचारारार्थ आज येवती (लघु आळंदी) ता.मुखेड जि.नांदेड येथे नारळ फोडून सुरुवात करण्यात आली.
आज पार पडलेल्या प्रचाराच्या शुभारंभप्रसंगी माझ्यासह परमपूज्य प.पु. श्री नराश्याम महाराज, मा.श्री संतुकराव हंबर्डे भाजपा जिल्हाध्यक्ष,नांदेड, आ.राम पाटील रातोळीकरजी, आ.डॉ.तुषार राठोड साहेब, मा. प्रविण पाटील चिखलीकर, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर,खुशालराव पाटील उमरदरीकर, डॉ.माधवराव पाटील उच्चेकर, व्यंकटराव पाटील चांडोळकर, लक्ष्मण पाटील खैरकेकर, बालाजी पाटील आंबुलगेकर, डॉ.वीरभद्र हिमगिरे, डॉ.व्यंकटराव सुभेदार,गौतम काळे आर.पी.आय. जिल्हाध्यक्ष, डॉ.उमेश पाटील, सौ. अनितालाई चोंडीकर, हनुमंत नरोटे, बालाजी पाटील सकणूरकर,राजू घोडके, व्यंकटराव लोहबंदे,व्यंकट्टराव जाधव वसूर, संग्राम अप्पा माळगे, जीवनराव नाईक,व्यंकटराव नाईक, दत्ता पाटील बेटमोगरेकर, आदी प्रमुख मान्यवर यांच्यासह सर्व उमेदवार, सहकारी सेवा सोसायटी संचालक, ग्रामपंचायत सदस्य आणि महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने व प्रामुख्याने उपस्थित होते. मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पारदर्शक कामकाजासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना बहुमताने निवडून देण्याचे आवाहन यावेळी उपस्थितांना केले.
महायुतीमधील सर्वच पक्षांनी एकजूट होऊन कृषी उत्पन्न बाजार समितीत सत्ता आणण्यासाठी कामाला लागण्याचा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला.