नांदेड ; प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना यांची मासिक बैठक मालती हॉल चिखलवाडी नांदेड येथे जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष श्रीमती विजयाताई घिसेवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
बैठकीस श्री सुधीर गोडघासे राज्य उपाध्यक्ष बालाजी डफडे जेष्ठ शिक्षक नेते तथा राज्य संघटक व्यंकटराव माकणे तालुकाध्यक्ष मुखेड तथा माजी गटशिक्षणाधिकारी व पं. स .मुखेड, श्री प्रल्हादराव कदम माजी गटशिक्षणाधिकारी पं. स.उमरी श्रीमती निलावती ताई निलावाड मा. शिक्षण विस्तार आधिकारी इ ची प्रमुख उपस्थिती होती.
सर्व प्रथम मान्यवरांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .
शिक्षण क्षेत्रात यशस्वीरित्या प्रदीर्घ सेवा बजावलेले सेवानिवृत्त केंद्रप्रमुख उल्हास चव्हाण, सेवानिवृत्त शिक्षक तथा ज्येष्ठ शिक्षक नेते भागवत पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा ज्येष्ठ शिक्षक नेते सागर शिंदे, सेवानिवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी श्री शेख एम पी सेवानिवृत्त शिक्षक श्री अखिल अहेमद पठाण, सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक गुलाबराव घोडके, सेवानिवृत्त पदोन्नत मुख्याध्यापक तथा समता शिक्षक पतपेढीचे माजी चेअरमन श्री खुशालराव कागणे ,इ.चा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला .
महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी श्रीमती विजयाताई घिसेवाड, जिल्हा सरचिटणीस पदी जेष्ठ शिक्षक नेते समता शिक्षक पतसंस्थेचे मा. चेअरमन श्री रमेश गोवंदे, उपाध्यक्षपदी श्री शेख एम पी व श्री वाय बी पवार सहसचिव पदी श्री शेख फजलुल अहेमद , सल्लागारपदी श्री शेख रियाजोदिन मनिरोदिन तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटनेच्या भोकर तालुका अध्यक्षपदी श्री सुरेश राव मुपडे ,हदगाव तालुका अध्यक्षपदी श्री चंद्रकांतराव पाटील शिंदे ,
कंधार तालुका अध्यक्षपदी श्री गणपतराव गुट्टे व मुखेड तालुका अध्यक्षपदी श्री व्यंकटराव पा.माकने इ.ची निवड झाल्याबद्दल त्यांचा बैठकीत जिल्हाध्यक्षा तथा बैठकीच्या अध्यक्षा व प्रमुख उपस्थितीता च्या हस्ते सत्कार करण्यात आला.
बैठकीत सेवानिवृत्त मूख्याध्यापक तथा जेष्ठ शिक्षक नेते श्री चंद्रकांत शिंदे ,श्री खुशालराव कागणे ,शिक्षण विस्तार आधिकारी श्री नामदेवराव गायकवाड श्री वाय बी पवार, मा. व्यंकटराव माकणे, मा. प्रल्हादराव कदम मा. गट शिक्षणाधिकारी श्रीमती निलावतीताई निलेवाड मा. शिक्षण विस्तार अधिकारी इ.नी सेवानिवृत्तांच्या विविध अडी -अडचणी मांडल्या ह्या अडी -अडचणी सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांच्या मनोगतातून व्यक्त केले.
संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री सुधीर गोडघासे यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी संघटनेच्या आरंभापासून आजतागायत सेवानिवृत्तांच्या विविध मागण्यांची सोडवणूक करण्यात आल्याबाबत बैठकीत माहिती दिली .
राज्य संघटक बालाजी डफडे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका अध्यक्षांनी त्यांच्या तालुक्यातील सर्व सेवानिवृत्तांची बैठक घेऊन तालुका कार्यकारिणीची लवकरात लवकर निवड करावी. व सेवानिवृत्तांचे प्रश्न मार्गी लावावेत.
सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त संघटना हीच खरी संघटना असून या संघटनेच्या माध्यमातून आपले प्रश्न सुटणार असल्याचे मनोगतातून सांगितले.व उर्वरित तालुक्यातील तालुकाध्यक्षांची निवड लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले .
अध्यक्षीय समारोपातुन विजयाताई घिसेवाड यांनी सेवानिवृत्तांच्या मागण्या खंबीरपणे अधिकाऱ्यापर्यंत घेऊन जावु व ते सोडवून घेण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करू या असे मांडले.
सदरील बैठकीचे सूत्रसंचालन श्री सुरेशराव मुपडे यांनी केले तर
बैठकीचे आभार श्री शेख रियाजोद्दीन यांनी मानले. या बैठकीस जिल्ह्यातील बहुसंख्य सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी उपस्थित होते .
बैठक संपल्यानंतर नांदेड जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल मॅडम तसेच शिक्षण विभाग जि प नांदेड प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सविता बिरगे मॅडम यांना सेवानिवृत शिक्षक केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी इ.दी कर्मचाऱ्यांचे माहे जुलै 2022 पासून चे थकीत मृत्यू निवृत्ती -उपदान व अंशराशीकरण तसेच सातव्या वेतन आयोगाची थकीत हप्ते पहिला दुसरा तिसरा हप्ता गट विमा अर्जित रजा अनुज्ञ संचित रजेचे रोखीकरण ,सेवानिवृत्तीचे वेतन एक तारखेला व्हावे तसेच दर महिन्याला शिक्षक मुख्याध्यापक केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांची पेन्शन अदालत घेण्यात यावी.
या मागण्यांचे रितसर निवेदन देवून सविस्तर चर्चा केली.या वेळी जिल्हा परिषद नांदेड च्या मा.मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल मॅडम व मा. शिक्षणाधिकारी प्राथमिक च्या श्रीमती सविताताई बिरगे मॅडम यांनी सेवानिवृत्तांच्या वरील सर्व मागण्या लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सेवानिवृत्तांच्या मागण्या सोडविण्याचेआश्वासन दिल्याबद्दल संघटनेच्या वतीने बालाजी डफडे राज्य संघटक व सुधीर गोडघासे राज्य उपाध्यक्ष यांनी वरील मा. अधिकाऱ्यांचे खूप खूप आभार मानले .