नांदेड ; प्रतिनिधी
महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत अतिक्रमण काढून शंभर फुटाचाच रस्ता करा.या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नेमलेली समितीतील अधिकारी व्यापाऱ्यांशी मॅनेज असल्यामुळे अतिक्रमण हटवण्याच्या भुमिकेत न्याय मिळणार नाही यासाठी आज ११ ऑक्टोबर रोजी मारोती मामा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला .
या बाबी सविस्तर असे निवेदन नमूद केले की, महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत शंभर फुटाचा रस्ता व्हावा यासाठी गेल्या दोन महिन्यापासून आम्ही कंधारकर व सकल मातंग समाज सातत्याने प्रयत्न करत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हा रस्ता माध्यमातून दोन्ही बाजूने 50-50 फुटाचा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने दोन्हीही बाजूच्या व्यापाऱ्यांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटीसा दिल्या होत्या. यात दोन्ही भागाच्या छोट्या व्यापाऱ्यांनी आपले अतिक्रमण काढून घेतली आहे. परंतु या शॉपिंग सेंटर मधले व्यापारी विरोध करत आहेत.
न्यायालयाचे कारण दाखवून अधिकारी कसल्याच प्रकारची कारवाई करत नसल्याने मामा गायकवाड हे गेल्या दहा दिवसापासून आमरण उपोषणाला बसले होते.दिनांक ६ आक्टोंबर रोजी आपल्या कार्यालयाकडून समिती नेमण्यात आली होती.या समितीतील अधिकारी यांनी पाहणी केली.जो काही आहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करायचा आहे तो सादर करण्याचा अधिकार त्यांना आहे.
असे असताना या समितीने आम्हाला शासकीय विश्रामगृहात बोलुन घेऊन आमची समजुत काढण्याचा प्रयत्न केला.एवढेच नाही तर त्यांनी आमच्याशी हुज्जत घालत व्यापाऱ्यांच्या पोटाचा प्रश्न आहे असे सांगीतले.त्यामुळे या समितीतील अधिकारी हे मॅसेज अधिकारी आहेत.आमचा त्यांच्यावर विश्वास नाही.
महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता हा शंभर फुटाचा होणे हे गरजेचे आहे विशेष बाब म्हणजे हा रस्ता तालुक्याला जोडणारा मुख्य रस्ता आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असते या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या व्यापाऱ्यांनी सहखुशीने अतिक्रमण काढून घेतले आहे .शंभर फुटाचा रस्ता करण्यात कोणाचीही हरकत नाही, केवळ नगर पालिकेतील व्यापारी संकुलनातील व्यापारी विरोध करत आहेत आमचा या व्यापाऱ्यांना पण विरोध नाही .
व्यापाऱी संकुलाच्या पाठीमागे मोकळी जागा आहे त्यामुळे हे शॉपिंग सेंटर पाठीमागे पण बांधता येते परंतु हा रस्ता शंभर फुटाचा झाला पाहिजे भविष्यात या रस्त्यामुळे कंधारच्या विकासात भर पडणार आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहे सन 20 21 मध्येच या ठिकाणी अपघात होऊन दोन जणांचा मृत्यू झाला होता तर 17 ते 18 जण जखमी झाले होते.
या रस्त्यासाठी कोणाचाच विरोध नसताना नगर पालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग का शंभर फुटाचा रस्ता करत नाहीत. असा सवाल उपस्थित करण्यात येत मा.जिल्हाधिकारी साहेबांनी या प्रकरणात लक्ष घालुन हा रस्ता शंभर फुटाचाच करावा अशी मागणी मारोती मामा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मातंग समाजाचा वतिने जिल्हाधिकारी यांना करण्यात आली .
यावेळी प्रितम भाऊ गवाले
लहुजी शक्ती सेना जिल्हा अध्यक्ष , विद्यासागर वाघमारे
, सुनिल बिजले ,अक्षय बोयाळ ,मुन्ना बसवंते, कपिल वाघदरे , पुनम ,संतोष , नागेश वाघमारे ,
व्यंकटी वाघमारे आदीसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .