आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस

         निरक्षरता हा मानवी जीवनाला लागलेला कलंक आहे.देशाच्या सर्वांगिण विकासामध्ये तो बाधा आणतो.देशाचा विकास साधायचा असेल तर देशात साक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असायला हवे.त्यामूळेच शासनाने ग्रामीण आणि शहरीभागात वेगवेगळ्या योजना राबविल्या त्या मध्ये सर्वशिक्षा अभियान,समग्र शिक्षा अभियान,माध्यान्ह भोजन योजना,प्रौढ शिक्षा योजना,राजीवगांधी साक्षरता मिशन या योजनांच्या माध्यमातून लोकांना साक्षर बनवण्याचा प्रयत्न केला गेला.दरवर्षी ८सप्टेंबर हा “आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस”म्हणून साजरा केला जातो.
         खरे पाहाता साक्षरता प्रसाराची सुरुवात स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली.महात्मा ज्योतीराव फुले आणि त्यांची पत्नि सावित्री,पंडिता रमाबाई या समाजसुधारकांनी ही चळवळ विसाव्या शतकाच्या पूर्वीच सूरु केली होती.हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे,मानवी विकास आणि समाजासाठी त्यांचे हक्क जाणूण घेण्यासाठी आणि साक्षरतेकडे सर्वांना प्रवृत्त करण्यासाठी केला जातो.आपल्या भारतात”राष्ट्रीय साक्षरता”मिशनच्या अनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहू आणि वाचू शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजले जाते.१९८८मध्ये”राष्ट्रीय साक्षरता मिशनची”सुरुवात झाली.या मध्ये १५ते५५वयोगटातील लोकांना साक्षर करण्याचा उद्देश होता.आपल्या भारतात निरक्षर लोकांचे प्रमाण खुप होते त्याचा फायदा सावकार मंडळी घेत,ते निरक्षर असल्यामूळे त्यांचा अगंठ्याचे ठसे घेउन त्यांच्या जमीनी लुबाडत.तसेच निरक्षर लोक आजही पारंपारिक व्यवसायामध्ये अडकून पडलेले आहेत.त्यामूळे आर्थिक प्रगतीचे मार्ग खुंटतात.म्हणूनच देशाचा आर्थिक विकास साधायचा असेल तर देशातील जनतेत साक्षरतेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात हवे.पूर्वी स्त्रियांना शिक्षणाचा
अधिकार नाकारला गेला होता.पण…आता सर्व बदलले आहे”एक स्त्री शिकली तर,अख्खं कुटुंब शिकत,सुशिक्षीत होत याची प्रचीती सर्वांना आली आहे.त्यामूळे स्त्रीशिक्षणाचे प्रमाण वाढले आहे.गावोगाव शाळा बांधल्या आहेत,मूलींनी शिकावे म्हणून विविध योजना राबविल्या जात आहेत.ज्यांना गरिबिमूळे शिक्षणाची आवड आहे पण शिक्षण घेता येत नाही अश्या लोकांना रात्रीच्या शाळेची व्यवस्था शासनाने केली आहे.साक्षरता म्हणजे फक्त वाचन-लेखन करणे किंवा शिक्षीत होणे नव्हें तर या व्यतिरिक्त लोकांमध्ये हक्क,कर्तव्याची जाणीव,कौशल्य,विकास,समाजविकासाकरिता सहभागी होण्याची भावना निर्माण करणे होय.साक्षरतेचा दिवा घरोघरी लावा हा संदेश घराघरात पोहचवून सर्व कुटूंबाला सुशिक्षीत करण्याचा वसा घ्या.कारण,शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे आणि तो जो पिणार तो गुरगुरल्या शिवाय राहाणार नाही…असे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते.

आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन
साजरा करुया
प्रत्येकजण करुन साक्षर
देशाची प्रगती करुया

rupali wagre vaidh
rupali wagre vaidh

रुपाली वागरे/वैद्य
नांदेड
९८६०२७६२४१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *