आठवणीतील विद्यार्थी : डॉ.प्रविन यन्नावार

दिवस कललं होतं . मावळतीकडे झुकलेला .घरातील वातावरण शांत होतं .मी मोबाईल मधील जुन्या सिनेमातील सुंदर, अर्थपूर्ण ,श्रवणीय व मधूर गोड गाणे ऐकत एकटाच बसलेलं होतो .उगीच गाण्याच्या भावार्थानुसार भूतकाळ आठवत, चघळत बसलो होतो .सेवानिवृती नंतर आता फारसं काम उरलेल नसतेच ना .अचानक मोबाईलची रिंग खणाणली .फोन कुणाचा आला म्हणून मी पाहिलो तेथे नाव नव्हते .

फोन रिसिव्ह केलो .समोरुन आवाज आला ,” हॅलो सर,राठोड सर का? मी म्हणालो ,”होय मी राठोड बोलतोय ” “सर ऽऽ ऽऽसर मी प्रविन बोलतय तुमचा विद्यार्थ्यी दिल्लीहून बोलतोयं सर” समोरून आवाज आला . माझ्या मेंदूतून चक्र फिरले व मी पटकन म्हणालो , प्रविन भानुदास यन्नावार का?”  “होय सर ,मी प्रविन तुमचा विद्यार्थी बोलतोय, मनोविकास विद्यालय कंधार.हे वाक्य ऐकताच माझं मन चक्क चौतिस पस्तीस वर्ष मागे गेलं . हळूहळू भूतकाळ मनचक्षू समोर तरळू लागलं .

खरं तर मी  मनोविकास माध्यामिक विद्यालयात फारच अल्पकाळ म्हणजे जेमतेम दोन सव्वादोन वर्ष सेवा केली . पण या काळात मी तेथे इमानइतबारे काम केलो होतो . मी पूर्णपणे मनोविकास शाळेतील विद्यार्थ्यांशी , शिक्षकांशी एकरूप झालो होतो . विद्यार्थांसोबत मिळूनमिसळून राहीलो . त्यांच्या आडीआडचणी सोडविलो . मनोविकास मध्ये इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थीं नेहमीच माझ्या सोबत राहात . माझ्या अवतीभोवती घुटमळत रहात .

 अशाच मुलांपैकी एक मुलगा म्हणजे प्रविन भानुदासराव यन्नावार . दिसायला रंगाने काळासावळा . बारीक डोळे . थोडं नकटंनाक . अंगकाठी किडमीडीत हडकुळी होती . तो मनमिळावू होता . मैत्रि जपणारा होता . चालताना वाऱ्यात उडून जाईल असं वाटायचे .पण हा काटक होता .फारच हुशार होता.प्रश्न विचारणारा .उत्तर दिलं तरी ही या पठ्ठयाकडे नविन प्रश्न तयार असायचं.हे असंच का ? ते तसंच का ? असं सारखं मला विचारत राहायचा . मी ही त्याच्या प्रश्नांचे उत्तर देत राहायचो . 

          फोनवर बोलत असताना मला प्रविनचं भूतकाळ ,शालेय जीवन आठवत होतं . तो भरभरून माझ्या विषयी बोलत होता . बोलताना इंग्रजीतूनच ज्यास्तीचे वाक्यं बोलत होता . तो इतका आनंदी होता की त्याच्या आनंदाचं वर्णन करण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत . प्रविन नेहमीच माझ्या सोबत रहायचं . खेळण्याच्या मैदानात ही प्रविन माझ्या सोबत . शाळेत मधल्या सुट्टीत प्रविन माझ्या सोबत राहात असे . प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी प्रविन माझ्या जवळजवळ घुटमळत रहायचं .       

       मी नविनच . प्रविन माझ्या सोबत . आम्ही दोघंही शिवाजी हायस्कूलच्या मैदानावर की त्या जवळील मोकळ्या जागेवर आरएसएस संघटनेचं आठदहा दिवसाचं शिबिर चालू होतं त्या शिबिरला आम्ही  गेलो होतो . ती संघटना कोणाची होती ? त्या संघटनेचं काम काय होतं ? हे मला काहीच माहित नव्हतं . ही  गोष्ट शाळेत जेव्हा कळाली तेव्हा मला शाळेचे अध्यक्ष व सेक्रेटरी यांनी बोलावून घेतले पुन्हा तिकडे जायचं नाही म्हणून समजावून सांगितले . मी पुन्हा तिकडे फिरकलोच नाही . आरएसएस संघटना मला नंतर समजली .     

      प्रविन तल्लख बुद्धीचा होता . वर्गात प्रत्येक गोष्ट तो मनलावून करायचा . लक्षपूर्वक ऐकायचा .तो शाळेत शिष्यवृतीधारक होता .तसेच NTS परीक्षा ही तो पास होता . तो शिक्षक शिकवितावेळी शिक्षकांचे हावभाव तो निरखून पाहायचा . प्रविन माझी नक्कल हुबेहूब करण्यात तरबेज होतं . मी वर्गात जसं बोलत असे , शिकवित असे तसाच तोही शिकवायचा . प्रविन फोन वरून बोलताना मला सांगत होता , ” सर तुम्ही शिकवलेलं मीआजही जसेच्या तसे सांगतोय.” मी म्हणालो प्रविन तुला काय आठवते आता ? वर्गात शिकविण्याची माझी स्वता:ची एक आगळीवेगळी पद्धत होती . माझी इंग्रजी विषय शिकविण्याची एक वेगळीच लकब होती .

मी शेवटच्या बेंचवर बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या  लेव्हलला जावून समजावून सांगत असे . त्यांना समजून घेत असे . त्या विद्यार्थ्यांना सहज समजेल अशीच भाषा मी वापरायचो.प्रविन माझीच भाषा वापरून मला सांगू लागला , ” सर तुम्ही while कसे वापरावे हे सांगताना vote for “ing ” म्हणजे चालूकाळात ( भूतकाळ ) क्रिया चालू असलेल्या वाक्यात while वापरा म्हणून सांगत तर ” remove too ” शिकवताना मोठ्या “too ” ला शहाणा too तर या छोट्या” to” ला शेबंड to म्हणत होतात .

तर उदगार वाचक चिन्हाला आज्याची काठी व काठीला घुंगरू अशा कितीतरी गमतीजमतीच्या आठवणी प्रविन कडे आहेत तो ते भराभरा मला सांगत होता . त्याचं नवल व अप्रुप मला वाटत होतं. असा हा माझा प्रविन माझ्याशी गप्पा मारताना त्याचा चालू इतिहास ही मला सांगितला .

इतिहास सांगताना सर तुमच्या मुळे मी येथं पर्यंत पोहचलो हेही सांगायला तो विसरला नाही . आगदी भरभरून न थांबता तो सांगत होता . सांगताना त्याच्या वाणीला एक गोड मधूर धार लागली होती . ती धार सतत चालू होती . धारेत आनंद , उत्साह मावत नव्हतं .

मी मनोविकास शाळेतून नोकरीचा राजीनामा देवून जि .प . माध्यमिक शाळा हदगाव जि.नांदेड येथे रुजू झालो . या कामी माझे जेष्ठ बंधू आदरणीय नारायनराव बनसोडे दादांनी मला दिलदार पणे , संपूर्ण म्हणजे “तनमनधनाने ” मदत केली . प्रविन दहावी पास मनोविकास शाळेतून झाला . त्याचे वडील बहुधा विष्णुपूरी प्रकल्पात नोकरीस होते .

प्रविनची बारावी नांदेड येथील सायन्स महाविद्यालयातून झाली तर पदवी बीएस्सीचं शिक्षण एनएसबी महाविद्यालय नांदेड येथूनच पूर्ण केलं . पदवी नंतर एमबीए व एमएसडब्ल्यू स्वामीरामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून पूर्ण केलं . प्रविन हा सुरुवाती पासून धडपड्या , फारच चंचल ही होतं . गप्प बसून राहाणे त्याला जमत नाही . तो नेहमीच कार्यमग्न असतो . पदवीत्तेर शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पुणं गाठलं तेथे एक वर्षाचं प्रशिक्षण व काम ही केलं .   

          प्रविन NET ची परीक्षा ही उत्तीर्ण करून तो आता स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करतकरत एका नामवंत राष्ट्रीय संस्था NIMHANS बेंगलेरू येथून एमफील “Psychitary ” मध्ये पूर्ण केलं . हा पठ्ठ्या एवढ्यावरही समाधानी नव्हतं व राहू ही नव्हे . पुढे त्याने दिल्ली विद्यापीठातून पीएचडी ही पूर्ण केली . नंतर मॅनेजमेन्ट ट्रेनि म्हणून बजाज इलेक्ट्रीकल पुणे येथे ही काम केलं . मुंबई येथील टाटा सामाजिक व वैज्ञानिक संस्थेत ही प्रविनने काम केलेलं आहे .

नेहमी धडपडणारा व काहीतरी करावं म्हणून नेहमीच प्रत्येक गोष्टीत आग्रेसर राहाणारा प्रविन हा “प्रविनच “आहे .काही तरी करत राहाणे हा त्याचा मुळ स्वभाव गुण .नेहमीच धडपड्या . तो काऊन्सलर म्हणून बी .जे . मेडीकल कॉलेज मध्ये प्राध्यापकाचं कार्य केलंय . प्रविन सध्या “मानसिक आरोग्य संस्था ” मध्ये ‘मेडीकल सोशियल सर्व्हीस ऑफीसर ‘ म्हणून एम्स ( AIIMS ) नवी दिल्ली येथे आजघडीला कार्यरत आहे .     

   शालेयजीवनापासूनच हुशार  विद्यार्थी . प्रविन हा महाराष्ट्र शासनमान्य कामगार वेलफेअर मध्येहीअधिकारी म्हणून ही काम केलेलं आहे . त्याचे अनेक संशोधनात्मक निबंधही प्रसिद्ध आहेत . तो राष्ट्रीयस्तरावरील व अंतरराष्ट्रीयस्तरावरील परिसंवादात नेहमीच सक्रीय सहभाग घेतोय . अनेक प्रसिद्ध नियतकालीकातून त्याचे शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत . “मानसिक आरोग्य ” चर्चासत्रात तो नेहमीच हिरहिरीने भाग घेत असतो .

या बाबतच्या अनेक वर्कशॉप ही त्याने घेतलेल्या आहेत . निरिक्षक ,तपासणीस म्हणून प्रविनने ICMR , NACO आणि HANS फाऊन्डेशन फंडेड रिसर्च प्रोजेक्टमध्ये ही कार्य केलेलं आहे . तसेच स्टेट मेन्टल हेल्थ ऑथॉरीटी मध्ये तांत्रिक कन्सलटंट म्हणून ही चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे . प्रविन नेहमीच कार्यमग्न असतो . “मानसिक आरोग्य व त्याचे पूनर्वसन ” या कार्यात ही तो नेहमीच आग्रेसर असतो . तो नेहमी देशी विदेशी लोकांना दिल्ली विद्यापीठात होणाऱ्या अनेक परिसंवादात “मानसिक आरोग्यावर ” असंख्य व्याख्याने दिलेली आहेत . 

      तीस पस्तीस वर्षानंतर माझ्या सारख्या ‘सामन्य गुरुजीची ‘ आठवण ठेवून प्रविन गेल्या वर्षी माझ्या घरी आला . सोबत चंद्रकांत सांगळे गुरुजीे , लक्ष्मण जाधव गुरुजी, ज्ञानू गंदलवाड विद्यूत विभाग , दिलीप जाधव पोलीस , अॅड . लाटकर सुमंत , विश्वनाथ पटवे , सुदाम जाकोरे पोलीस या माझ्या विद्यार्थ्यांना ही सोबत घेवून मला भेटून शाल पुष्पगुच्छ देवून माझं सत्कार केले . हा माझा सत्कार माझ्यासाठी राष्ट्रपती पुरुस्कारापेक्षाही मोठा होता व आहे असे मला वाटते . मी शिक्षक असल्याचा मला अभिमान वाटते व सर्व शिक्षकांविषयी मला अभिमान वाटते .

M.R.RATHOD
M.R.RATHOD

राठोड एम.आर. (गुरुजी ) “गोमती

सावली” काळेश्वरनगर विष्णुपूरी, नांदेड
९९२२६५२४०७ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *