ज्येष्ठ निरुपणकार, कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाने एक आध्यात्मिक, प्रबोधनात्मक जीवनप्रवास थांबला आहे. त्यांचे संपूर्ण आयुष्य ईश्वरभक्तीसाठी समर्पित होते. त्यांचे कीर्तन, ज्ञानेश्वरीचे निरुपण भाविकांमध्ये कमालीचे लोकप्रिय राहिले. दूरचित्रवाणीवर कीर्तन घेऊन जाण्याचा पहिला प्रयोग त्यांनी केला. आपल्या शुद्ध वाणीने आणि शुद्ध विचारांनी त्यांनी समाजाला दिशा दिली. त्यांच्या आवाजातील हरीपाठ व जय जय राम कृष्ण हरीचा गजर वर्षानुवर्षे सर्वसामान्यांच्या मनात गुंजत राहिल. त्यांच्या निधनाने वारकरी संप्रदाय आणि आध्यात्मिक क्षेत्राची अपरीमित हानी झाली आहे.
ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.