डेट का करावी आणि कोणी करावी??
मुळात डेट फक्त स्त्री पुरुषांनी करावी असं अजिबात नाही.. दोन मैत्रीणी किवा दोन मित्र डेट करु शकतात..
नवरा बायको डेटवर जाऊ शकतात..bf gf तर जातातच..
कुठल्याही वयातील मंडळी डेटवर जाऊ शकतात.. आजी आजोबा पण डेट करु शकतात..आजोबा नातवंडं डेटवर जाऊ शकतात..
डेट का करावी यावर आपण जास्त भर देउयात कारण त्याचा चांगला परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होतो.. प्रत्येकाने डेट वर जायलाच हवं.. डेटवर जाणं म्हणजे नक्की काय ?? .. कधी कॉफी आणि बरच काही तर कधी कॅंडल लाइट डिनर आवडत्या व्यक्तीसोबत.. प्रेमात असलेलं कपल नुसतं डोळ्यात डोळे घालुन तासनतास गप्पा मारत असतील अगदी कुठल्याही विषयावर का असेना .. भान हरपुन म्हणु .. त्या दोघांना मानसिक समाधानाची गरज असते ती डेट मधुन मिळते.. विचारांची देवाणघेवाण होते.. शेअरींग केअरींग होतं.. डेटवर जाऊन रुसलेल्या सखीचा रुसवा काढला जातो.. ती पुन्हा खळखळुन हसायला लागते.. कधी केसात गजरा माळणं असेल किवा छोटं गिफ्ट असेल नातं मजबुत व्हायला डेटची गरज असते.. नवरा बायको बदल म्हणुन बाहेर डेटवर जाऊ शकतात.. एकत्र कुटुंब पध्दतीमधे किवा लहान घरात नवरा बायको ना स्पेस मिळत नाही.. त्यांना एकमेकांशी व्यक्त होता येत नाही म्हणून डेटवर जायचं असतं..
मित्रांनी बारमधे डेटवर जाऊ नये पण व्यायामाला एकत्र जाऊ शकता निसर्गात जाऊ शकता.जेवायला जाऊ शकता. कधी कधी मित्रान्मधे काही गैरसमज होतात ते दुर व्हायला अशा डेटची गरज असते.. आजोबा नातवंडं एखाद्या बागेत जाऊन एकत्र खेळु शकतात.. घरी बसुन चेस खेळणं असेल किवा चित्रकला असेल.. गोष्टी सांगणं असेल यामुळे त्या दोघांत बॉंडींग वाढतं.. आजी आजोबाना एकटं वाटत नाही.. उतार वयात मानसिक आरोग्य उत्तम राहिलं की शरीर तंदुरुस्त रहातं.. पूर्वी डेट नव्हती का ??.. होती ना त्याला नाव होतं पार .. पारावर बसुन मित्र हसतखेळत मोकळेपणाने बोलायचे.. आता मोबाईल मधे असतात.. तिथेच सगळं गणित चुकतय..
पार जाऊन डेट हा शब्द आला तरीही त्यातली गरज तीच आहे.. उलट विभक्त कुटुंब पध्दतीमुळे डेटची गरज जास्त जाणवु लागलेय..
ज्याच्याकडे वेळ आहे , पैसा आहे त्यांनी चांगल्या विचारांच्या लोकांसोबत डेट जरुर करावी आणि निरोगी रहावं.. तुम्ही पहात असाल तर माझे अनेक फोटो मी सोशल मिडीयावर शेअर करते म्हणजेच माझ्या फ्रेन्ड्स सोबत मी पण बऱ्याचदा चिल मारत असते.. पण वैचारिक लेव्हल पाहुन मी डेट करते नाहीतर ठोंब्यासोबत माझं जमत नाही.. मला खुप लहान गोष्टीत आनंद घ्यायचा असतो आणि द्यायचाही असतो..कधी कधी मी स्वतःसोबत डेट करते.. माझ्यात असलेल्या कमतरतेवर काम करते.. माझ्या आवडी जपते.. माझ्यावर प्रेम करते .. तुम्हीही स्वतःसोबत एक डेट करुन पहा..स्वतःशीच बोलुन पहा.. आपण केलेल्या चुकांबद्दल माफी मागुन पहा..
आणि डेटवर जात रहा..
सोनल गोडबोले..
..