जगभरात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. अनेक देश कोरोना संकटाचा सामना करत आहेत. काही देशांमधील मृतांचा आकडा हा दिवसागणिक वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल तीन कोटींच्या आसपास असून आतापर्यंत जवळपास नऊ लाख जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. भारतातही कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल बेचाळीस लाखांचा टप्पा पार केला आहे. गेल्या काही तासांत रुग्णसंख्येत विक्रमी वाढ झाली असून ब्राझीलला मागे टाकत कोरोनाग्रस्त देशांच्या आकडेवारीत भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. सोमवारी, ७ सप्टेंबर रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ९०, ८०२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर हजारभर जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या बेचाळीस लाखांपेक्षा अधिकच्या संख्येवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ७१६०० वर पोहोचला आहे. देशामध्ये रविवारीसुद्धा कोरोनाचे ९०,६३२ नवे रुग्ण आढळले असून हा आजवरचा उच्चांक आहे. एका दिवसात ९० हजारपेक्षा जास्त रुग्ण सापडलेला भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. आता रुग्णांची एकूण संख्या ४२ लाखांवर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ३१ लाख ८० हजारांहून जास्त झालीे. १४ दिवसांत रुग्णसंख्या ११ लाखांनी वाढली.
सुरूवातीच्या टप्प्यात नाममात्र रुग्णवाढ होणाऱ्या भारतात आता दररोज रुग्णवाढीचे नवे विक्रम नोंदवले जात आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातील रुग्णसंख्या वाढीची गती प्रचंड वाढली असून, दिवसाला ८० ते ९० हजार नागरिक बाधित होत असल्याचं आकडेवारीतून समोर येऊ लागलं आहे. रुग्णसंख्येच्या स्फोटामुळे भारत दुसऱ्या स्थानी पोहोचला असून, दुसरीकडे मृतांचा आकडाही चिंताजनक गतीनं वाढू लागला आहे. त्यामुळे देश सध्या करोनाचा हॉटस्पॉटच बनला आहे. कोरोनाची धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली असून त्यामध्ये सातत्याने वाढ होत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी ८,८२,५४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर ३२,५०,४२९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे. एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी देशात कोरोना व्हायरसचं हे संकट २०२१ पर्यंत असणार असल्याचं म्हटलं आहे. तसेच दिल्लीसह देशातील काही भागात कोरोनाची दुसरी लाट आल्याचं देखील म्हटलं आहे.
डॉ. रणदीप गुलेरिया हे केंद्र सरकारच्या कोविड-१९ टास्क फोर्समधील एक अत्यंत महत्त्वाचे सदस्य आहेत. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांनी असं म्हटलं आहे. कोरोनाचं हे महाभयंकर संकट २०२१ पर्यंत जाईल असं आपण सांगू शकत नाही. मात्र मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होत होता तो मात्र कमी झाला आहे हे निश्चित सांगता येईल असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. “काही भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. देशातील काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आल्याचं देखील दिसून येत आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे कोरोना चाचण्यांची वाढवण्यात आलेली संख्या आणि दुसरं म्हणजे लोक नियमांचं पालन करत नाहीत.” कोरोनावर मात करण्यासाठी या वर्षाच्या शेवटी कोरोना लस उपलब्ध होऊ शकते अशी आशा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
देश कोरोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला असतानाच कोरोनासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर येत आहे. विविध ठिकाणी कोरोना व्हायरसवर संशोधन सुरू आहे. कोरोनाने देशात थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून चिंता वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. कोरोनामुळे हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचं हे महाभयंकर संकट पुढील वर्षापर्यंत जाईल असं आपण सांगू शकत नाही. मात्र मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार होत होता तो मात्र कमी झाला आहे हे निश्चित सांगता येईल असं गुलेरिया यांनी म्हटलं आहे. “काही भागांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. देशातील काही ठिकाणी कोरोनाची दुसरी लाट आल्याचं देखील दिसून येत आहे.”
सर्वाधिक रुग्ण संख्येत अमेरिका प्रथम क्रमांकावर असून ब्राझील दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानी आहे. आजच्या आकडेवारीनुसार भारत ब्राझीलवर मात करून दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. अमेरिकेत ६४,३२,१०३ तर ब्राझीलमध्ये ४१,२३,००० रुग्ण आहेत. भारताची संख्याही त्यापेक्षा अधिक झाली आहे. कोरोना विषाणुचा सर्वाधिक संसर्ग आरोग्य कर्मचाऱ्यांना झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यामागे दोन कारणं आहेत. एक म्हणजे कोरोना चाचण्यांची वाढवण्यात आलेली संख्या आणि दुसरं म्हणजे लोक नियमांचं पालन करत नाहीत.” कोरोनावर मात करण्यासाठी या वर्षाच्या शेवटी कोरोना लस उपलब्ध होऊ शकते अशी आशा असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. भारतात तीन स्वदेशी लसींसह अनेक गोष्टींवर संशोधन सुरू आहे. कोरोनावर लस उपलब्ध होण्यासाठी काही महिने लागू शकतात. तसेच लस सुरक्षित असणंही महत्त्वाचं असल्याचं रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे.
देशातील तब्बल ८७ हजार तर महाराष्ट्रतील २४ हजार ४८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पैकी राज्यातील २९२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा कहर सुरूच असून सलग आठवडाभर रूग्ण संख्येत उच्चांकी वाढ होत आहे. गेल्या काही तासांत २३ हजार ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली तर ३२८ जण दगावले. दिवसभरात ७ हजार ८२६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोरोना विषाणुचा सर्वाधिक संसर्ग आरोग्य कर्मचाऱ्यांना झाला आहे. देशातील तब्बल ८७ हजार तर महाराष्ट्रतील २४ हजार ४८४ आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पैकी राज्यातील २९२ कर्मचाºयांचा मृत्यू झाला आहे. पुणे येथे नुकतेच उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड सेंटरमध्ये काम पाहणाऱ्या लाईफ लाईन एजन्सीच्या ४० डॉक्टरांनी येथील असुविधांना वैतागून राजीनामे दिले आहेत. त्यामुळे महापालिकेने लागलीच या ठिकाणी ४५ डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. या सेंटरमधील सुविधा वाढविण्यात येत असल्याने दोन दिवस नव्या रुग्णांना भरती करून घेतले जाणार नाही.
अनलॉकच्या काळात कोरोनाचे संक्रमण वाढत असल्याचे चित्र असून पोलीसही याचे शिकार होत आहेत. चिंताजनक बाब म्हणजे गेल्या २४ तासांत राज्यभरात तब्बल ५११ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. आतापर्यंतचा बाधित पोलिसांचा हा सर्वाधिक दैनंदिन आकडा आहे. तर याच कालावधीत ७ पोलिसांना जीव गमवावा लागल्याने कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १७३ वर गेला आहे. राज्यभरात १ हजार ८१८ पोलीस अधिकाऱ्यांसह १५ हजार ९४ पोलीस कर्मचारी अशा एकूण १६ हजार ९१२ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी १,४२१ अधिकारी आणि १२,२९८ कर्मचारी मिळून १३ हजार ७१९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३ हजार २० पोलिसांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मागील २४ तासांत ज्या ७ पोलिसांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला त्यामध्ये मुंबई, नवी मुंबई, नागपूर ग्रामीण, कोल्हापूर आणि सातारा येथील प्रत्येकी १ तर नागपूर शहरमधील २ पोलिसांचा समावेश आहे.
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात राज्य पोलीस दलातील १,६५७ जण बाधीत झाले आहेत. पोलीस दलात करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे नव्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत राज्य पोलीस दलातील १७,०९१ अधिकारी, अंमलदार करोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी १३,८५१ जण करोनामुक्त झाले. राज्यभरात ३,०६४ पोलीस उपचार घेत आहेत. १७६ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. १ ते ७ सप्टेंबरदरम्यान पोलीस दलातील बाधितांचा आकडा १,६५७ ने वाढला. त्यापैकी १९ अधिकारी, अंमलदारांचा मृत्यू झाला. रविवार, ६ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी राज्यभरात ५११ अधिकारी, अंमलदार करोनाबाधित झाले. एकाच दिवशी इतक्या मोठय़ा संख्येने पोलिसांना करोनाची लागण होण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मुख्यालयातील अधिकाऱ्यांनी सांगितले. करोनाबाधितांमध्ये मुंबई पोलीस दलातील अधिकारी, अंमलदारांची संख्या जास्त होती. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये हे प्रमाण बदलल्याचा दावा मुंबईचे नवे सहआयुक्त (प्रशासन) राजकुमार व्हटकर यांनी केला.
टाळेबंदी शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात जनजीवन पूर्ववत होत असून, घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढली. गणेशोत्सवाआधी खरेदीसाठी आणि अनंत चतुर्दशीला गणेशमूर्ती विसर्जनासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी होती. पोलिसांची नियमित कामे वाढू लागल्याने पोलिसांमधील बाधा वाढली असा अंदाज आहे. पोलिसांपाठोपाठ करोनामुळे एसटीतील ३२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर ३१६ कर्मचारी राज्यातील विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. आतापर्यंत एसटीच्या ९७० कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाली आहे. त्यातील ६२२ कर्मचारी करोनामुक्त झाले आहेत. यामध्ये एसटीच्या मुंबई व ठाणे विभागांतील सर्वाधिक करोना कर्मचारी असल्याची माहिती एसटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. करोनामुळे मृत झालेल्या ३२ कर्मचाऱ्यांपैकी एसटीच्या मुंबईतील मुख्यालयातील चार कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यानंतर ठाणे विभागातील विविध आगारातील कर्मचारी आहेत.
वास्तविक पाहता सप्टेंबरच्या सुरुवातीपासूनच महाराष्ट्र राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाली आहे. राज्यात दिवसभरात तब्बल २३ हजार ३५० रुग्ण आणि ३२८ मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक दैनंदिन रुग्णनोंद आहे. परिणामी, राज्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ९ लाख ७ हजार २१२ झाली असून बळींची संख्या २६ हजार ६०४ झाली आहे. प्रवासावरील जिल्हा बंदीची बंधने हटवण्यात आल्याने तसेच कार्यालयांमधील उपस्थिती वाढवण्यात आल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मास्क वापरणे अनिवार्य केल्यानंतरही लोक मास्क वापरत नाही आहेत, असे सांगत टोपे यांनी त्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कोरोनाला रोखण्यासाठी १५ सप्टेंबरपासून राज्यात स्वस्थ महाराष्ट्र मोहीम राबवण्यात येणार आहेत. या मोहिमेंतर्गत ट्रेसिंग आणि टेस्टिंगवर भर दिला जात आहे. राज्यात मार्च महिन्यात झालेला कोरोनाचा उद्रेक पाच महिन्यांनंतर ऑगस्ट महिन्यात नियंत्रणात येत असल्याचे दिलासादायक चित्र होते. मात्र सप्टेंबरच्या पहिल्या सहा दिवसांत राज्यातील रुग्णांमध्ये तब्बल १ लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर पडली आहे. १ ते ६ सप्टेंबर या काळात राज्यात १ लाख १४ हजार ३६० रुग्ण नोंद झाली आहे. अनलॉकचा टप्पा आणि नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सवामुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे.
मुंबईत सलग पाचव्या दिवशी दीड हजारापेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी १७८८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा दर पुन्हा एकदा वाढला आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्याही पुन्हा एकदा वाढली आहे. तर आतापर्यंत सव्वा लाख रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी १७८८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या १ लाख ५७ हजार ४१० वर गेली आहे. तर एका दिवसात १५४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत एक लाख २५ हजाराहून अधिक रुग्ण म्हणजेच ७९ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. सध्या २४, १४४ रुग्ण उपचार घेत आहेत. मृतांची एकूण संख्या ७८९७ वर गेली आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर पुन्हा एकदा एक टक्कय़ाच्या पुढे गेला आहे. रुग्णदुपटीचा कालावधी ९० दिवसांवरून थेट ६७ दिवसांवर आला आहे. मुंबईत आतापर्यंत आठ लाख ३४ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. पुण्याची स्थितीही गंभीर झाली आहे. राज्यात सर्वाधिक दैनंदिन रुग्ण नोंद पुण्यात ३ हजार ८०० एवढी झाली आहे. परिणामी एकूण बाधितांची संख्या १ लाख ९९ हजार ३०३ वर पोहोचली असून एकूण मृत्यू ४ हजार ४२९ झाले आहेत. १ लाख ३३ हजार ४९१ रुग्ण कोविडमुक्त झाले असून सध्या ६१ हजार ३८३ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर कोरोनाच्या राज्यातील स्थितीवरुन टीका केली आहे. अल्पमुदतीच्या का असेना या पावसाळी अधिवेशनात जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात सरकारला महत्वाच्या विषयांवर जाब विचारू. कोरोनाच्या उपाय योजनांसंदर्भात सरकारला सर्व आघाड्यांवर अपयश आले आहे. कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार, क्वॉरंटाईन सेंटरमध्ये महिलांवर अत्याचार असे अनेक मुद्दे आहेत. राज्य सरकार भांबावलेले आहे. स्वत: पुन:श्च हरिओम म्हणतात आणि पुन्हा लॉकडाऊन लावतात. व्यापाऱ्यांनी मागणी केली म्हणून लॉकडाऊन उठवले असेही सांगतात. लॉकडाऊनमध्ये केंद्राकडून शिथिलता दिली जात असताना राज्यात मात्र काही निर्बंध उठवण्यातच आलेले नाहीत. राज्यात कोरोना आटोक्यात येत नाही, कोरोनावर नियंत्रण आणण्यात शासन पूर्ण अपयशी ठरले आहे. कुठलीही गोष्ट झाली की केंद्रावर ढकलायची आणि जबाबदारी झटकायची यावर आम्ही बोलणार. राज्य सरकारने नेमके काय केले आहे याचा ‘पदार्फाश’च आम्ही अधिवेशनात करणार आहोत, असा इशारा दरेकर यांनी दिला होता.
एकीकडे कोरोनाचा कहर असताना सुशांत सिंग राजपूत प्रकरणातून ड्रग्स आणि सेक्स रॅकेट, कंगना रनौतबाबत सरकारची भूमिका पाहता कोरोनावरील चर्चा भरकटविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आपले अपयश झाकण्यासाठी इतर भावनिक विषयांकडे लक्ष वळवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला आहे. अधिवेशनाचा पहिला दिवस तर सभागृहात प्रवेश करण्याच्या गोंधळातच गेला. अनेक आमदारांकडे कोरोना नेगेटिव्ह चाचणीचे प्रमाणपत्र नव्हते. दुसरीकडे केंद्र सरकार महाराष्ट्राला सहकार्य करीत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात सध्या गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे. महाराष्ट्रातही मिशन अनलॉक सुरू असतानाच मो्ठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित समोर येत आहेत. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आण्यासाठी राज्य सरकारला केंद्राकडून मदतीची अपेक्षा असताना केंद्र सरकारकडून आलेल्या एका पत्रामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक असलेले मास्क, व्हेंटिलेटर आणि पीपीई किट्स महाराष्ट्राला देण्यात येणार नाहीत, असे पत्र केंद्रातून आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसेच या प्रकाराबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
राज्याच्या ग्रामीण भागांत रुग्णवाढीमुळे करोनाचे भय पसरले आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील अनेक ठिकाणी टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्य़ात रुग्णसंख्या वाढत असल्याने स्थानिक पातळीवर जनता टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. कागल आणि गडहिंग्लज तालुक्यांमध्ये सध्या जनता टाळेबंदी सुरू आहे.वाई शहर आणि तालुक्यात १३ सप्टेंबपर्यंत टाळेबंदी लागू आहे. नगरच्या राहुरीमध्ये १० सप्टेंबरपासून आठ दिवस टाळेबंदीचा निर्णय घेण्यात आला. लातूर जिल्ह्य़ात मुरुड येथे सोमवारपासून ‘जनता संचारबंदी’ला सुरुवात झाली. विदर्भातील चंद्रपूर व बल्लारपूर शहरातही गुरुवारपासून ‘जनता संचारबंदी’ लागू राहील. तालुका व जिल्हा पातळीवर कडक टाळेबंदीचा निर्णय घेण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून बैठका घेण्यात येत आहेत.
करोनावर लस उपलब्ध झाली तरी ती कुणाला, कशी व केव्हा उपलब्ध होणार हा सर्वात मोठा प्रश्न असून आता युनिसेफने यात पुढाकार घेऊन लशीची खरेदी व पुरवठा याची जबाबदारी घेतली आहे. आम्ही लस खरेदी करून सर्व देशांना त्याचा सुरक्षित, वेगाने व समान पुरवठा करू ,असे संस्थेने म्हटले आहे. ‘दी युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड ’म्हणजे ‘युनिसेफ ’ही जगातील सर्वात मोठी लस खरेदी करणारी संस्था असून ते दरवर्षी विविध लशींचे २ अब्ज डोस खरेदी करीत असतात. नेहमीच्या लसीकरणात ज्या लशींचा समावेश असतो त्या १०० देशात वितरित केल्या जातात. ही संस्था आता ‘रिव्हॉल्विंग फंड ऑफ दी पॅन अमेरिकन हेल्थ ऑर्गनायझेशन’ या संस्थेच्या मदतीने कोविड १९ लशींची खरेदी करणार आहे.
‘कोव्हॅक्स ग्लोबल व्हॅक्सिन’ सुविधा त्यासाठी उभारण्यात आली असून त्यात कमी व मध्यम उत्पन्न गटातील ९२ देशांना लस दिली जाईल. युनिसेफने शनिवारी एका ट्वीट संदेशात म्हटले आहे, की आम्ही हे मोठे आव्हान स्वीकारण्यास तयार आहोत. गोवर, पोलिओ यासारख्या रोगांवर ही संस्था दरवर्षी २ अब्ज लशीचे डोस खरेदी करून शंभर देशांना देत असते. युनिसेफ ही लस खरेदीत समन्वयाचे काम करते. ८० टक्केउच्च उत्पन्न देशांना लस खरेदीत मदत करण्यात युनिसेफची मदत असते. आता कोविड लशीसाठी कोवॅक्स ही सुविधा करण्यात येणार आहे. सध्याच्या परिस्थितीत जगातील १७० देशात या लशीचा समान पुरवठा करणे हे आव्हानात्मक काम संस्थेने घेतले आहे.
संस्थेच्या कार्यकारी संचालक हेनरिटा फोर यांनी सांगितले, की सरकारांशी उत्पादन, विविध भागीदार याबाबत समन्वय राखावा लागेल. सर्व देशांना सुरक्षित, वेगाने व समान पातळीवर लस मिळेल यासाठी आमचा प्रयत्न आहे. ‘जागतिक आरोग्य संघटना’, ‘गॅव्ही व्हॅक्सीन अलायन्स’, ‘कोअॅलिशन फॉर एपिडेमिक प्रिपेर्डनेस इनोव्हेशन्स’, ‘पाहो’, ‘जागतिक बँक’, ‘बिल व मेलिंडा गेटस फाउंडेशन’ या संस्था त्यात भागीदार असतील. कोव्हॅक्स सुविधा सर्व देशांना खुली राहील. एकही देश लशीपासून वंचित राहू नये यासाठी हा प्रयत्न आहे.
२८ उत्पादकांनी लस उत्पादनाच्या त्यांच्या योजना युनिसेफला दिल्या आहेत. येत्या १-२ वर्षांत मोठय़ा प्रमाणावर कोविड १९ लशीची निर्मिती करावी लागणार आहे. जागतिक हाॅटस्पाॅट बनू पाहणाऱ्या भारताला लस उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. हा राजकारणाचा विषय नाही. चीन, रशिया, अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाने केवळ दावे केले आहेत. ती भारतात पोहोचणे आणि वापरात येणे आवश्यक आहे. अगदी योग्य वेळी उपाययोजना सुरू केल्या हा केंद्र सरकारचा दावा आता फोल ठरला आहे. देशात आरोग्य सुविधा अजूनही तोकड्याच आहेत. दररोज साधारणतः दोन हजार लोकांच्या चाचण्या केल्या तरी हे आटोक्यात येणारे प्रकरण नाही. प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री यांनी त्यांच्या पत्रात मी इटालीतून भारताचा भविष्यकाळ पाहत आहे असे सूचक विधान केले होते. तशी किंवा त्याहीपेक्षा अधिक गंभीर स्थिती भारतात उद्भवली आहे. भारत जगाच्या नकाशात एक नंबरचा कोरोनाचा महासत्ता होऊ पाहत आहे. पुढील काळात लवकरात लवकर भारतात अतिगंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. ती हाताबाहेर जाऊ शकते. क्षणाक्षणाला बाधितांच्या आणि मृत्यूच्या आकडेवारीत बदल घडून येत आहेत. कोरोनाविरुद्धच्या या महायुद्धात भारताचाच नि:पात होण्याची लक्षणे दिसून येत आहेत.
गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय०८.०९.२०२०