कंधार येथे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालयाची मोडतोड व उपकोषाकार कार्यालयावर दगडफेक तर ठिकठिकाणी रास्तारोको ; मराठ आरक्षण आंदोलन चिघळले

कंधार;( दिगांबर वाघमारे )

नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे दि३१ ऑक्टोबर रोजी आज सकाळी आंदोलन करणाऱ्या लोकांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयावर जाऊन कार्यालयाची मोडतोड केली व उपकोषाकार कार्यालयावर दगडफेक करण्यात आली .

 

तसेच नांदेड-बिदर हायवेवर कंधार तालुक्यात पांगरा येथे सकल मराठा आंदोलकांनी टायर जळून, रस्ता रोको करत आंदोलन केले.
नांदेड बारूळ रोडवर लोकांनी जाळपोळ करून आपला रोष व्यक्त केला . दरम्यान लाठ(खुर्द)ता.कंधार
टायर जाळून रोष व्यक्त केला तर सावरगाव निपानी येथे मराठ समाजातील तरुणांनी एकत्र येत टायर जाळून रस्तारोको केला .

बाचोटी येथे उपोषणासाठी कंधारच्या तहसिलदारांना अँड विजय धोंगडे यांच्या व गावकऱ्यांच्या पुढाकाराने निवेदन देण्यात आले .

 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात बंद ची हाक देण्यात आली , नांदेड जिल्ह्यातील कंधार शहरातील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यालय आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी मराठा आंदोलकाच्या जमावाने एकत्र येऊन नारे देत कार्यालयाची मोडतोड केली , कार्यालयातील खुर्च्या व काचा फोडल्या सुदैवाने कर्मचाऱ्याला मात्र काही झाले नाही . दरम्यान जमावाने सरकारी कार्यालयाला टारगेट करत शहरातील मुख्य रस्त्यावरील उप कोषागार कार्यालयावर दगडफेक केली .

कंधार तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी घटना घडल्याचे समोर येत आहे मात्र पोलीस प्रशासन सज्ज असल्याने कोठेही जीवितहानी झाली नाही .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *