अखेर अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटरचा वाद मिटला १५ नोव्हेंबर रोजी गाळे होणार खाली

 

कंधार ; प्रतिनिधी
महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंतचा रस्ता १०० फुटाचा व्हावा य मागणीसाठी गेली दोन महिन्यांपासून माजी सैनिक संघटना व सकल मातंग समाजाच्या वतीने आंदोलने करत असल्याने हा लढा तीव्र बनला होता.अण्णाभाऊसाठे शॉपिंग सेंटर अनाधिकृत असून ते पाडण्यात यावे मागणीसाठी मामा गायकवाड यांनी १० दिवस आमरण उपोषणाला बसले होते.तर व्यापारी हे न्यायालयात गेले असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले होते.यावर तोडगा म्हणून मुख्याधिकारी यांनी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत दुकाने बंद ठेवण्याचा निरण घेतला होता.व्यापाऱ्यांनी आपली जनहित याचिका माघार घेतल्याने मुख्याधिकारी राम बोरगांवकर यांनी तहसील कार्यालयात मातंग समाज,माजी सैनिक संघटना व व्यापाऱ्यांची बैठक घेऊन ११ नोव्हेंबर पर्यंत अनाधिकृत असलेल्या गाळेधारकांना दुकाने खाली करण्याची लेखी सूचना दिली असल्याने हा वाद तात्पुरता मिटला आहे.
राज्यमार्ग महाराणा प्रतापसिंह चौक-जाधव हॉस्पिटल -बहाद्दरपुरा-फुलवळ हा १९८० साली राज्यमार्ग २२२ अशी नोंद असून त्याची रुंदी १०० फुट आहे.नगरपरिषद हा रस्ता विकास आराखड्यात असून १८ मीटर रुंदी असल्याचा दावा करत आहे.या रस्याच्या पश्चिमेस अण्णाभाऊ साठे शॉपिंग सेंटर आहे.हे शॉपिंग सेंटर पाडून हा रस्ता १०० फुटाचा यासाठी आंदोलने करण्यात आली.या आंदोलनाच्या सुरुवातीला मुख्याधिकारी यांनी या रस्त्याची रुंदी उपलब्ध नसल्याचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते.या पत्राच्या आधारावर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने दि.१९ सप्टेंबर रोजी शॉपिंग सेंटरमधील दुकानदारांना रस्त्याच्या मध्यभागापासून ५० फुटांपर्यंतचे अतिक्रमण काढून घेण्याच्या लेखी सूचना दिल्या होत्या.यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला होता.व्यापारी आपले दुकाने वाचविण्यासाठी न्यायालयात गेले होते.परंतू हा रस्ता १०० फुटाचा झाला पाहिजे.या मागणीवर मातंग समाज ठाम असल्याने प्रशासन हतबल झाले होते.एकीकडे मामा गायकवाड यांचे उपोषण सुरु असल्याने दिवसेंदिवस हा समाज आक्रमक होत असल्याने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत त्रिसदस्यीय समिती नेमवली होती.व सदरील उपोषण तहसीलदार यांच्या मध्यस्थीने सोडविण्यात आले.यात सदरील प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने शॉपिंग सेंटरमधील दुकाने बंद ठेवण्याचे आदेश राम बोरगांवकर यांनी दिले होते.त्यामुळे सदर दुकाने २५ दिवस बंद होते.
त्रिसदस्यीय समितीने चौकशी करुन हा रस्ता १८ फुट रुंदीचा असल्याचा अहवाल जिल्हाधिकारी यांना दिल्याने हा अहवाल न्यायालयात सादर करुन या अहवालावर आम्ही समाधानी असल्याचे सांगत सदर न्यायप्रविष्ट याचिका माघार घेतली.या संदर्भात मुख्याधिकारी राम बोरगांवकर यांनी दि.३० ऑक्टोबर रोजी तहसील कार्यालयात सकल मातंग समाज प्रतिनिधी,माजी सैनिक संघटना व व्यापरी यांची बैठक घेऊन अनाधिकृत बांधकाम करण्यात आलेले शॉपिंग सेंटर मधील दुकाना कालावधी १५ नोव्हेंबर रोजी संपत आहे.या लिलाव संपत असलेल्या दिवशी दुकाने खाली करण्याच्या सूचना दुकानदारांना दिल्या आहेत.लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा दर्शनीय भागात येण्यासाठी सदर दुकाने मागे सरकून बांधकाम करण्याचा ठराव माझ्या स्तरावर करणार या बैठकीत आश्वासन दिले असल्याने सुरू असलेला वाद तात्पुरता संपुष्टात आला आहे.

 

 

चौकट…..

 

महाराणा प्रतापसिंह चौक ते जाधव हॉस्पिटल हा रस्ता १९८० पासून राज्यमार्ग असून हा तेव्हापासून आजपर्यंत १०० फुट असल्याच्या नोंदी आहेत.सदर कधीही नगरपरिषदेच्या विकास आराखड्यात आला नाही.येथील नगरपरिषद प्रशासन व्यापाऱ्यांना वाचविण्यासाठी खोटा दावा करत आहे.हा रस्ता विकास आराखड्यात असला तरी या रस्त्याची नगरपरिषदेकडे रुंदी उपलब्ध नाही.असे असतांनाही प्रशासन वेगवेगळ्या पत्राच्या माध्यमातून कंधारकरांना व माजी सैनिक संघटनेची फसवणूक करत आहे.या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन पुरावे सादर करणार आहोत.व अनाधिकृत असलेले शॉपिंग सेंटर पडेपर्यंत शांत बसणार नाहीत.

 

बालाजी चुकलवाड
जिल्हाध्यक्ष माजी सैनिक संघटना
——————–

 

महाराणा प्रताप चौकातील परिसर हे शहरातील मुख्य ठिकाण आहे.महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल हा रस्ता तालुक्यातील अनेक मुख्य गावांना जोडला आहे.हा रस्ता शेजारील जिल्ह्यासह परराज्यांतील जोडलेला आहे.या रस्त्यावर बऱ्याचदा अपघात झाले असून त्यात निष्पापांना आपला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे अतिक्रमणात बांधण्यात शॉपिंग सेंटर पाडण्यात येवून हा रस्ता १०० फुटाचा होईपर्यंत मी गप्प बसणार नाही.

मारोती मामा गायकवाड कंधार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *