….. Romantic Morning..
माझा मुड कायमच दंगा करायचा असतो किवा रोमॅंटीक असतो.. रोमॅन्टिक लिहायचा विचार जरी मनात आला तरी सुकुन मिळतो.. रोमान्सची गोष्टच न्यारी
माठ असलेल्याना न कळणारी..
अगदीच काल्पनिक पण तुमची सकाळ रोमांचीत करणारी..
कल्पनाविलास आपण कितीही आणि काहीही करु शकतो ..
आणि क्षणात कुठेही पोचु शकतो.. कॅंप मधे एमजी रोडवर फिरताना त्याला वाटलं होतं , तिच्या नाजुक कमरेत मागुन हात घालावा पण कोणी पाहिल का या भितीने त्याने आवरतं घेतलं.. मार्जोरीनचं चटणी सॅण्डविच हा तिचा वीक पॉइंट आणि त्याने ते खाऊन पहावं ही तिची इच्छा.. तिथेही त्याला तिला एक घास भरवायची इच्छा होते पण……. अरे हा पण कधीच पाठ सोडणार नाही का ??.. आपण आपल्याला पाहिजे तसं कधीच वागु शकणार नाही का ?? … त्याने तिही इच्छा तिच्यापाशीं बोलुन दाखवली .. दोघांना एकमेकांच्या रोमॅन्टिक नजरा वाचु येत होत्या.. त्यात असलेलं प्रेम, हुरहुर जाणवत होती.. दोघेही हतबल होते कारण ….. पण…अरे यार …ते सोडा ना… ती संध्याकाळ नक्कीच प्रफुल्लित होती कारण वातावरणात आलेला हलकासा गारवा दोघांच्या नसानसातुन वाहुन गरम होत पुढे सरकत होता आणि माझ्यातील लेखिका नाजूक सोनेरी क्षण टिपत होती.. रोमान्स करणं जितकं सुखद आहे तितकच ते पहाणं हा एक प्रकारचा सोहळाच असतो.. भले ते काल्पनिक असलं तरीही मी माझ्या मनातली छबी माझ्या नेत्रपटलावर उमटवुन ती योग्य वेळी अधोरेखित करत असते.. माझ्यामते सुख म्हणजे योग्य वेळी हवी ती गोष्ट मिळणं.. भले तो एमजी रोड वरचा रोमान्स हाही त्यातलाच भाग.. नाहीतर सगळं एफ. डी . मधे बॅंकेत बंद आणि हातात …… ट्ण..
तिथेच असलेली बगीचा ही प्लेस तिलाही आवडली जी मलाही कायम आवडते कारण स्ट्रॉबेरी विथ क्रीम किवा सीझन ला मिळणारी मॅंगो विथ क्रीम .. काय केलं असेल बरं त्या दोघांनी ??.. ते तिथे गेले असतील का ??.. आपल्याला कल्पना करायला काय जातय ना.. नसतील गेले तर लेखणीतुन मी त्यांना घेउन जाईन आणि डाएट असलं तरीही मीही थोडं खाईन म्हणते.. खुप दिवसांत मीही कॅंपमधे गेले नाही म्हणुन लेखणीतुन हा आटापीटा.. अहो ,ते पहा दोघे त्या लाकडी दरवाजातुन आत जात आहेत.. तुमचे कॅमेरे तिकडेच असुद्या कारण आता मात्र ती त्याला भरवणार कारण , पण ,परंतु काहीच नको इथे… इथे पहायचय सुंदर निखळ प्रेम आणि मला स्ट्रॉबेरी क्रिमही खायचय.. एकमेकांना भरवुन दोघेही एकाच ग्लासवर तुटुन पडतात आणि मग ??.. सकाळी सकाळी तुमचं आपलं काहीही.. ते कारमधे बसुन आपापल्या घरी गेले असावेत बहुधा.. तुम्हीही काही कल्पनाविलास करा ना.. सगळच मी का सांगावं.. कदाचित त्यांनी शॉपिंग केलं असेल किंवा कारमधे हग तो बनता ही है ना.. त्याशिवाय ती डेट पूर्णच होउ शकत नाही आणि लेखही..
वाचकमित्रांनो.. सकाळी सकाळी गुलाबी थंडी आणि गुलाबी शब्द आणि वाचताना तुमच्या गालावर फुललेला गुलाबी गुलाब…तोही मी इथे बसुन पाहु शकते बरं..
Be Romantic while reading..वाचुन कामाला सुरुवात करा.. नाहीतर मागुन आवाज यायचा ,, अहो…..
सोनल गोडबोले..