डावं उजवं खा.. निरोगी रहा….

काल माझ्या मैत्रीणीच्या घरी तिने सगळ्याना फराळाला बोलावलं होतं.. तिची आई वय वर्षे फक्त ७५ आणि बाबा फक्त आणि फक्त ८४ .. बिल्डिंगला लिफ्ट नाहीउंच पायऱ्या रोज अनेकदा चढउतार.. डोक्यावर भरपुर केस.. चेहऱ्यावर सुरकुत्या नाहीत.. तुकतुकीत कांती आणि दोघेही हसतमुख..
गेली अनेक वर्षे ती आम्हाला ( गृपला ) फराळाला बोलावते आणि आग्रहाने खायला घालते.. घरातील धुणं भांडी , केर फरशी सगळी कामे त्या स्वतः घरी करतात त्याशिवाय फराळाच्या फराळाच्या अनेक ऑर्डर्स घेतात.. पेटी वाजवायला शिकतात.. उत्तम गातात.. कालही त्यांनी वरच्या पट्टीत सुंदर गाणं गायलं….हुश्य…. मला लिहीताना दम लागला पण त्यांना कधीही दमलेलं थकलेलं मी पाहिलं नाही.. माझे आई बाबा पण सेम असेच ..
या सगळ्या मागे काय रहस्य असेल बरं ??… फक्त आणि फक्त जेवणाचं ताट आणि घरातील सगळी कामे स्वतः करणं..
आपलं महाराष्ट्रीयन जेवण शुध्द शाकाहारी आणि डावं उजवं.. खुप जणाना डावं उजवं म्हणजे काय माहीत नसेल .. ताट वाढायची विशीष्ट पध्दत असते.. ताटात कधीही खरकटे हात धुवु नयेत त्याने अन्नपुर्णा देवीचा अपमान होतो आणि दुसरं म्हणजे जेवण संपल्यावर जी व्यक्ती ती ताटं उचलते तिच्या अंगावर किवा फरशीवर खरकटं पाणी पडण्याची शक्यता असते.. तुम्ही उजव्या हाताने जेवत असाल तर भाजी आमटीतला चमचा हा डाव्या हातानेच उचलायचा .. खुप ठिकाणी पाहिलं ते उजव्या हातानेच चमचा उचलतात त्यामुळे तुमचे उष्टे हात त्या चमच्याला लागतात आणि तोच चमचा दुसऱ्याने उचलला की ते उष्ट त्याच्या हाताला लागतंआणि चारचौघात ते चांगलही दिसत नाही..
ताट वाढताना डाव्या हाताला चटणी कोशींबीर वाढायची आणि उजव्या हाताला भाजी , उसळ .. वरणभात पोळी मधे असं संपूर्ण ताट सगळ्या रसानी भरलेलं असायला हवं.. तुप लिंबु ताक किवा दही असं ताट रोज ज्याच्या घरात असतं तो कायम निरोगी रहातो.. सात्विक आहार सात्विक विचार आणि स्वतः जमेल तेवढी कामं आणि रोज चालणं इतकं जरी प्रत्येकाने केलं तरीही वेगळ्या कुठल्याही सप्लीमेंटची गरजच नाही.. जमेल तेव्हा जिने चढउतार असेल .. इंडीयन टॉयलेट हाही उत्तम पर्याय आहे…. माझ्याकडे मेड आहे हे कौतुकास्पद नक्कीच नाही तर मी नाव पैसा कमवुन स्वतः शिजवून कुटुंबाला खायला घालते आणि जास्तीत जास्त वेळा घरी जेवते यासारखं सुख नाही.. आमच्याकडे आम्ही सगळी कामं घरीच करतो.. फॉरेन ला कुठे मेड असते.. कितीही मोठ्या पदावरील व्यक्ती स्वतः काम करते.. ज्यांना अजिबात शक्य नाही त्यांच्यासाठी ठिक आहे पण स्त्रीयांनी स्वयंपाक घरात जायचा आळस अजिबात करु नये.. आणि आईने मुलीसारखं मुलालाही सगळं शिकवावं म्हणजे तोही बायकोला मदत करु शकतो.. आमच्याकडे माझे भाऊ भाचे आणि नवरा सगळेजण सगळी कामे करतात.. स्त्री पुरुष हा भेदभाव नाही त्यामुळेच प्रत्येकजण सुखी आनंदी आहे .. त्यामुळे आहारात चटण्या कोशींबीरी या असायलाच हव्यात…
माझ्या स्वयंपाकघरात चॅंटीग बॉक्स लावलेला आहे त्यावर हरे कृष्णचा मंत्र सतत चालु असतो त्यामुळे कुकींग करताना त्या मंत्राचा परिणाम त्या अन्नावर होतो… मंदिरातला प्रसाद का टेस्टी लागतो त्याचं कारण हेच आहे… महागडं इंटीरीअर घरात करण्यापेक्षा छोट्या गोष्टी घरात खुप मोठा बदल घडवुन आणतात.. आपले विचार हाच मोठा डॉक्टर आणि आहार हे औषध .. पुर्वीचे लोक प्रवासाला जाताना शिदोरी सोबत घेउन जायचे त्याचं कारण हेच होतं.. आपण विचारानी मॉडर्न व्हायचं आहे पण जुन्या परंपरा सोडुन नाही तर सोबत घेउन पुढे जायचय..
सोच बदलो.. देश बदलेगा..

 

सोनल गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *