नाका वरचा एकेक मोती तोलायला
आणि नथीचा नखरा करायलाही बाईच व्हावं लागतं!
कारण घेतलेला दागिना, मिरवण इतकं सोप्प नसतं ते….
गळ्यात शोभते माळ
अन् पायांत वाजतं पैंजण,
छेडती धुंद मधुर सूर गं!
कपाळी शोभते टिकली
अन् डोळ्यांत दिसतं लाजणं,
गालांवर हसू गोड गं!
नाकात नटली नथ
अन् ओठात दडलं चांदणं
रूपात जडला साज गं!
केसांत गुंफूला गजरा
अन् डोळ्यांत काजळाच रानं
श्वासत मोहरला गंध गं!
भाव भोळे चेहऱ्यावरती,
अन् भाळी विधीच पानं
आयुष्याच लेणं किती गोड गं!
देह चंदनाची उटी
अन् उन्हांत आलं त्राणं
देण्यास सावलीचा अंश गं!
—–रूचिरा