कंधार ; दिग्रस बु. येथे आनंद तरंग काव्यसंमेलन भरले होते. कंधार ,नांदेड ,उदगीर आणि आसपासच्या परिसरातील कवी या काव्यसंमेलनात सहभागी झाले होते. वेगवेगळ्या विषयावर आधारित कविता कवींनी सादर केल्या. खुमासदार , विनोदी कविता ,प्रेम विरहाच्या कविता , शेतकरी दुष्काळाच्या कविता ,वैचारिक ,गंभीर विषयावर कविता कवींनी सादर केल्या. या काव्यमैफिलीला दिग्रस व परिसरातील रसिकांनी भरभरून दाद दिली.
या काव्यसंमेलनात कवी सतीश यानभुरे यांच्या जिवंत माझं दिसणं या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. सदर काव्यसंमेलनाचे आयोजन कवी सतिश यानभुरे ,जयवंत यानभुरे ,विकास यानभुरे यांनी केले होते. ग्रामीण भागातील साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी , त्यांच्यातील प्रतिभांना संधी देण्यासाठी अशा काव्यसंमेलनाचे ,पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन हे निश्चित कौतुकास्पद आहे आणि जिवंत माझं दिसणं हा काव्यसंग्रह आपल्या असण्याची ,अस्तित्वाची , सामाजिक विषयावर प्रकाश टाकणारा आहे असे प्रतिपादन काव्यसंमेलनाचे अध्यक्ष चंद्रशेखर कळसे यांनी केले.कवी सतीश यानभुरे यांनी गावातील वाचनालयास जिवंत माझं दिसणं या काव्यसंग्रहाची भेट अंबादास कुलकर्णी यांनी दिली. प्रा.जयवंत यानभुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सुत्रसंचालन प्रा.एम. जे.वाघमारे यांनी केले.
काव्यसंमेलन आणि पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड , अंकुश शिंदगीकर , एन.डी. राठोड, आनंद चिंचोले ,श्रीगण रेड्डी ,बाळासाहेब मुंढे, प्रिया कदम अशा पन्नास कवींनी उपस्थिती लावून अप्रतिम काव्य सादरीकरण केले. गावातील मा.उपसरपंच विश्वांभर पाटील , मा सरपंच अप्पाराव पाटील, पंडित भुरे, मारोतीभाऊ गवळे , अंबादास कुलकर्णी, पोलीस पाटील नागेश जोगपेठे , ,संतोष पाटील तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.