खरं तर हा दिन असायलाच हवा.. जरी महिला दिनाइतका त्याचा उदोउदो झाला नाही तरीही प्रत्येक स्त्रीच्या मनात त्याच्या बद्दल आदर हा असायलाच हवा.. आईने आपल्या नवऱ्याचा आदर केला तर मुलगीही तिच्या नवऱ्याचा आदर करेल.. पुरूष वाईटच अशी कुठलीही वक्तव्ये मुलीसमोर करु नयेत नाहीतर लहानपणीच तिच्या मनात पुरुष वाईट ही संकल्पना बिंबवली जाते.. पुरूष वाईट असेल तर मग आपला मुलगाही वाईटच.. आपला भाऊही वाईटच या सगळ्याचा सारासार विचार करुन आपण घरात किवा समाजात बोलावं..
मी लहानपणापासूनच पुरुषांमधेच वाढले , खेळले , बागडले.. आमच्या घरात पुरूषच पुरूष .. अगदी आजोबा बाबा काका भाऊ सगळेच मित्र.त्यांचे मित्र हेही माझे मित्र..
शाळेतही मित्र आणि कॉलेजमधेही मित्रच.. आणि आता तर मी रोज पुरुषांमधेच असते.. माझ्या आठवणीत एकाही पुरुषामुळे मला एकदाही कसलाही त्रास झाला नाही अगदी सोशल मिडीयावर सुध्दा नाही.. अनेक पुरुषांत वावरत असताना मला जास्त सिक्युरिटी जाणवली .. प्रचंड प्रेम , आदर , मैत्री ही सगळी नाती मला यांच्यामुळेच मिळाली..मी माझ्या मुलीला कायम सांगते फक्त मुलीन्मधेच राहु नकोस.. नाहीतर तुला पुरूष कळणार नाही… मुलांना जाणुन घे म्हणजे तु तुझ्या नवऱ्याला समजुन घेउ शकशील.. मी लहानपणापासून मुलान्मधे राहिल्यानेच कदाचित मला सचिन संपूर्ण समजला.. त्यामुळेच आम्ही चांगले मित्र आहोत..
पुरूष ही निसर्गाची सुंदर कलाकृती आहे.. त्या कलाकृतीचा आदर करणे म्हणजेच भगवंताचा आणि निसर्गाचा आदर करणे .. पुरूष वाईट म्हणणाऱ्या स्त्रीयांना सांगावं वाटतं , आपल्या वागण्या बोलण्यावर किवा कृतीवर सगळं अवलंबून असतं.. जे पेरु तेच उगवतं.. आपल्याला आपले बाबा ,,भाऊ आवडतात मग नवरा का नाही ??.. त्यानेही स्त्रीच्याच पोटी जन्म घेतलाय ना.. या जगात कोणीही आणि काहीही वाईट नाही मग पुरूष वाईट कसा ??..
माझ्यावर प्रेम करणारे माझे चाहते , वाचक , मित्र ,हितचिंतक , नातेवाईक , माझा नवरा आणि माझं आयुष्य ज्यानी ज्यानी सजवलं , घडवलं त्या सगळ्या पुरुषांना आजच नाही तर कायमच सलाम आणि असेच माझ्या आयुष्यात सावली बनुन रहा आणि मीही तुमचा कायम आदर करेन.. चुकून माझ्याकडून कोणाला काही वाईट बोललं गेलं असेल तर मनापासून माफी मागते..
सोनल गोडबोले