एका wp गृपवर काल मिसयुनीव्हर्सवरुन चर्चा सुरु होती..८० किलो वजनाची स्त्री स्पर्धेत उतरते त्यावरुन चाललेला चिवडा माझ्या वाचनात आला.. आता सकाळी योगा करत असताना मी उठा बश्या काढत होते .. जमीनीवर हात न टेकता मला उठबस करता येते म्हणजे मी फिट आहे.. मी इंडीयन टॉयलेट मधे बसउठ करु शकते म्हणजे मी फिट आहे..
मी खाली बसुन कपडे धुवु शकते किवा भांडी खाली बसुन घासु शकते , फरश्या घासु शकते , माझे हात खाली वाकल्यावर पायाला लागतात किवा डोकं गुडघ्याना लागतं म्हणजेच मला पोट नाही आणि मी फ्लेक्झीबल आहे असही होवु शकतं.. इंटरकोर्स करताना अनेक पोजेसचा मी सहज आनंद घेउ शकतो / शकते म्हणजे मी फिट आहे .. कुठलही काम करताना माझं पोट मधे येत नाही आणि छोट्या कामाने थकायला होत नाही म्हणजे मी फिट आहे.. यातलं कोणाकोणाला काय काय जमतं पहा कारण आपण सगळे मिसयुनीव्हर्स होणार नाहीत पण मिसहेल्दी ,मिसॲक्टीव्ह , मिसॲट्रॅक्टीव्ह , मिसप्रमाणबध्द , मिसउत्तम बायको , उत्तम आई या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्यात गरजेच्या आहेत..
जाड म्हणजे हेल्दी हा शब्द मुळात चुकीचा वापरला जातो.. त्याला ओबेस , फॅटी , बल्की असे शब्द आहेत.. हेल्दी म्हणजे निरोगी मग ती व्यक्ती जाड किवा बारीक कशीही असो.. जाड म्हणजे कुरुप नाही आणि स्लीम म्हणजे सुंदर नाही.. ठरावीक उंचीला ठरावीक वजन असणं आणि त्यानुसार कंबर छाती हिप्स याची परिमाणं असणं हे दिसण्यासोबत आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहेत म्हणुन आपल्या जाडीचे कोणीही समर्थन करु नये.. हातात मोबाईल घेउन बसुन कोणीही फिट रहाणार नाही तर त्यासाठी मेहनत घ्यावी लागते.. तोंडावर ताबा हवा आणि काय कधी किती खावं याचा अभ्यास हवा.. प्रत्येक माणसाची हेल्थ,कामाची पध्दत , आणि कुठल्या हवामानात ती व्यक्ती रहाते यानुसार डाएट बदलतं.. काहीतरी आजार असलेली व्यक्ती सोडली तर इतर सगळ्यानी कुठल्या ना कुठल्या प्रकारचा व्यायाम हा करायलाच हवा.. माणुस जसा आपोआप जाड होत नाही तसाच तो आपोआप बारीकही होत नाही.. मला फराळ करायला वेळ मिळाला मग व्यायामाला का मिळु नये ??
मला शॉपिंगला वेळ मिळाला मग व्यायामाला का मिळु नये ??
मी पार्टीला गेटटुगेदरला जाऊ शकते तर व्यायाम का करु शकत नाही ??
मी अनेक कामे करते पण व्यायामाला वेळ का नाही हे प्रश्न प्रत्येकाने आपल्यालाच विचारायचे आहेत कारण योग्य उत्तर आपल्याकडेच मिळेल.. फक्त आणि फक्त आळस हेच याचं उत्तर आणि शरीर फुकट मिळालय त्याची किम्मत नाही हीच याची उत्तरे आहेत..
ज्यांना तब्बेतीच्या काही तक्रारी आहेत त्यांनी डॉक्टर किवा आहारतज्ञ यांच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम करावा .. इतर मंडळी कुठल्याही वयोगटातील असुदेत त्यांनी व्यायाम आणि आहार यात बदल करत रहावा म्हणजे कंटाळा येत नाही आणि प्रत्येक व्यायामाचे वेगवेगळे फायदे आहेत त्याचा लाभही मिळतो.. काही जणांची अप्पर बॉडी चांगली असते तर काही जणांची लोअर बॉडी चांगली असते.. पण डोक्यापासून पायापर्यत जिथे जे हवे ते असेल तर कुठल्याही कपड्यात आपण चांगले दिसतो आणि विशेष म्हणजे पहाणाऱ्यालाही छान वाटतं.. वाढणारी ढेरी म्हणजे हृदयावर प्रेशर .. वाढणारी कंबर पोट म्हणजे गर्भाशयावर ताण , मासिकपाळीच्या समस्या , शुगर , बीपी म्हणून आपण वजन आटोक्यात ठेवायचे .. मिसयुनीव्हर्स वर चर्चा करुन वेळ वाया घालवण्यापेक्षा आपण कसे आहोत .. आपल्या आरोग्यासाठी आपल्याला काय करायचय आणि Nothing is imossible हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं तर मला नाही वाटत आपण आपल्या जाडीचं समर्थन करावं तर ते आटोक्यात ठेवण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत हेच योग्य आहे..
सोशल मिडीयावर कुचाळक्या करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा तो वेळ सत्कारणी लावला तर फायदा आपलाच आहे.. रात्री लवकर झोपलो तर सकाळी लवकर उठु शकतो आणि संध्याकाळी लवकर जेवलो तर रात्री लवकर झोपु शकतो.. simple फंडा.. कोणीही स्वतःला कमी लेखु नये पण दुसऱ्याकडुन चांगल्या गोष्टी वेचायला मागेही राहु नये..Be happy and healthy forever..
तळटिप.. सगळ्यात महत्वाचे म्हणजे निरोगी मन.. सुंदर सोल
सुंदर विचार..
सोनल गोडबोले..