इंदिरा पर्व

 

” *एका कणखर नेतृत्वास मानाचा मुजरा..*”
१९ नोव्हेंबर आज स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधीजींची जयंती.
इंदिराजीं चा जन्म प्रसिद्ध प्रभावशाली राजकीय नेहरू कुटुंबात १९ नोव्हेंबर १९१७ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण अलाहाबाद येथे घेतले. पुढील शिक्षणासाठी साठी पुणे मुंबई शांतिनिकेतन तसेच समरव्हील महाविद्यालय स्विझर्लंड येथे त्या गेल्या.
वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी साबरमती आश्रमास भेट दिली. त्याठिकाणी आपल्या आई-वडिलांसह काही दिवस राहिल्यामुळे महात्मा गांधींजींचा सहवास त्यांना लाभला.अगदी लहान वयातच त्यांनी चरखा संघ व मुला मुलींची वानरसेना स्थापन करून महात्मा गांधीजींच्या सविनय कायदेभंग चळवळीस मदत सुद्धा केली. यावरून आपण म्हणू शकतो की वयाच्या बाराव्या वर्षापासूनच इंदिरा गांधीजींनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला. कारण नेहरू कुटुंबाचा राजकीय सामाजिक आणि स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग होता. नेहरूजींच्या घरी महात्मा गांधीजींचे नेहमी येणे जाणे असे.भारत स्वातंत्र्य चळवळीबद्दल होणारी सकारात्मक चर्चा ऐकूण , आपल्या कुटुंब त्यासाठी देणारे योगदान पाहून. इंदिरा गांधीजींना ही लहानपणी राजकारणाची आवड निर्माण झाली असावी असे म्हणणे वावगे होणार नाही.
‌ परदेशातून आपले उच्च शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर इंदिरा गांधीजीं पुन्हा देशाच्या राष्ट्रीय चळवळीत सक्रिय सहभागी झाल्या.१९२० मध्ये इंदिरा गांधी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सदस्य झाल्या. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी पदभार स्वीकारला. आपल्या वडिलांसमवेत काँग्रेस सरकारमध्ये इंदिराजींनी मोठी भूमिका बजावली होती. तसेच आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी” द नॅशनल हेरॉल्ड ” या वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही इंदिराजींनी काही काळ काम पाहिले होते.
१९५९ हे इंदिरा गांधीजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा झाल्या.
१९४१ मध्ये वडिलांचा विरोध‌ पत्कारून फिरोज गांधी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.
इंदिराजींना संजीव गांधी व राजीव गांधी अशी दोन मुले झाली.
८ सप्टेंबर१९६० रोजी फिरोज गांधी यांचे निधन झाले. त्यापाठोपाठ 27 मे 1964 रोजी पंडित जवाहरलाल नेहरूंचे सुद्धा निधन झाले यानंतर मात्र इंदिरा गांधींनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आणि त्या प्रचंड मोहन बहुमताने जिंकून सुद्धा आल्या माननीय लाल बहादूर शास्त्री यांनी स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला त्यांच्या सरकारमध्ये इंदिरा गांधीजींना माहिती व प्रसारण मंत्रालय देण्यात आले.
११जानेवारी १९६६ रोजी लाल बहादूर शास्त्री यांची निधन झाले. यानंतर काँग्रेस पक्षाच्या संसदीय निवडणुकीत आपले प्रतिस्पर्धी मा.श्री.मोरारजीभाई देसाई यांच्याविरुद्ध निवडणूक जिंकून इंदिराजींनी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वतःकडे घेतली आणि इथूनच खऱ्या अर्थाने इंदिरा पर्व सुरू झाले.
१९६७-६८ मध्ये इंदिरा गांधीजी फ्रान्सच्या सर्वाधिक लोकप्रिय नेत्या तसेच १९७१ साली त्या जगातील सर्वात लोकप्रिय महिला होत्या.
१९७२ भारतरत्न हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला. तसेच स्वतंत्र बांगलादेश साठी मेक्सिकन अकादमी चा पुरस्कार, अमेरीकेचा मदर पुरस्कार, नागरी प्रचारिणी सभेकडून “साहित्य वाचस्पती” हिंदी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
इंदिरा गांधींनी अनेक क्षेत्रात मोलाचे योगदान दिले . विशेष लौकीक ही मिळवला.त्यांना लेखनाची सुद्धा आवड होती.त्यांची काही प्रमुख प्रकाशित .. द इयर्स ऑफ चॅलेंज (१९६६-६९), द इयर्स ऑफ इंडेवर (१९६९-७२), इंडिया (लंडन) १९७५, इंडे(लॉसेन) १९७९, तसेच अनेक लेख त्यांची गाजलेली भाषणे विविध संग्रह यामध्ये समाविष्ट आहेत.
१९७०-८० मध्ये इंदिराजींनी भारताच्या आर्थिक आणि राजकीय विकासासाठी महत्त्वाचे योगदान दिले. काळात त्यांनी बँकांची राष्ट्रीयकरण केले.
३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी भारताविरुद्ध युद्धाची घोषणा केली. भारतीय सैनिकांनी 14 दिवस युद्ध करून‌ पाकिस्तानचा पराभव केला. पूर्व व पश्चिम पाकिस्तान‌ मधीली यादवी संपवली. आणि भारताने बांगला देशाला प्रथम मान्यता दिली.
१८ मे १९८४ रोजी पोखरण येथे भारताने पहिले परमाणु परीक्षण केले. या दिवशी बुद्ध जयंती होती आणि या ऑपरेशनचा कोड वर्ड “स्माईलींग बुद्धा” असा होता. विशेष म्हणजे भारत हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा सदस्य नसताना सुद्धा इंदिराजींनी परमाणु परीक्षण करण्याचे साहस केले व त्या यशस्वी सुद्धा झाल्या .
एकूणच काय तर एक आणीबाणी सोडली तर इंदिराजींची संपूर्ण राजकीय व सामाजिक कार्यकर्तेही सर्वांना प्रेरणादायी अशीच आहे महिला सक्षमीकरण परदेशी वस्तूंवर बहिष्कार,१४ बँकांचे राष्ट्रीयीकरण, संस्थानिक राजांचे भत्ते बंद केले,तसेच१९७२मध्ये विमा कोळसा उद्योगांचे राष्ट्रीयीकरण केले समाज कल्याण क्षेत्रात ,अर्थशास्त्र. जमीन यामध्ये अनेक नव्या तरतुदी व सुधारणा केल्या.
अशा या अत्यंत प्रभावशाली राजकारणी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न श्रीमती. इंदिरा गांधीजींचा बीसीसी ने १९९९ मध्ये “वुमन्स ऑफ द मिलेनियम” असा किताब देऊन त्यांना पुरस्कृत केले तसेच २०२० मध्ये शंभर शक्तिशाली महिलांमध्ये टाईम मासिकाने इंदिरा गांधीजींची महत्त्वपूर्ण दखल घेतली.
इंदिरा गांधीजींनी १९६६-८४ या दरम्यान सलग तीन वेळा देशाचे पंतप्रधान‌पद भूषविले. इंदिरा गांधीजीं आपल्या भाषणात नेहमी सांगायच्या “तुम्ही काम करताना स्थिर राहायला आणि विश्रांती घेताना सक्रिय राहायला शिकले पाहिजे.”
याप्रमाणेच त्या आपल्या सरकारमध्ये आपल्या सोबत काम करणाऱ्या मंत्र्यांचा सुद्धा त्या फार आदर करायच्या. हा किस्सा है १९८३ च्या वर्ल्ड कप फायनल मॅचचा. १९८३ मध्ये ज्या दिवशी वर्ल्डकप फायनल मॅच इंग्लंड मध्ये खेळली जाणार होती त्यावेळी इंग्लंडमध्ये भारतीय शिक्षण मंत्री सिद्धार्थ शंकर रे उपस्थित होते आणि योगायोगाने आपला भारत हा फायनल मध्ये खेळणार आहे. म्हणून सिद्धार्थ शंकर लेणी आयोजकांना दोन तिकिटे मागितली आणि किती उपलब्ध असताना सुद्धा आयोजकांनी तिकिटे देण्यास नकार दिला. जेव्हा ही गोष्ट इंदिराजींना समजली तेव्हा त्यांनी आपले राजकीय वजन, पद वापरून क्रिकेट वर्ल्ड कप ची स्पर्धाच भारतात आणली.क्रिकेटच्या जन्मस्थान इंग्लंड पासून वर्ल्ड कप दूर आणणे सोपं नव्हतं. तरी हे इंदिरा गांधींनी करून दाखवलं.
आजचा हा सुवर्णयोग फारच छान जुळून आला आहे .19 नोव्हेंबर ही इंदिरा गांधीजींची जयंती तसेच 19 नोव्हेंबर रोजी “नरेंद्र मोदी स्टेडियमवर ” अहमदाबादमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कप फायनल मॅच होणार.
‌२०२३ चा‌ क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून भारत आपल्या आयर्न लेडी भारतरत्न श्रीमती इंदिरा गांधी यांना समर्पित करेल हीच शुभेच्छा.

लेखिका
(@अंजुमन)
सौ.अंजली मनोज मुनेश्वर
मो.नं.९६३७११६५५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *