डाकटर,तुम्ही सुद्धा..?

डाकटर,तुम्ही सुद्धा..?

सुंभ जळाला तरी पीळ जात नाही असे म्हटले जाते.त्याचे आकलन होणे गरजेचे आहे.सुंभ बाज(चारपाई) विणणे करिता पूर्वी वापरले जायचे.नदी किंवा पाणथळ जागेत वाढलेल्या लव्हाळींचा वापर करून सुंभ ओळले जातअसेे.खूप मेहनतीचे काम आहे स्मशानात…राख भरताना…सुंभाचा पीळ जसाचा तसा दिसायचा .कदाचित प्रवूत्तीचेही तसेच असावे…माणसे आपला विखार सोडत नाहीत.

गर्भातच लेकींच्या नरडयाला नख लावणारया सुशिक्षित पालकांना हेल्प करणारे बीडचे कुप्रसिद्ध डाक्टर सुदाम मुंडे साहेबांना पुन्हा एकदाअटक झाली आहे.ही बाब खूपच गंभीर आहे.
प्रगत समाजास आधुनिक सुखसोयी मिळत गेल्या.तसे सधन,प्रतिष्ठित मंडळींना मुली नकोशा झाल्या.
आईच्या पोटातल्या स्वत:च्या लेकींबाबत समाजात किती क्रौर्य?त्याला प्रगत तंत्र ्जानाने हातभार लावला.काही निर्दयी
डाक्टरांचा हा अवैध धंदा राजरोस सुरू राहिला.

एकदा समज दिल्यावर सुधरेल तो माणूस कसला?
मुलींचे पिंड पाडणारा कुप्रसिद्ध डाक्टर खूप बदनामी झाल्यानंतरही पुन्हा एकदा त्याच मार्गावर येतो ही मोठी अधोगती आहे.
डाक्टर,तुम्ही सुद्धा..?याच नावाचे नाटककार अजित दळवी यांचे नाटक खूप गाजले होते.रक्षकच भक्षक ठरतो तिथे काय उज्ज्वल भविष्य असणार आहे.केवळ वैदयकीय क्षेत्रातल्याच डाकटरांना नव्हे तर आपआपापल्या आवडीच्या क्षेत्रात संशोधन करूनही अधोगतीला आवरू न शकणारया सर्व प्रकारच्या डाक्टरांच्या नापासीबद्दल त्यांना विचारण्याची वेळ आली आहे. लोकहित जपणारयांना वेडयात काढणारया शानदार लोकांचे चेहरे समाजासमोर येण्याची गरज आहे.समाजहितैषी समुपदेशक,सुधारकआणि समाजसेवकांची समाजातली चलती का बंद झाली?जागतिकीकरण स्वीकारल्याने लोकही कार्पोरेट झाले की काय? मग समाजहिताचे काय?खाजगीकरणाचा उदो उदो करत जनहिताला तिलांजली दयायला सरकारी यंत्रणा का सरसावत आहेत?
सार्वजनिक हिताचे संकल्प संपविणारे असोत की मुलींचे कोवळे कोंब गर्भातच मारणारे असोत या देशद्रोहयांचा बीमोड सरकार नि समाजाने करावा.जेणेकरून नव्या पिढींना सांगता येईल…आम्ही जीवदान देणारे आहोत,जीव घेणारे नाहीत’.
नाही तरी आम्ही किती दिवे लावले याऐवजीआम्ही कोणकोणते किती दिवे विझवले?याचा लेखाजोखा मांडला तर नवी पिढी आपणांस नक्कीच माफ करणार नाही एवढे निश्चित..!


बळी आंबुलगेकर,नांदेड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *