छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपने साजरा केला संविधान दिवस

 

अहमदपूर ;(  प्रा भगवान आमलापुरे )

संपूर्ण भारतभर आज संविधान दिन साजरा केला जात आहे
26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला बहाल केले.
एक जानेवारी 1950 पासून भारतीय संविधान हे संपूर्ण भारतभर लागू करण्यात आले.

छत्रपती शाहू राजे योगा ग्रुप अहमदपूर ने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी संविधान दिन साजरे केले. छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे अध्यक्ष एन डी राठोड यांनी घटनाक्रमासहित भारतीय संविधानाचे महत्त्व पटवून दिले. छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे सन्माननीय सदस्य श्री विलास पडिले यांनी संविधानातील उद्देशिकेचे वाचन केले.

त्यानंतर उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले
यावेळी सन्माननीय सदस्य तुकाराम आगलावे, मधुकरराव जोंधळे, बी.डी कांबळे. दासराव कांबळे, ज्ञानोबा गायकवाड, संजय कलमे, ह भ प संजय महाराज नागपूरने वाढवणकर,
डी एस वाघमारे, राजकुमार वाघमारे, शिवाजीराव सूर्यवंशी, गणेश वाघमारे,
माधव तिगोटे, रा सु कांबळे, विनायक कदम, बापूराव कल्पले,
एन डी कुमठेकर, इंजिनीयर इर्लापल्ले, सरपंच कच्छवे इत्यादींनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सन्माननीय सदस्य अविनाश मंदाडे यांनी केले तर आभार रावसाहेब वाघमारे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *