सद्दपरिस्थितीत हळद वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे सध्या हळदीवर करपा, पानावरील ठिपके आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे.
हळदीमधील पानावरील ठिपके आणि करपा व्यवस्थापन करण्यासाठी खालील प्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे.
१. करपाजन्य रोगग्रस्त पाने वेळोवेळी जमा करून जाळून नष्ट करावीत आणि शेतात स्वच्छता राखावी.
२. रासायनिक व्यवस्थापन खालील प्रमाणे करावे.
प्रादुर्भाव कमी असल्यास
कार्बेडेंझीम ५० टक्के – ४०० ग्रॅम किंवा
मॅन्कोझेब ७५ टक्के -५०० ग्रॅम किंवा
कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के – ५०० ग्रॅम यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.
बाजारातील नावे :-
कार्बेडेंझीम ५० टक्के – बाविस्टिन,धानुस्टिन
मॅन्कोझेब ७५ टक्के – डायथेन एम-४५,युथेन एम-४५, मॅकोबन एम-४५
कॉपर ऑक्झीक्लोराइड ५० टक्के – ब्लू कॉपर,ब्लिटॉक्स,धानूकॉप
प्रादुर्भाव जास्त असल्यास
एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – २०० मिली किंवा
प्रोपीकोनॅझोल २५ टक्के – २०० मिली किंवा
क्लोरथॅलोनील ७५ टक्के – ५०० ग्रॅम
यापैकी एका बुरशीनाशकाची प्रति एकर याप्रमाणे सोबत स्टिकर मिसळून फवारणी करावी.
बाजारातील नावे :-
एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) – ॲमिस्टार टॉप, गोडीवा सुपर, प्रोपीकोनॅझोल २५ टक्के – टिल्ट, विजेता, प्रोपार, बंपर
क्लोरथॅलोनील ७५ टक्के – कवच, जटायू, इशान, सिनेट
मा.तालुका कृषी अधिकारी श्री रमेश देशमुख साहेब , नांदेड