नांदेड ; 26/11/2023 रोज रविवार या दिवशी द्वितीय वर्षाच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत रोग निदान व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. रोगाने त्रस्त असणारी सर्वसामान्य जनता सर्व आजार अंगावर काढत असतात. अशाच सर्वसामान्यांसाठी हे मोफत रोग निदान व मार्गदर्शन शिबिर डॉ.श्रीकांत झंवर(हृदय विकार तज्ञ नांदेड) यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये आयोजित करून समाजातील सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यातील आजारावरच्या समस्या जाणून घेवून,त्यावर चिकित्सक असे योग्य मार्गदर्शनही करण्यात आले.
त्यांच्या समस्यांचे निराकरण करून समाजातील अनेक कुटुंबांना सखी जीवनाचा मंत्र सांगण्यात आले. हल्लीच्या काळात खान-पान (सवयी) मुळे होणारे हृदय विकार हे जास्त प्रमाणात फोफावत आहे.या शिबिराच्या माध्यमातून आरोग्याच्या दृष्टीने जागरूक नागरिकांनी या शिबिराचा पुरेपूर फायदा घेतला आहे. डॉक्टर श्रीकांत झंवर यांचा जन्म सर्वसामान्य कुटुंबात झाला. आणि ते चिकित्सक व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले नामांकित हृदयविकार तज्ञ डॉक्टर आहेत.सर्व सामान्य कुटुंबाची परिस्थिती काय असते. याचा त्यांना चांगलाच अभ्यास आहे. म्हणूनच ते आदित्य हार्ट क्लिनिक & EECP सेंटर डॉक्टरस लेन नांदेड(एस.बी.आय बँके शेजारी) च्या द्वितीय वर्धापनाच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेची सेवा आपल्या हातून घडावी हा त्यांचा माणस होता.
आणि सर्वसामान्यांचे हृदयाच्या आजारा विषयीचे दुःख नाहीसे करून, त्यांच्या जीवनात आनंद मिळवून देण्याचे असे उत्कृष्ठ काम हाती घेवून, समाजात आरोग्य विषयी निरोगी निरामय वातावरण निर्माण करण्याचा हा छोटासा प्रयत्न सामाजिक बांधिलकी जपणारा आहे.या सामाजिक कार्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.