नांदेड- तेलंगणा राज्यात उद्या गुरुवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुक मतदान बंदोबस्तासाठी नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांची ८०० जणांची टिम तैनात करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या तेलंगणा राज्याची निवडणूक प्रक्रिया सुरू असून उद्या गुरुवार दि.३० नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे.सदरील निवडणुक बंदोबस्तासाठी तेलंगणा राज्याकडून महाराष्ट्र सरकारकडे ५००० होमगार्ड पुरविण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार पोलीस महासंचालक तथा होमगार्डचे महासमादेशक डॉ. भूषणकुमार उपाध्याय व अप्पर पोलीस महासंचालक तथा होमगार्डचे उपमहासमादेशक प्रभातकुमार यांनी यवतमाळ,वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातून पाच हजार होमगार्ड तेलंगणा राज्याला बंदोबस्तासाठी पुरविण्यात यावेत असे आदेश त्या त्या जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक यांना दिले होते.
सदर जिल्ह्यांपैकी वर्धा व नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे प्रत्येकी ८०० होमगार्ड देण्यात याव्यात अशी सूचना होमगार्ड मुख्यालयाने केली होती.
नांदेड जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अबिनाशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रनायक अरुण परिहार व सामुग्री सुभेदार राम पिंजरकर यांनी बंदोबस्ताचे नियोजन करून प्रत्येक पथकाला होमगार्ड पुरविण्याचे नियोजन तयार करून दिले होते.
त्यानुसार नांदेड पथकाचे समादेशक अधिकारी प्रकाश कांबळे यांनी ४ पर्यवेक्षक अधिकारी व ३२० होमगार्ड जवान,कंधार पथकाचे प्र.समादेशक अधिकारी गुंडेराव खेडकर यांनी ३ पर्यवेक्षक अधिकारी व ७० जवान,हदगाव पथकाचे समादेशक अधिकारी मधुकर वानखेडे यांनी ४ पर्यवेक्षक अधिकारी व ७० जवान,बिलोली पथकाचे समादेशक अधिकारी खंडू खंडेराय यांनी २ पर्यवेक्षक अधिकारी व ८० जवान,मुखेड पथकाचे प्र.समादेशक अधिकारी कैलास पाटील यांनी ५५ जवान,देगलूर पथकाचे प्र.समादेशक अधिकारी अशोक पैलावार यांनी ३ पर्यवेक्षक अधिकारी व ५५ जवान,भोकर पथकाचे प्र.समादेशक अधिकारी शेख अनवरोदीन यांनी २ पर्यवेक्षक अधिकारी व ५५ जवान आणि किनवट पथकाचे समादेशक अधिकारी संजय बोनापुलकुडगेवार यांनी १ पर्यवेक्षक अधिकारी व ७५ होमगार्ड जवान अशी एकूण ८०० होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांची मोठी टिम सोमवार दि.२७ नोव्हेंबर रोजी निझामाबाद जिल्ह्यात रवाना केली आहे.
या बंदोबस्ताचे नेतृत्व संपर्क अधिकारी केंद्रनायक अरुण परिहार व सामग्री प्रबंधक सुभेदार राम पिंजरकर हे करीत आहेत. निजामाबाद जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गावांमध्ये मतदान केंद्रावर तसेच सेक्टर पेट्रोलिंग व इतर बंदोबस्तासाठी अधिकारी व होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. तेलंगणा पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून उद्या होणाऱ्या मतदानासाठी नांदेड जिल्ह्यातील ८०० होमगार्ड अधिकारी व कर्मचारी यांची टीम सज्ज झालेली आहे.
बंदोबस्त सुरळीत पार पाडण्यासाठी होमगार्ड अधिकारी रामराव शिरसागर, रवी जेंकूट, बशीरोद्दीन शेख, बळवंत अटकोरे, भीमराव जोंधळे, राजकुमार कदम, दीपक काकडे, किशन इंगळे, गणेश गिरबिडे, शिवाजी पवार, विश्वनाथ काळे, मष्णाजी पैलावार, तानाजी पाटील, गणपती सुरेशकर प्रल्हाद एडके हे प्रयत्नशील आहेत. तर होमगार्ड निवडणूक बंदोबस्त भत्ता तात्काळ मिळावा यासाठी प्रशासिक अधिकारी हरिहर आंबेकर व प्रमुख लिपिक शिवकांत घाटोळ हे परिश्रम घेत आहेत.