…… आनंदाचे डोही..
आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे..
आनंद शब्द आणि आनंदी भाव असलेली अनेक गाणी डोळ्यासमोर तरळु लागली आणि त्या आनंदात न्हाहुन निघाले आनंदाश्रमातील ( वृध्दाश्र्मातील ) तरुण तुर्क.. वय वर्षे फक्त ८० ते ९४
आभार भगवंताचे कारण या आनंदाला माध्यम म्हणुन माझी निवड केली.. बाकी मी कोणाला काहीही देत नाही पण भरभरुन घेते .. लहानपणापासूनच कृष्ण भक्त त्यामुळे तो कायमच माझ्यावर प्रेमाचा पाऊस पाडतो.. मागेन ती गोष्ट माझ्या झोळीत टाकतो.. मला आनंद मिळावा ( किवा प्रत्येकजण आपल्या सुखासाठी करतो ) .. मग मला आनंद हवाय तर मी आनंदच पेरायला हवा.. पण बऱ्याचदा आपल्याला आनंद हवाय तरीही मंडळी दुसऱ्याला त्रास देतात त्यामुळे त्यांच्याकडे वेदनाच जाते.. पेरीले ते उगवते.. त्यामुळे आनंदच पेरा..
दिवाळी संपली तरीही भगवंताने मला आजी आजोबांकडे पाठवलं होतं .. निमित्त होतं त्यांना फराळ देणं आणि सुमधुर गाण्यावर त्यांना डोलायला लावणं.. डोलणं नाही तर ९४ वर्षांची सुंदरी त्यावर चक्क नाचत होती आणि ८४ वर्षांची ब्युटीक्वीन धडाधड गाण्यातील बोल गुणगुणत होती.. काय तो उत्साह आणि काय ती मेमरी.. खरच आमच्यासाठी सगळच लाजीरवाणं होतं.. माझे गायक मित्र मिलिंद , सुधाकर , श्रध्दा , मधुर , सुहासिनी बेधुंद होवुन गात होते कारण भगवंताने त्यांनाही सेवा करायची संधी दिली होती.. तिथल्या एका दादानी गायलेला अभंग ऐकुन आम्ही लाजीरवाणे झालो..
काल हा कार्यक्रम फेसबुक लाइव्ह होता .. अनेकांनी त्याचा आस्वाद घेतला असेलच.. नवरत्न ओल्ड एज होम हे माझे माहेर आहे म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही कारण गेली अनेक वर्षे मी तिथे जाते.. सगळे तरुण माझी आतुरतेने वाट पहात असतात.. खायला मी काय न्यावं याची आधीच फर्माइश असते.. पण अगदी मनापासून सांगते मला आनंद मिळतो म्हणुन मी तिथे जाते काहीही द्यायला नाही.. आपण कोणीही कोणाला काहीही देउ शकत नाही हेच खरं..
पब , बार मधे जाऊन आपला मौल्यवान वेळ आणि पैसा वाया घालवण्यापेक्षा अशा ठिकाणी जा जिथे आपल्या वेळेचा सदुपयोग होइल.. कोणाच्यातरी मागे कुचाळक्या करत बसण्यापेक्षा तो वेळ अशा व्यक्तीना द्या .. प्रत्येकवेळी पैसाच लागतो असं नाही आपले चार प्रेमाचे शब्दही त्या निरागस डोळ्यांना आधार देउन जातात.. आपल्या कुटुंबापलिकडे काही नाती असतात ती आपल्याला खुणावत असतात .. कुटुंबासाठी प्रत्येकजण काहीना काही करतोच पण जेव्हा दुसऱ्यासाठी आपल्याला काही करता येइल तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने जगतो.. अशा पध्दतीने एकदा जगुन पहा..
घराबाहेर सुध्दा सगळं सुंदर आहे आणि ते आपल्याला खुणावतय.. पण रस्ता मात्र योग्य निवडा आणि योग्य व्यक्ती सोबत तो तुडवा..
कोणाला त्या आश्रमाला भेट द्यायची असेल किवा मदत करायची असेल तर मी नंबर देत आहे..
या कार्यक्रमाचे संपूर्ण श्रेय मी भगवंताला देते..
अनिता राकडे…९८२३६०६४९९
सोनल गोडबोले..