बाबा…

काळजातून काळजाशी
काळजापर्यंत बोलले जाणारे दोन
अक्षर म्हणजे “बाबा”
सैलसर वाटणारी मिठी
घट्ट हृदयाशी मारली होती
दुःखाची चाहूल लागताच
स्पर्शाने ओळखली होती…
हुरहुरी वाढवणारी भिती
कुशीत शिरतात निवळली होती…
जगाशी लढण्याची ताकद
तुम्हीच हाती भरली होती
तुमच्यामुळेच आयुष्याची
प्रत्येक संध्याकाळ हसरी होती
भेदरलेली हळवी ती ‘रसना’
तुमच्याच कुशीत निवांत विसावली होती…

 

रूचिरा बेटकर नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *