फुलवळ ( परमेश्वर डांगे )
फुलवळ ग्रामपंचायतीच्या भोंगळ कारभारामुळे गावांचा म्हणावं तेवढा विकास झाला नाही वित्त आयोगाच्या निधीचा योग्य वापर होत नसल्याने आजही फुलवळ सह सोमासवाडी,महादेव तांडा आणि केवळ तांडा विकासापासून कोसोदूर आहेत .मग वित्त आयोगाचा निधी चालला तरी कुठे हा प्रश्न ? स्थानीक नागरीकांना पडला आहे.
तालुका गटविकास अधीकारी या बाबीकडे बारकाईनं लक्ष देऊन चौकशी करावी अशी मागणी गावातील सुशिक्षित नागरिकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे. गावच्या सर्वांगीन विकासासाठी वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीला प्रतीवर्षी केंद्र व राज्य सरकारकडुन लाखो रुपयांचा निधी दिला जातो . मात्र स्थानिक अधिकारी कर्मचारी व सरपंच यांच्या संगनमताने निधीचा त्याठिकाणीं योग्य वापर होत नसल्याने गाव विकासापासून वंचीत आहे.गावात आजही पाण्याचा प्रश्न असो की गल्ली बोळीतील रस्त्याची समस्या असो सारखीच परीस्थीती वर्षानुवर्षी त्यामध्ये कोणताच बदल नाही. रस्त्यात खड्डे की खड्ड्यामध्ये रस्ता हे समजायला तयार नाही.,नाल्या तुडुंब भरलेले ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळते आहे.
ग्रामपंचायतीमध्ये मासीक बैठक ग्रामसभा होत नाहीत. शासनाचा उद्देश आहे की या बैठकांच्या माध्यमातून शासनाच्या काय नवनविन योजना आहेत हे गावकऱ्यांना ग्रामसेवकांच्या माध्यमातून सांगीतले पाहीजे पण असे होतना दिसत नाही. मग योजना नागरीकांना कशी कळणार?
गावातील नागरीकांना कामानिमीत्त तालुका गाठावा लागतो. ग्रामसेवक तालुक्याला राहुनच गावचा कारभार पाहत असतात ग्रामपंचायत सदस्यांना कोनी विचारत नाहीत मग गावचा विकास कसा होणार? यामुळे आजही गाव विकासापासून कोसो दूर आहे. ग्रामसेवकांचा मनमानी कारभार चालु आहे. म्हणुन तालुक्याचे संबंधीत गट विकास अधीकारी यांनी वित्त आयोगाच्या निधीच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी गावातील सुशिक्षित नागरिक वर्गातून होत आहे.