वर्ष सरताना….नवीन आव्हाने पेलताना..

माझा नवरा सचिन आयटीमधे मॅनेजर , उत्तम लेखक , उत्तम ॲक्टर , इंटरनॅशनल चेस रेटेड प्लेअर, अनेक मुलांना त्याने चेस शिकवलय .. आणि विशेष म्हणजे उत्तम माणूस , निर्व्यसनी ( हे माझ्यासाठी महत्त्वाचे) .. त्याहीपुढे जाऊन ज्याला अचुक हेरुन प्रपोज करुन माझ्या आयुष्यात आणून त्याला नवरा करुन मग मित्र केला आणि २६ वर्षे एका घरात कुठल्याही परिस्थितीत मित्र म्हणुन रहातो.. जी सोनल तुम्हा सगळ्याना दिसते ती या नवरारुपी मित्रामुळे कारण मी कायम पुरुषात वावरणारी , बिंधास्तपणे बोलणं , वागणं आणि तेही सचिनला सांगुन पण आजपर्यंत एकदाही त्याने माझ्या फोनला हात लावला नाही ना कधी संशय घेतला त्या कधी cross questions केले यामुळे झालं काय मी बहरलेच , आमचा संसार फुललाच , आणि दोघेही कधीही कुठेही शांत झोपतो.. घरात सुख ते पाहुन माझी मुलगीही तिच्या नवऱ्यासोबत अशीच छान राहील .. मतितार्थ काय तर एका चांगल्या गुणामुळे कमी पैशातही माणूस आनंदी आणि निरोगी राहु शकतो म्हणुन विचार महत्वाचे..
आजची ही पोस्ट खास सचिनच्या अचीवमेंटसाठी आहे आणि सरतेशेवटी त्याने मला दिलेल्या स्वातंत्र्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.. स्पेशल ४० नावाच्या गृपवर फॅशन शो आयोजित केला होता त्यात सचिनने भाग घेतला होता.. त्याचा फिनाले काल ठाण्यात होता आणि त्यात सचिन सेकंडरनर अप विजेता आहे.. दोन महिन्यात डाएट करुन त्याने ५ किलो वजन कमी केले .. व्यायामाची आवड नसणारा माझा हिरो रोज न चुकता व्यायाम करु लागला .. खाण्यावर प्रेम करणारा ( गोडावर ) दिवाळीत त्याने फराळाकडे पाहिलेही नाही .. जेवण निंम्यावर आणलं आणि फ्रूटस ,सॅलडवर भर दिला त्यामुळे फिट दिसतोच पण बक्षीसही मिळवलं तसच यावर्षी जिद्दीने तो कोण होणार करोडपती च्या हॉटसीटवर जाऊन आला.. स्वतः एकांकिका लिहुन त्यात बक्षीस मिळवलं.. प्रत्येकवर्षी आम्ही काहीना काही अचिव्ह करतो .. आमच्या दोघान्मधे स्पर्धा नाही .. जेलसी नाही.. रुसवा नाही.. भांडण नाही.. दोघेही स्वतंत्र विचाराचे आहोत आणि जगतमित्रही आहोत.. जे आम्हाला जवळुन ओळखतात त्यांना आमचं नातं माहीत आहे म्हणुनच मी बियॉन्ड सेक्स लिहु शकले आणि म्हणूनच मी फॅंटसीज ॲंड ब्युटीज ही कादंबरी लिहु शकले.. आमच्या मुलीलाही आम्ही तसच घडवलय.. स्वतंत्र विचार करायला शिकवलं आहे..

आज हा लेख फक्त नवऱ्याचं कौतुक करायला लिहीला नाही तर घर कसं असावं , नवरा बायकोचं नातं कसं असावं ,आणि दोन वेगळी माणसे एकत्र रहाताना एकमेकांच्या कामात लुडबुड न करता एकमेकांना बांधुन कसं रहायचं हेही माझ्या वाचकानी यातुन घ्यावं.. नवरा बायको व्हीलन नाहीत तर ते उत्तम मित्र असु शकतात हेच मीरासांगते आणि सोनलही.. मी अनेकदा म्हणते माझ्यातील चांगल्या गोष्टी घ्या आणि तुमची प्रगती करा.. नवीन वर्षात एक सुंदर पुस्तक घेउन येणार आहे.. नवीन वर्षात आध्यात्मिक प्रगतीही करायची आहे.. नवीन वर्षात मी आणि सचिन समवयस्क असल्याने वयाची पन्नाशी पूर्ण करणार आहोत त्या अनुषंगाने काही वेगळ्या चांगल्या वाटा आम्हाला गवसतील ज्यायोगे मला माझ्या वाचकांना आणि चाहत्यांना मेजवानी देता येइल..तुम्हीही असाच संसार करा..

 

असच सुंदर आयुष्य जगा.. आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी घ्या.. रोज नवनवीन स्वप्न पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करा.. भरपुर वाचन करा आणि व्यसनांपासुन दुर रहा.. तो वेळ , पैसा अनेक लोकांना उपयोगी येइल यासाठी सदैव तत्पर रहा. चांगलं वागणं आणि सुंदर विचार कायम माणसाला उंचीवर घेउन जातात .. माझ्या प्रत्येक वाचकाने आणि फॉलोवर्स यांनी माझ्यातील चांगल्या गोष्टी घ्याव्यात हीच नवीन वर्षासाठी सदिच्छा आणि येणारे वर्ष हे सगळ्याना निरोगी असावे आणि माझ्या आयुष्यात प्रत्येक क्षणी रंग भरणारी प्रत्येक व्यक्ती , भगवंत , निसर्ग ,प्राणी पक्षी अगदी निर्जीव वस्तु सुध्दा यांची मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते.. रोज नवीन विषयासोबत मी तुमच्या आयुष्यात राहीनच..असच माझ्यावर प्रेम करत रहा..

सोनल गोडबोले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *