माझी बायको सारखी संशय घेते…

 

 

माझ्या वाचकाचा हा मेसेज आहे आणि हेच वाक्य मी अनेकदा माझ्या अनेक मित्रांकडुन ऐकलय..
याची कारणे अनेक आहेत..
१) रिकामं मन सैतानाचं घर .. मग ती स्त्री कितीही उच्चशिक्षीत असो .. ती काहीही न करता घरात बसली की तिचं मन नको तो विचार करायला लागतं.. म्हणुन पैशाची गरज नसली तरीही प्रत्येक स्त्रीने तिच्या आवडीच्या कामात स्वतःला बिझी करुन घ्यावे .. आपल्याकडे इतकं साहित्य आहे की अनेक जन्म कमी पडतील.. अनेक वृध्द ,अपंग यांना समाजात आपली गरज आहे .. घराबाहेर पडलं तर अनेक दालनं उघडी होतात आणि मन शरीर दोन्ही उत्तम रहातं.. नोकरीच करायला हवी असं नाही..
२) आपल्याकडे स्त्रीला कमी लेखणं आणि तिला शिक्षण न देणं यामुळे सुध्दा ती घरात रहाते आणि मग काय करु हा प्रश्न तिला पडतो .. मग एकमेव चविष्ट पदार्थ तो म्हणजे नवऱ्याचा मेंदु खाणं म्हणुन लहानपणापासूनच मुलीना वाचनाची ,,शिकण्याची आवड लावायची.. आणि विशेष म्हणजे बऱ्याचदा तिलाही या गोष्टीचं काहीही वाटत नाही याचं कायमच कुतूहल वाटतं..
३) स्त्रीने स्वतः स्वतःला बदलावं.. तिने व्यायामाने सुडौल बांधा करावा.. तिने कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभं रहावं.. आरोग्य , सौंदर्य याकडे लक्ष द्यावं.. पैसे कमावणारीच स्त्री उत्तम नसते तर तिने सर्वांग सुंदर असावं.. तिची विचारसरणी उच्च असायला हवी .. मानसिकता श्रीमंत हवी .. अशी स्त्री सगळ्याना आवडते..
४) नवऱ्याला मैत्रीण असली म्हणजे तो वाईट अशी मानसिकता बऱ्याच स्त्रीयांची असते .. याउलट मी विचार करते तो प्रत्येकीने करावा.. नवऱ्याला बहीण , मैत्रीण असेल तर तो स्त्री काय आहे हे नक्की जाणु शकतो.. आणि तो बायकोवर जास्त प्रेम करु लागतो..
५) सोशल मिडीया , फोन यामुळे अनेकदा संशय वृत्ती बळावते ती कमी करायला हवी असेल तर पुरुषांनीही घरातल्या कामात लक्ष घालावे.. बायकोला मदत करावी.. नवरा बायकोत संवाद होत नाही ही समाजात खुप मोठी अडचण आहे..

६) एकमेकांचे मित्र मैत्रीणी याबद्दल एकमेकांना सांगावं.. ओळख करुन द्यावी , /घ्यावी..जितकं खरं बोलता येइल तितकं बोलावं.. खरेपणा आणि प्रामाणिकपणा हा नात्यात खुप महत्वाचा असतो.. अनेक पुरुषांना बायकोला न सांगता व्यवहार करायची सवय असते किवा खोटं सांगुन बाहेर जाणं असेल यामुळेही ती संशयी होते.. काही उच्चशिक्षीत पुरुषांना कमी शिकलेल्या किवा दिसायला सुंदर नसलेल्या स्त्रीची लाज वाटते म्हणुन ते तिला सोबत नेत नाहीत परिणामी ती घरात कुढत रहाते आणि संशयाचं वारं वहायला लागतं.. पुरूष स्त्रीला पटकन दोष देउन मोकळा होतो पण यामागे तिला काय वाटतं ही गोष्ट त्याने लक्षात घ्यायलाच हवी ना..
७) तिच्या आजूबाजूचे वातावरण , ती लहानाची मोठी कुठल्या घरात झाली , कुठल्या विचारात वाढली आणि तरीही ती स्वतःला बदलु शकते ही तिची मानसिकता तिने स्वतःतयार करायला हवी.. स्त्री पुरूष मानसिकतेला अनेक पैलु आहेत..
याचा मार्ग ज्याचा त्याने निवडायचा असतो.. आपला अभ्यास आपण करायचा आणि निरीक्षण ही सगळ्यात मोठी शाळा आहे .. वाचन , श्रवण याने माणसाची वैचारिक लेव्हल बदलते..

८) एक निरीक्षण केलेली गोष्ट म्हणजे पुरूष बाहेर लफडी करायला लागला की मग त्याला उपरती येते कीं आपल्या बायकोला मित्र असले तर अडचण नाही तोपर्यंत त्याच्या बायकोने कोणाकडे पाहु नये म्हणुन तिला तो टॉर्चर करतो .. आणि तिच्याकडून बदलण्याची अपेक्षा करतो.. ती आपल्या पुढे गेली तर आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल हेही त्याला वाटतं..

मला एकच वाटतं चुक दोघांचीही आहे .. दोघांनी स्वतःला बदलावं तरच नवरा बायको मित्र म्हणुन एकत्र राहु शकतात..
नवरा बायकोत मैत्री असायलाच हवी.. तुमची मते तुम्ही जरुर मांडा.. कारण प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण विचारपूर्वक व्यक्त व्हा..

सोनल गोडबोले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *