संस्कार असावेत तर असे.

 

 

काल संध्याकाळची टेकडी थोडी वेगळीच भासली..५ वाजता थोडं उन्ह होतं पण गार वारंही होतं… अतिशय सुंदर हवा , भरपुर ऑक्सिजन आणि भरपुर गाई म्हशी रवंथ करत बसल्या होत्या.. मुलं क्रिकेट खेळत होती आणि मी या सगळ्याचा मनमुराद आनंद घेत सेल्फी काढण्यासाठी थांबले .. तितक्यात लक्ष गेलं ते एका चुलबुलीवर.. साधारणपणे १२/ १३ वर्षांची मुलगी तिकडुन आली आणि मला म्हणाली , ताई मी तुझे फोटो काढु का ??.. मी लगेच पोजेस द्यायला सुरुवात केली .. फोटो काढुन झाल्यावर ती म्हणाली , तु एकटीच आलीस का ??.. मी म्हटलं , मी व्यायामासाठी सोबत कोणालाही आणत नाही कारण गप्पा होतात.. तिला म्हटलं , तु लहान आहेस तरीही एकटी आलीस ??.. त्यावर ती म्हणाली , माझे बाबा आले आहेत .

ते पहा तिकडे उभे आहेत.. बाबा म्हणजे आजोबा हे मला नंतर कळलं.. तिचं नाव आर्या होतं आणि आजोबा ७० वर्षांचे आहेत तरीही रोज दोनदा टेकडीवर येतात हे ऐकुन लाजही वाटली.. एकदम स्लीमफीट आजोबा .. नको नको यंग बॉय म्हणुयात की.. ही चिमुकली इतकी बडबडी होती की बोलता बोलता मला म्हणाली , बाबा म्हणाले तु रोज शाळेतुन आल्यावर टेकडीवर येत जा आणि फीट राहीलीस तर तु जे मागशील ते मी तुला देइन .. हे तिचं वाक्य ऐकल्यावर मला खुप आनंद झाला.. आजोबा स्वतः व्यायाम करुन घरचं खाऊन हेल्दी आहेत हा आदर्श त्यांनी त्यांच्या कृतीतुन घालुन दिला होता.. ते जर wp वर बसले असते तर आर्याही तशीच वागली असती.. आजही ते अनेक किल्ले चढतात आणि सोबत हिला घेउन जातात.. माझे बाबा ( आजोबा ) असे ..माझे बाबा तसे… हे सांगताना ती अजिबात दमली नाही.. संस्कार हे कुठल्याही लायब्ररीत सापडत नाहीत तर ते घरातल्या मोठ्या माणसांच्या कृतीतुन दिसतात आणि मुलं त्यांचं अनुकरण करतात.. तिचं आजोबा प्रेम पाहुन मला माझ्या आजोबांची खूपच आठवण आली.. एकत्र कुटुंब पध्दतीचे फायदे काय असतात ते मी अनुभवलं आहे..

तिला डांस ची कशी आवड आहे आणि ती फक्त घरचं अन्न कसं खाते किवा रोज संध्याकाळी बाबा शुभंकरोती म्हणायला सांगतात इथपर्यंत सगळं धडाधड सांगत होती आणि ते ऐकुन मी मंत्रमुग्ध झाले कारण आताही पुण्यासारख्या मोठ्या ठिकाणी अशी कुटुंबे आहेत याचा अभिमान वाटला.. आर्या आणि तिचे बाबा यांच्या विचारात मी टेकडी उतरुन खाली आले. आंघोळ करुन भगवंताला नैवेद्य दाखवला.. धुप पेटवुन तुळशीपाशी जाऊन शुभंकरोती म्हटलं.. आणि आर्याचे मनोमन आभार मानले कारण हे सगळं मी लहानपणापासूनच करते पण आज त्या चिमूकलीने संस्काराची पुन्हा नव्याने आठवण करुन दिली.. १२ वर्षांच्या मुलीने त्या अर्ध्या तासात नकळत माझ्यावर संस्कार केले.. फीटनेस ,घरचा आहार , आजोबांची काळजी , आणि निसर्गावर प्रेम या सगळ्या गोष्टी सोबत घेउन जेव्हा ती तिच्या सासरी जाईल तेव्हा फक्त सुखच असेल ना..

मोबाईलच्या जमान्यात तिच्या हातात मोबाईल नव्हता हे तर कौतुकास्पद आहे.. इतर कुठल्याही विषयावर न बोलता तिला माझ्याशी घरातल्या गोष्टी शेअर करायच्या होत्या.. तिच्या बाबानी केवढी मोठी संपत्ती तिला दिलेय हे कळण्याचं आता तिचं वय नाही पण जेव्हा तिच्या हे लक्षात येइल तेव्हा ती किती नशीबवान आहे याची जाणीव होइल.. ती वयाच्या मानाने खूपच समजूतदार होती.. अशा मुली जेव्हा पुढे जाऊन आई होतील तेव्हा पुढची पिढी आपोआप संस्कारी होणार यात शंका नाही.. अशा आर्या आपल्याला तयार करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला बदलायला लागेल . बदलाची सुरुवात आताच करायला हरकत नसावी ना.. चला लागा कामाला..

( तळटिप.. आजोबा ,बाबा , भाऊ , मित्र , काका , मामा अनेक चाहते , वाचक अशा गराड्यात मी वाढले आणि आता जगत असल्याने पुरूषांचा माझ्यावर प्रचंड मोठा प्रभाव आहे .. कुठल्याही पुरुषामुळे मला कधीही त्रास झाला नाही म्हणुन मी कायम पुरुषांवर प्रेम करते..)..
देर है दुरुस्ता है.. सोच बदलो देश बदलेगा

.#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi

.
.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *