आनंदनगरी ” मुळे शालेय जीवनात मुलांचा होतो सर्वांगीन विकास. : आनंदनगरी च्या बाजारात क्यूआर कोड चा वापर करत डिजिटल इंडिया चे स्वप्न साकार करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आर्थिक व्यवहार करण्यास अनेकांनी दिली पसंती..

 

फुलवळ  (धोंडीबा बोरगावे)

फुलवळ ता. कंधार येथील श्री बसवेश्वर विद्यालय शाळेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शालेय विद्यार्थ्यासाठी ता.२३ जानेवारी रोज मंगळवारी शाळेच्या प्रांगणात आनंदनगरी चे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित आनंदनगरीत बहुतांश शालेय विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला होता. या आनंदनगरी मध्ये खरेदी-विक्री ला भरभरून प्रतिसाद देत मनमुराद आनंद ही विद्यार्थ्यांनी लुटला. यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल ही झाली. तेंव्हा आनंदनगरी उपक्रम हा केवळ विद्यार्थ्यांसाठी अभ्यास , शिकवण्यातून थोडा वेळ काढण्याचा मार्ग नसून मुलांच्या सर्वांगीण विकासाचा एक भाग होय असे सांगून अभ्यासाचा ताणतणाव कमी होऊन व्यावसायिक कौशल्य अनुभवण्याची आणि आत्मसात करण्याची संधी यातून प्राप्त होते असे मत आनंदनगरी आयोजनाचे प्रमुख एम.बी.पांचाळ सर व सौ. शालिनी डांगे मॅडम यांनी व्यक्त केले.

शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासासोबतच व्यावहारिक ज्ञान प्राप्त व्हावे, बाजारातील विविध वस्तूंची खरेदी-विक्री कशी करायची , ग्राहक व इतरांशी कसे बोलावे याचा प्रत्यक्ष अनुभव येणे , खर्चाचा पूर्ण हिशोब विद्यार्थ्यांना बालवयातच समजावा बाजारातील व्यवहाराची ” हसत बागडत” खरेदीच्या माध्यमातून परिपूर्ण माहिती व्हावी यासाठी “शालेय स्तरावर ” आनंद नगरी” बाजाराचे आयोजन करण्यात येत असल्याच्या प्रतिक्रिया सदर शाळेतील शिक्षकांनी दिल्या तर या आनंदनगरी च्या माध्यमातून आम्हाला सर्वांगीण जीवनाचा आनंद तर मिळतोच परंतु सोबतच दैनंदिन व्यवहारात माय-बाप कसे काटकसरीने आर्थिक व्यवहार करतात याची अनुभूती येते अशा भावना सहभागी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवल्या.

यात श्री बसवेश्वर विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध स्टॉलचे दुकाने थाटली होती. यात प्रामुख्याने स्वतः हाताने घरी बनवून आणलेली खिचडी, पोहे, भजे, पोहे चिवडा , पाणीपुरी , समोसे , शिरखुरमा तसेच ताजी फळे असे अनेक पदार्थ विक्रीसाठी आणले होते ते सर्वांच्या आवडीचे ठरले त्यावर ग्राहकांची खरेदी करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसोबतच पालकांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. विशेष बाब म्हणजे वर्ग नववी च्या विद्यार्थ्यांनी थाटलेल्या दुकानात डिजिटल इंडिया चे स्वप्न साकार व्हावे यासाठी विक्री झालेल्या मालाचे पैसे क्यूआर कोड च्या म्हणजेच ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यास पसंती दिली त्याला पालक ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे आनंद नगरी बाजारातील विद्यार्थी, व्यापारी आनंदीत असल्याचे दिसून येत होते. सदरच्या आनंद नगरी बाजारातील आर्थिक उलाढाल ही खुप मोठ्या प्रमाणावर झाल्याचे आनंद नगरी बाजार प्रमुख एम.बी. पांचाळ सर व सौ. शालिनी डांगे मॅडम यांनी बोलून दाखविले.

आनंद नगरी बाजाराचे उदघाटन उपस्थित पालक मंगेश पांचाळ व मुख्याध्यापक बी. एन. मंगनाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स. शि. सी.एम. फुलवळकर, निलेवाड सर, करेवार सर , सौ. शालिनी डांगे, सौ. नवघरे, सहशिक्षक साके, कोठेवाड सर , दिगंबर रासवंते , उद्धव बसवंते यांच्यासह पालक व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *