कंधार /मो सिकंदर
फटाके बनवण्यासाठी पवित्र कुराणाच्या आयात असलेल्या कागदाचा वापर करून पवित्र कुराणची विटंबना करणाऱ्या फटाके बनवणाऱ्या कंपनीची चौकशी करून मुस्लिम समाजाचे भावना दुखावणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करा असे कंधार येथील मुस्लिम समाजाच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.
प्राण प्रतिष्ठानचे औचित्य साधून संपूर्ण देशभरात दि २२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात येत असताना कंधार शहरातही जल्लोषात उत्सव साजरा करत फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली फटाके बनवण्यासाठी मुस्लिम धर्मियांचे पवित्र कुराणच्या आयात असलेल्या कागदाचा वापर करून पवित्र कुराणची विटंबना केली असल्याने मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेल्या असल्याने दि २३ जानेवारी रोजी तहसीलदार कंधार यांना मुस्लिम समाजाच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की दि २२ जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठानच्या औचित्य साधून गांधी चौक कंधार येथील गडपल्लेवार मेडिकल समोर काही तरुणांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. सदर फटाक्यावर पवित्र कुराणचे आयात असलेल्या कागदाचा वापर करण्यात आला आहे.फटाक्याचे पॉकीट हे कंधार येथील व्यापाऱ्यांकडून आनल्याची चर्चा गावात चालू आहे. सदरचे कृत्य करून दोन समाजात तेढ निर्माण करू पाहणाऱ्या वर व सदर फटाके विकणाऱ्या व्यापाऱ्यांची व फटके बनवलेल्या कंपनीवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी असे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या निवेदनावर मौलाना मुराद मौलवी सहाब, अब्दुल मन्नान चौधरी, जफरउल्ला खान, अजीमोद्दिन बबर मोहम्मद, मोहम्मद हमीद सुलेमान, ॲड एस आय खान, ॲड कलीम अन्सारी, ॲड मोहम्मद इम्रान,ॲड जावेद शेख, ॲड रज्जाक गफ्फार,गुलाम अलीम,गौसखां पठाण यांच्या सह अनेक मुस्लिम बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत.