कंधार ( प्रतिनिधी )
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त संत गाडगेबाबा माध्यमिक विद्यालयात शिक्षक – पालक मेळावा आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव.श्री चेतन दौलतराव केंद्रे व प्रमुख पाहुणे म्हणून कंधार नगर पालिकेच्या माजी नगराध्यक्षा व जिल्हा चिटणीस नांदेड दक्षिण, भारतीय जनता पक्ष सौ.अनुराधा चेतन केंद्रे यांनी भुषविले.
या कार्यक्रमाला सोमठाणा गावचे सरपंच सौ.रेवता शंकर गित्ते उपसरपंच बालाजी गित्ते पोलिस पाटील संग्राम गित्ते तंटामुक्ती अध्यक्ष धोंडिबा गित्ते सोमठाणा,मरशीवणी , दैठणा पोखर्णी पटाचा तांडा येथील पालक उपस्थित होते मु.अ.यानी भाषणात शाळेत विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले तर प्रमुख पाहुणे यानी विध्यार्थीनी गरूडझेप घ्यावी व जिद्दीने चिकाटीने अभ्यास करून ध्येय गाठण्याचा सल्ला दिला शेवटी अध्यक्षीय भाषणात साहेब म्हणाले की आमच्या शाळेत येणारे सर्व शेतकऱ्यांचे, गोरगरिबांचे लेकरं आहेत ते घडले पाहिजेत,ते मोठ्या पदावर गेले पाहिजे असा संदेश दिला.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. धोंडीबा नागरगोजे व सर्व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले.