कंधार : प्रतिनिधी
महाराष्ट्रात कंधार म्हटले की,आठवते क्रांतिची चळवळ त्याचे कारणही तसेच आहे.कंधार हा तालूका क्रांतिचे माहेरघर आहे.ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी,माजी खासदार व आमदार डाॅ.भाई मुक्ताईसुत केशवराव धोंडगे साहेब यांच्या कार्याने ठळक आलेल्या कंधार तालूक्यात
विविध सत्याग्रहाचा,असंख्य सभेचा अन् अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे.याच
कंधारच्या ऐतिहासिक छ.शिवाजी चौकात कंधार नगरी वतीने गेली २५ -२६ वर्षापासून भारत माता पुजन करुन भारताची आन,बान अन् शान असलेला प्राणप्रिय राष्ट्रध्वज तिरंगी ध्वजाचा ध्वजारोहण करण्याची प्रथा कंधारकराना सवयीची झाली आहे.भारतीय राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दिवशी राजाधिराज, सिंहासनाधिश्वर,श्रीमानयोगी छ.शिवप्रभुंच्या रुबाबदार पुतळ्यास डाॅ.रामभाऊ तायडे यांच्या
समर्थ हस्ते माल्यार्पण करुन भारत मातेचे पुजन खोडसकर काका यांचे हस्ते आणि प्राणप्रिय तिरंगी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण दिव्यांग हरहुन्नरी कलावंत दत्तात्रय एमेकर गुरुजी यांचे समर्थ कराने करुन प्रजासत्ताक अमृत महोत्सवी ध्वजारोहण करुन जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एकमेव घटना आहे असेच वाटते.ध्वजारोहणा नंतर दत्तात्रय एमेकर यांनी आजचा ध्वजारोहण माझ्या जीवनातील पहिला-वहिला आहे.प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सवी वर्षात मिळणे माझ्यासाठी सद्भाग्यच म्हणावे लागेल.
प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मा.विठ्ठलराव मंगनाळे यांनी ऐतिहासिक तिरंगी राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्याची संधी दिव्यांगास दिल्याबद्दल संयोजकाचे आभाराभिनंदन केले आहे.आज प्रजासत्ताक दिनी अमृत महोत्सवी ऐतिहासिक राष्ट्रध्वजारोहन प्रसंगी अँड गंगाप्रसाद यन्नावार, निलेश गौर,मुख्याध्यापक किरण बडवणे सर व प्रियदर्शनी कन्या माध्यमिक विद्यालयाचा स्टाफ आणि प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक भास्कर कळकेकर सर्व स्टाफ विद्यार्थी व विद्यार्थीनी,डाॅ.सौ.दीपाली रामभाऊ तायडे मॅडम,शुभम संगनवार,केदार मुत्तेपवार,अँड सागर डोंग्रजकर, साईनाथ कोटगीरे सावकार, वैभव बासटवार,पंडित ढगे,शंकर स्वामी महाराज, अजिंक्य पांडागळे,बोंबले,व्यास महाराज, गजानन प्रेमलवाड,प्रविण बनसोडे,इशान मुत्तेपवार आदि राष्ट्रप्रेमी कंधारकरांची उपस्थिती होती.