कंधार : प्रतिनिधी
26 जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्याने कंधार येथिल महात्मा फुले प्राथमिक शाळा व विद्यालय कंधार येथे मुख्याध्यापक केंद्रे जे जी व प्राथमिक शाळेत वाघमारे डी.जी यांच्या हस्ते ध्वजा वंदन करण्यात आला.
शहरातील मुख्य रस्त्याने भारत मातेचा जयजयकार करत कंधार नगरपालीच्या ध्वजावंदनास विद्यार्थी उपस्थित होते. कु आयशा पठाण या चिमुकलीने प्रजासत्ताक दिनानिमीताने भाषण केले. मुख्य कार्यकारी अधिकारी तथा तहसिलदार राम बोरगावकर यांनी कु आयशा पठाणच्या भाषणाचे कौतूक केले.
नंतर शाळेत विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला. विविध देशभक्ती पर गितावर नृत्य सादर झाली तर काही विद्यार्थांनी प्रजासत्ताक दिनानिमित्य भाषणे केली.
कार्यक्रमासाठी उपस्थित पालक निळकंठे सर यांच्या हस्ते दर्जेदार भाषण करणाऱ्या विदार्थांना शैक्षणिक साहित्य बक्षिस देण्यात आले.
यावेळी मुख्याध्यापक वाघमारे डी.जी. यांनी यशस्वी विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या. शाळेतील शिक्षिका कागणे यु एम, शिक्षक आगलावे ए बी, शिक्षक केंद्र आर एस. बोरकर सर, बालकताई चंद्रकला तेलंग, सुर्यवंशी मामा यांची उपस्थिती होती.
विद्यार्थांना खाऊचे वाटपा नंतर समारोप झाला.