कंधार : प्रतिनिधी
कंधार तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार या शाळेची नानाविध उपक्रमात एक वेगळीच छाप आहे.या शाळेतून अनेक कलावंत निर्माण झाले.पण रांगोळी कलाकार शाळेत जीवनात आपले कसब पणाला लावून कोटबाजार ग्राम पंचायत हद्दीतील अशोकनगर येथील कष्टाळू जोंधळे यांच्या उदरी जन्मलेल्या कुमार रमाकांत भीमराव जोंधळे वर्ग ९ वा क मराठी या वर्गातील विद्यार्थ्यांनी २९ व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलन गुराखीगडीवर श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेचे संस्थापक व संचालक, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व आमदार डॉ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांचे अप्रतिम पेन्सिल स्केच,१ जानेवारी २०२४ रोजी प्रथम स्मृतीदिना निमित्य ४ फूट बाय ८ फुट या बोर्डवर २४ तास अखंड मेहनत घेऊन अप्रतिम रांगोळीत प्रतिमा हुबेहूब रेखाटली.
त्यावेळेस संस्थाअध्यक्ष डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम भाऊ धोंडगे साहेब यांनी प्रत्येकी स्केचला ५०००\-रूपये आणि रांगोळीत ५०००\- रुपये बक्षीस देवून रमाकांतचा गौरव केला.संत गाडगे महाराज महाविद्यालय लोहा येथील प्राचार्य डाॅ.अशोकराव गवते सर यांनी ५००\- रुपये बक्षीस देवून डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या पध्दतीन शाबाशीचा मुका घेऊन त्यास शाबाशी दिली.
आणि गुराखीगडीवर २९ व्या जागतिक गुराखी साहित्य संमेलनात २० बाय १४ या भव्य आकारात डाॅ.भाई मुक्ताईसुत केशवरावजी धोंडगे साहेब यांचे तैलचित्र रांगोळीतून साकारले.त्यावेळे संमेलनाचे स्वागताध्यक्ष डाॅ.प्रा.भाई पुरुषोत्तम केशवराव धोंडगे साहेब यांनी गुराखीपिठावर यथोचित सन्मान करतांना रुपये ५०००\- चे बक्षीस देवून गौरव करत कलावंताचे कौतुक केले.भल्यामोठ्या गुराखीपिठावर दोन रात्रंदिवस मेहनत केली.स्वागताध्यक्षांनी गुराखीपिठावर आवाहन करताच अनेकांनांनी आर्थिक मदत केली.१३००० रुपये एवढे भरघोस बक्षिस मिळाले.बाल चित्रकार व रांगोळीकार रमाकांत जोंधळे व त्याच्या पालकांचा गौरव करून भविष्यात मुंबई-पुणे या महानगरात शिक्षण पुर्ण करण्यासाठी आम्ही तयार आहोत. असे भरीव आश्वासन यागुणी पण होतकरु गरीब बाल रांगोळीकार कलावंतास
त्याच्या कलेची कदर करत सत्कार केला.श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार ज्ञानालयात यथोचित सत्कार करण्याचे सुचित केले.