फुलवळ चा आठवडी बाजार कधी सुरू होणार…?

 

फुलवळ  : ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ येथे आठवडी बाजार भरवावा अशी येथील पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी ता. २० जानेवारी २०२२ रोजी ग्राम पंचायत कडे लेखी निवेदन देऊन रीतसर मागणी केली होती. त्या मागणीवरून येथील ग्राम पंचायत ने ग्रामसभा घेऊन त्यात हा विषय ठेवून सर्वानुमते ठराव संमत करून घेतला. त्यानंतर सदर ठरावाची प्रत जोडून ग्राम पंचायत ने तहसीलदार कार्यालय कंधार , कृषी उत्पन्न बाजार समिती कंधार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन फुलवळ येथे आठवडी बाजार भरवण्यास परवानगी मागितली होती , त्या मागणीला कृषी उत्पन्न बाजार समिती व तहसील कार्यालय ची परवानगी मिळाल्याचे सरपंच विमलबाई मंगनाळे यांनी माहिती यापूर्वीच दिली परंतु अद्यापही येथे आठवडी बाजार भरवायला मुहूर्त लागला नसल्याने फुलवळ चा आठवडी बाजार कधी सुरू होणार…? याबाबत सर्वानाच उत्सुकता लागल्याचे दिसून येते.

ता. २० जानेवारी २०२२ रोजी फुलवळ ग्राम पंचायतकडे लेखी निवेदनात धोंडीबा बोरगावे यांनी केलेल्या मागणीत सविस्तर मांडलेले मत असे की ,

कंधार तालुक्यातील फुलवळ हे जि. प. गटाचे आणि जवळपास सहा हजार लोकसंख्या असलेले सदन गाव असून अकरा सदस्यीय ग्राम पंचायत असलेल्या याच फुलवळ वरून एक राष्ट्रीय महामार्ग आणि एक राज्य मार्ग जातो , एवढेच नाही तर फुलवळ च्या भोवताल बहुतांश लहान मोठे गाव , वाड्या , तांडे आहेत. येथे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी आता आपापल्या व्यवसायावर चांगलाच जम बसवला असल्याने खरेदीसाठी व प्रवासासाठी येथे दररोज मोठ्या प्रमाणावर लोकांची वर्दळ असते . तेंव्हा फुलवळ येथे आठवडी बाजार चे जर आयोजन झाले तर नक्कीच जनतेला सोयीसुविधा मिळतील आणि व्यापाऱ्यांना तर लाभ होईलच पण त्याबरोबरच कराच्या माध्यमातून ग्रामपंचायत चा आर्थिक स्रोत वाढण्यास चांगली मदत होईल. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून फुलवळ येथे आठवडी बाजार चे आयोजन ग्रामपंचायत ने करावे असे लेखी निवेदन ग्रामपंचायत कडे देऊन धोंडीबा बोरगावे मागणी केली होती.

ता. २० जानेवारी २०२२ रोजी ग्राम पंचायत ला दिलेल्या निवेदनात आठवडी बाजार च्या आयोजनाची मागणी करतांना असेही म्हटले होते की , फुलवळ सह परिसरातील शेतकरी हे सदन असून कष्टाळू व शेतीनिष्ट असल्याकारणाने या भागातील बहुतांश लोक हे भाजीपाला , फळबाग , कडधान्य ची लागवड व विक्री करतात. तो माल विक्री साठी कंधार या तालुक्याच्या ठिकाणी त्यांना जावे लागते , त्यासाठी वेळेबरोबरच आर्थिक झळही सोसावी लागते.

एवढेच नाही तर आता सध्या फुलवळ येथे सर्वच प्रकार चे साहित्य , वस्तू , दैनंदिन जीवनात आवश्यक असणारे साहित्य योग्य भावात आणि गावातच मिळत असल्याने येथील मार्केट ला पण भविष्यात याचा चांगलाच फायदा होणार आहे. तसे पाहता कार्यालयीन कामकाजा व्यतिरिक्त इतर खरेदीसाठी शक्यतो फुलवळ सह परिसरातील माणूस फुलवळ ओलांडून पुढे जायला तयार नाही. कारण त्यांना समाधानकारक माल योग्य दरात येथेच मिळत असल्याने त्यांचा वेळ व होणारी आर्थिक हानी सुद्धा आटोक्यात आली आहे.

यासर्व बाबींचा सकारात्मक विचार करून ग्राम पंचायत ने आपल्या सभागृहात सदर निवेदन ठेवून चर्चा करावी , आठवडी बाजार चा ठराव घेऊन त्याबाबत च्या सर्व रीतसर परवानग्याही ग्रामपंचायत ने बरेच दिवसांपूर्वी घेतल्या आहेत. परंतु अद्यापही येथे आठवडी बाजारला सुरुवात झाली नसल्याने ग्रामस्थांच्या जनप्रतिक्रिया घेऊन प्रस्ताव मार्गी लावावा व फुलवळ येथे आठवडी बाजार लवकरात लवकर सुरू करावा अशी मागणी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *