फुलवळ जुने गावठाण ची फेरआकारणी कधी होणार..? मोदी आवास योजनेअंतर्गत अनेक घरकुल मंजूर , परंतु जुनेगावठाण चा नमुना नं. ८ च तयार नसल्याने कित्येकांना येणार अडचणी..

 

फुलवळ  ( धोंडीबा बोरगावे )

कंधार तालुक्यातील फुलवळ हे जि.प.गटाचे गाव असून येथील लोकसंख्या ही सहा हजाराच्या जवळपास आहे . फुलवळ गावाचे 1962 साली बारूळ मानार प्रकल्पाची उभारणी करतांना पुनर्वसन करण्यात आले आहे . तेंव्हा जुने गावठाणातील अनेक कुटुंबांनी नवीन गावठाणात वास्तव्य करायला सुरुवात केली परंतु आजही 200 ते 250 कुटुंब हे जुने गावठाणातच वास्तव्याला आहेत . नुकतेच मोदी आवास योजनेअंतर्गत अनेक घरकुल मंजूर , परंतु जुनेगावठाण चा नमुना नं. ८ च तयार नसल्याने कित्येकांना येणार अडचणी असल्याने फुलवळ जुने गावठाण ची फेरआकारणी कधी होणार..? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

फुलवळ ग्राम पंचायतीच्या अहवालानुसार या जुने गावठाणातील घरांची व रिकाम्या प्लॉटची नमुना नंबर आठ ला नोंद नसल्यामुळे होत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन या जुने गावठाण मधील घरे व प्लॉटची नमुना नंबर आठ ला नोंद घेऊन त्याची फेरआकारणी करावी अशी मागणी ता. २२ नोव्हेंबर २०१७ रोजी पत्रकार धोंडीबा बाबाराव बोरगावे यांनी ग्राम पंचायतीला लेखी निवेदन देऊन केली आहे , त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडून जुनेगावठाण ची फेरआकारणीला करून भोगवट्यात त्याची नोंद घ्यावी असे पत्रही ग्राम पंचायत ला येऊन जवळपास एक – दीड वर्ष झाले. परंतु अद्यापही त्यावर कसलीच प्रक्रिया ग्राम पंचायत ने सुरुवात केली नसल्याने आता घरकुल योजनेत नावे येऊनही नमुना नंबर ८ ची फेरआकारणीला नसल्याने कित्येकांना याचा फटका बसणार असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

शासनाकडून देण्यात येणाऱ्या घरकुल , शौचालय , घरगुती विद्युत जोडणी , नळ जोडणी , अशा अनेक सोयी , सुविधा थेट लाभार्थ्यांना देतांना विशेषकरून त्यांच्या घराचा किंवा प्लॉटचा नमुना नंबर आठ चा उतार सदर कागदपत्रांबरोबर जोडणे बंधनकारकच आहे . तसेच शासनाच्या एखाद्या योजनेतून एखादी शासकीय नवीन इमारत बांधकाम करायचे असेल तर सुद्धा नमुना नंबर आठ आवश्यकच आहे .

परंतु फुलवळ ग्राम पंचायतकडे जुने गावठाण चे अभिलेखाप्रमाणे नमुना नंबर आठ च्या नोंदीच नसल्यामुळे वरील पैकी कोणत्याही योजनेसाठी लाभार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागते . तर कधी कधी अशा शासकीय योजनांना मुकावेही लागते. गेले कांही दिवसांपासून नवीन गावठाण मधील प्लॉट , घरे यांचा सर्व्हे चालू असून फेरआकारणीला सुरुवात झाली मग जुनेगावठाण ची फेरआकारणी करून सामान्य माणसाची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *