रिक्षावाला कि त्याच्या रुपात भगवंत??..
कलियुगात आपल्याला कोण तारणार असेल तर ते आहे हरीनाम.. श्रीमद्भागवत आणि भगवद्गीतेत सुध्दा हेच सांगितले आहे..
भगवंत कोणी पाहिलाय का ??
माझं उत्तर आहे .. हो आणि अनेकदा ..
काल सकाळी ५ / ५ .३० च्या दरम्याने मी पुण्यात पोचणार होते.. व्होल्वोत बसल्यावर मी ड्रायव्हरला पुण्याचे स्टॉप विचारले , त्याने कात्रज , स्वारगेट , वनाज , डेक्कन ,नळस्टॉप अशी नावे सांगितली. पुण्याजवळ आल्यावर मी वनाज कि नळस्टॉपला उतरु या संभ्रमात होते कारण दोन्ही पैकी इतक्या सकाळी मला रिक्षा कुठे मिळेल हाच विचार डोक्यात होता.. हरीनाम मुखात होतच त्यामूळे काळजी कधीही आणि कशाचीही करावी लागली नाही..मी बसमधे बसल्यावर माझ्या मित्राचा रात्री ११ वाजता फोन आला , सोनल दुपारी किवा संध्याकाळी आली असतीस तर मी पिकअप केलं असतं गं. सकाळी थोडे अवघड आहे.. कदाचित हे त्याचं वाक्य भगवंताने ऐकले असेल आणि तोच स्वतः रिक्षा घेउन आला असेल..
साधारणपणे ५ . २५ ला गाडी वनाज स्टॉप ला आली.. थोडासा अंधार होता.. खुप गार होतं..रस्त्यावर फार कोणी दिसत नव्हतं.. आमच्या व्होल्वो च्या एक फुट अंतरावर एक रिक्षा थांबली होती .. जणु काही ते दादा माझीच वाट पहात होते.. हरे कृष्ण सोनल मॅम असा रिक्षातुन आवाज आला आणि मी चक्रावले.. मी हरे कृष्ण म्हटलं , दादा तुम्ही मला कसं ओळखलं ?.. अहो सोनल मॅडम तुमच्यामुळे मी हरे कृष्ण म्हणायला लागलो .. त्यांनी रिक्षा सुरु केली आणि म्हणाले वारजेत जायचे ना ??.. हे तर अजूनच शॉकींग होतं..
मी म्हटलं, तुम्हाला कसं माहीत ??.. त्यावर ते म्हणाले , ते जाऊदेत पण एक गोष्ट तुमच्याशी शेअर करतो आणि ती म्हणजे , काही वर्षे मी जुगाराच्या नादी लागलो होतो, होतं नव्हतं ते सगळं गमावुन बसलो होतो पण काही दिवसांनी तुमच्यासारख्या काही लोकांना मी वाचलं आणि ऐकलं आणि प्रामाणिकपणे रिक्षाचा धंदा करायचा ठरवला त्यामुळे सकाळ आहे म्हणुन मी तुमच्याकडुन दिढपट चार्जेस घेणार नाही किवा जास्त पैसे द्या असेही म्हणणार नाही..फक्त कष्टाचे पैसे कमावणार आणि प्रामाणिकपणे धंदा करणार.. दादा ग्रेट आहात हो तुम्ही पण तुम्ही मला कसं ओळखलं सांगा ना ??.. माझी पुस्तके वाचली का ??.. किवा तुम्ही वारजेत रहाता का ??.. त्यावर ते हसले आणि म्हणाले , इथुन पुढे रस्ता तुम्ही सांगा.. मी त्यांना घराकडे जायचा रस्ता सांगितला ..त्यांनी मला गेटपाशी सोडलं आणि प्रामाणिकपणे ८० रुपये मिटरनुसार घेतले आणि रिक्षा वळवुन निघुन गेले.. पाठमोऱ्या रिक्षाकडे मी पहात राहिले ..भगवंतानेच माझ्याकडून आईची थोडी सेवा करुन घेतली आणि सुखरूप घरी आणूनही सोडलं.. कसला त्रास नाही..माझ्या आईलाही ऑपरेशनचा कसला त्रास झाला नाही.. मला सोशल मिडीयावर कोण फॉलो करतं माहीत नाही.. रिक्षावाले दादा हे त्यातीलच एक असावेत.. दादा तुम्ही तुमचं नाव सांगितले नाही.. तुम्ही फेसबुक वर असाल तर यावर जरुर व्यक्त व्
कष्ट करा , मेहनत करा , त्याच्या जोडीला ज्याने आपल्याला हे सगळं दिलय त्याचं नाव घेउन कृतज्ञता व्यक्त करायला विसरु नका.. आपण रोज सकाळी फेसबुकवर हरीनाम घेतो यानंतर रोज रात्री झोपताना अजुन एक गोष्ट करा जी मी करते ती म्हणजे दिवसभरात आपल्याला जेजे मिळालं असेल ते भगवंताला अर्पण करा म्हणजेच काय करायचं तर त्याची आठवण करुन त्याला म्हणायचं , आज मला मिळालेलं सगळं तुझं आहे आणि तुझ्यासाठी आहे.. त्यानंतर फरक पहा…… हरे कृष्ण
सोनल गोडबोले