ॲनीव्हर्सरी गिफ्ट काय मिळालं सोनल ??

माझ्या मित्राने काल मला हा प्रश्न विचारला.. त्याला माझं आणि सचिनचं नातं माहीत आहेच आणि ते जवळपास सगळ्या मित्र मैत्रीणीना माहीत आहे..
भौतिक सुख किवा वस्तु म्हणजेच कपडे , दागिने अशा वस्तू आपल्याला बरेच जण देतात किवा अनेक नवरा बायको एकमेकांना देतात पण यातलं सचिन ने काल काहीही दिलं नाही .. मीच त्याला सांगितलं होतं , मला काहीही नको.. पण त्याने गेली २६ वर्षे जे मला दिलय ते खुपच महाग आहे .. त्याची किम्मत मी ठरवुच शकत नाही.. ” मौल्यवानही आहे..
* त्याने मला दिलेलं गिफ्ट म्हणजे मुक्तपणे जगण्यासाठी मोकळा श्वास *… हे गिफ्ट कुठल्याही दुकानात विकत मिळत नाही तर ते सचिन च्या स्वभावात आहे आणि मुक्तपणे माझी जगण्याची गरज त्याने ओळखली आणि मुक्तहस्ते त्याची माझ्यावर उधळण केली.. मोठी घरं , मोठ्या शोफर ड्रिव्हन गाड्या , महागडी फर्नीचर्स , किवा दागिने अनेक स्त्रीयांना मिळत असतील पण त्या महागड्या गोष्टीत त्या स्वतःला हव्या तशा जगत असतील का ??.. त्यांना स्वातंत्र्य असेल का ??.. त्यांना मुक्तपणे स्वतःचे निर्णय स्वतः घेता येत असतील का ??.. पाहिजे तसे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य त्यांना मिळत असेल का ??.. बऱ्याचदा ते नसतच त्याला कारणं अनेक असतील..
माझ्या जवळच्या कपलचं उदाहरण सांगते.. सॉफ्टवेअरमधे एक लाख पगार असलेली महिला म्हणते , माझा नवरा म्हणतो , सोनं , घरं यात पैसे इनव्हेस्ट करायचे नाहीत..म्हणजेच काय तर ८ तास लॅपटॉपवर डोळे फोडुन घरात पैसे आणुन तिला दागिन्याची हौसही पुरी करता येत नाही.. अशी अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती आहेत.. त्यांच्याकडे जेव्हा मी पहाते तेव्हा मला आमच्या नात्याचा अभिमान वाटतो..त्यामुळे मला त्याच्याशी कधी खोटं बोलावं लागलं नाही.. जिथे नवरा बायको मित्र होत नाहीत तिथे खोटेपणा जागा घेते.. आणि प्रत्येकवेळी खोटं बोलुन ते बाहेर जाऊ लागतात .. जेव्हा खोट्याचं खरं होतं तेव्हा भांडणं होतात आणि नाती बिनसतात.. हे चक्र थांबवायचं असेल तर नवरा बायकोने एकमेकांचे उत्तम मित्र व्हा..
सचिन ने मला मुक्तपणे उडण्याचं बळ दिलं…लैगिकतेवर लिहीण्याचं स्वातंत्र्य दिलं.. हवे ते कपडे घालण्याचं स्वातंत्र्य दिलं.. कधीही माझ्या मित्रांना घरी यायची परवानगी आहे.. मी त्यांच्या सोबत कुठेही बाहेर जाऊ शकते.. यापेक्षा महागडं आणि मौल्यवान गिफ्ट जगात कुठलही नसेल.. प्रत्येक नवरा बायकोने एकमेकांना हे गिफ्ट दिलं तर घटस्फोट होणारच नाहीत आणि वादही होणार नाहीत.. एकदा एकमेकांना स्पेस देउन तर पहा.. एकदा मुक्तपणे वावरण्याचं स्वातंत्र्य देउन तर पहा..
काल आमच्या ॲनीव्हर्सरीच्या निमित्ताने तुम्ही दिलेल्या शुभेच्छाबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते… असेच प्रेम राहुदेत..

सोनल सचिन गोडबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *