कंधार तालुका अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.यू. पी .वाघमारे तर सचिवपदी ॲड. डी. टी. देशमुख यांची बिनविरोध निवड

कंधार (ॲड सिध्दार्थ वाघमारे)
कंधार अभिवक्ता  संघाची  २०२४—२५ची  कार्यकारनी निवडण्यासाठी अभिवक्ता संघाच्या वतीने निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. आणि निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन  कंधार अभिवक्ता संघाचे माजी अध्यक्ष ॲड.शहबाज खान  व ॲड. टी . डी . वाघमारे यांच्या अधिपत्याखाली अभिवक्ता संघाची निवडणुक  घेण्यात आली. या निवडणुकीत  निवडणुक लढवणार्‍या उमेदवाराच्या विरोधात एकही उमेदवार नसल्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणात   सर्व  उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी ॲड. शहबाज खाॅन व ॲड. टी डी.वाघमारे यांनी जाहिर केले व सर्व विजयी उमेदवारांना निवडुन आल्याचे पञ दिले आहे.
           कंधार तालुका अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी ॲड.यू.पी.वाघमारे यांची तर सचिवपदी ॲड. डी . टी.देशमुख यांची आणि उपाध्यक्षपदी. ॲड.डि. एम.नीलेवाड  यांची  निवड करण्यात आली.
              कंधार  तालुका अभिवक्ता संघाच्या निवडणुकी संदर्भात दिनांक 5  फेब्रुवारी रोजी न्यायालयाच्या बार रूममध्ये निवडणूक  जाहीर करण्यात आली होती त्या अनुषंगाने दिनांक 07 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष पदासाठी दोन फॉर्म, उपाध्यक्ष  पदांसाठी दोन फॉर्म, सचिव पदांसाठी दोन फॉर्म घेण्यात आले होते  परंतु अध्यक्ष, सचिव व उपाध्यक्ष पदाचा फॉर्म उचलून घेतल्याने सदरील पदांसाठी एक एकच अर्ज आसल्यामुळे  दुपारी 02 वाजता निवडणुक निर्णय अधिकारी ॲड. शहाबाज खान  व सहाय्यक निवणूक अधिकारि ॲड. टी.डी.वाघमारे  यांच्या अध्यक्षतेखाली अभिवक्ता संघाच्या कार्यकारणी  २०२४ – २५ सालां साठी सदरील कार्यकारणीची निवड झाल्याचे  घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी  ॲड.यू. पी .वाघमारे तर सचिवपदी.ॲड. डी . टी.देशमुख यांची आणि उपाध्यक्षपदी. ॲड.डि. एम.नीलेवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

           तसेच कार्यकारिणी पुढील प्रमाणे – सहसचिव  ॲड.आय. एस.महोमद,कोषाध्यक्ष ॲड. जी.पी.गवाले, ग्रंथपाल ॲड.जे .एस. देऊळगावकर , प्रसिध्दी प्रमुख  ॲड.रवि कांबळे व ॲड.उमर शेख, महिला प्रतिनिधी ॲड. एम.सी.बडेवार (पदमवर)ॲड.सुप्रिया के उम्रजकर-ॲड. के. ऐ. कांबळे – ॲड. एन. एस. बायस .
हे सर्व उमेदवार विजयी झाल्याचे घोषीत करण्यात आले असून अभिवक्ता संघाच्या सर्व  विजयी उमेदवाराचे अभिनंदन करण्यात आले व भावी कार्यास शभेच्छा देण्यात आल्या यावेळी  कंधार अभिवक्ता संघाचे जेष्ठ विधितज्ञ ॲड.बाबुराव पुलकुंडवार, जेष्ठे विधितज्ञ व्ही. व्ही. आलाबादे, जेष्ठ विधितज्ञ जी.पी. लोहाळे, ॲड. .के.एस. क्षिरसागर, .ॲड.शिवाजीराव मोरे , ॲड. एम.जी. सोनकांबळे,ॲड. उत्तमराव पाटील लुंगारे , ॲड..ए.जी .पुरानिक, ॲड. कलीम अंसारी, अँड.एस.आय खान,  अँड.एस.एस कांबळे,अँड. बी.एन कांबळे, अँड.टी.एन शिंदे, अँड. एस.एल लुंगारे, अँड. डोंम्पले,अँड.टी.डी वाघमारे, अँड.आर.डी सोनकांबळे,अँड. सिध्दार्थ वाघमारे,अँड. सुनिल फुके,अँड. निजाम, अँड. जावेद, अँड.सचिन कांबळे,अँड.खादर बेग,अँड.युसुफ पठाण, यानी सर्व विजयी उमेदवाराचे अभिमंदन केले. तसेच विजयी उमेदवाराची वाजत गाजत मिरवणुक काढुन  फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली.विजयी उमेदवारांनी शहरातील सर्व महापुरुषाच्या  पुतळ्याना पुष्पहार घालुन आभीवाद केले. यावेळी मोठ्या प्रमाणात सर्व वकील बांधवाची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *