चतुरस्त्र व सहस्त्रावधानी – डॉ. सुदर्शन भारती

ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्याची डॉ.सुदर्शन भारती यांची अतूट बांधिलकी हा
त्यांच्या कार्याचा आधारस्तंभ आहे. त्यांचे उपक्रम शहरी-ग्रामीण शिक्षणातील दरी भरून
काढण्यावर लक्ष केंद्रित करतात, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशिल राहतात. या अशा भागात शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे स्थापन करून,शिक्षण घेत असणा-या विद्यार्थ्यांना मार्ग मोकळा करून दिला आहे.
डॉ.सुदर्शन भारती यांचे शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्य , विविध संस्थेमधील त्यांचे नेतृत्व, समाजाच्या विकासासाठी असलेला व्यापक दृष्टिकोन प्रतिबिंबित करते, चेअरमन, अध्यक्ष आणि संचालक या नात्याने त्यांची भूमिका ग्रामीण भागातील शिक्षण आणि आर्थिक कल्याणावर सकारात्मक प्रभाव निर्माण करण्याची त्यांची वचनबद्धता अधोरेखित करते.

सोबत
एक दूरदर्शी नेता म्हणून, सामाजिक बदलाची प्रेरणा ते आपल्या निस्वार्थी सेवेतून समुदायाला देतात.
डॉ. सुदर्शन भारती यांचे सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण असे सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक यात मोलाचे योगदान दिले आहे. अशी ही त्यांची दूरदृष्टी प्रतिमा वाखण्याजोगी आहे. यांच्या या कार्याचे साक्षीदार हदगाव तालुक्याच नव्हे तर पुर्ण नांदेड जिल्ह्यात ही ज्यांची ख्याती आहे असे सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात नावलौकिक असणारे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ.सुदर्शन राम भरती (पिंपरखेडकर) होय.
दलित मित्र श्री राम भारती यांचे ते पुत्र, यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1975 रोजी गावं पिंपरखेड ता. हदगाव जिल्हा नांदेड येथे झाला.

काही योगायोग असे नकळत आपल्या आयुष्यात येत असतात अश्याच योगायोगाने शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे माझा आणि सरांचा परिचय झाला. वेगवेगळ्या संधीचा सदुपयोग कसा करून घ्यायचा हे अशा सुज्ञ व्यक्तीकडून शिकायला मिळालं तर त्यात आश्चर्य वाटेलच, कुठल्याही यशस्वी पुरुषाच्या पाठीशी एक स्त्री- पत्नी, माता, बहिण खंबीरपणे उभी असतेच पण, डॉ. भारती सरांच्या पाठीशी नेहमी त्यांचे कुटुंब आणि मित्रपरिवार खंबीरपणे उभे राहिलेले मी पाहिले आहे. आयुष्यात बोटावर मोजण्यासारख्या अशा फार कमी व्यक्ती असतात की ज्या स्वतःला समाजासाठी वाहून नेणारे असतात.
डॉ. सुदर्शन भारती सरांचे शैक्षणिक कार्याबरोबरच वैद्यकीय कार्य हे प्रचंड व्याप्त आहे. त्यांच्या उत्स्फूर्तदायक कामाने व ज्ञानाच्या अवाक्याने सारे अवाक होतात. एखाद्या कामाबद्दलची जिद्द,चिकाटी,आत्मियता आणि आत्मविश्वासाने कसे पुर्ण करावे हे यांच्याकडून शिकायला मिळते. डॉ. सुदर्शन भारती सरांची ओघवती वाणी आणि स्मित हास्य खूप मधूर आहे त्यांच्यासारखे ते त्याची प्रचिती येते.

ते विविध संस्थांच्या पदावर कार्यरत आहेत.
अध्यक्ष कै. गणपत भारती वैद्यकिय व शिक्षण प्रसारक मंडळ, हदगाव, भारती कला व विज्ञान महाविधालय, हदगाव (अध्यक्ष), भारती (स्वतंत्र) उच्च माध्यमिक विधालय, हदगाव (अध्यक्ष),समर्थ विधालय, पिंपरखेड ता. हदगाव जि. नांदेड (अध्यक्ष), भारती इंग्लिश मेडियम स्कुल, पिंपरखेड (अध्यक्ष), समर्थ वस्तीगृह हदगाव (अध्यक्ष), संचालक – पिपल्स को ऑपरेटिव्ह बँक, हिंगोली (शाखा: हदगाव), संचालक – खरेदी-विक्री संघ हदगाव.
आयुष्यात अनेक वेळा सुख दुःखाची प्रसंगे त्यांच्यावर वैद्यकीय, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व अन्य स्वरूपाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना आले. धीरगंभीर्यांनी त्यांना समोरे गेले आणि त्यात यशस्वी ही झाले. आजच्या घडीला शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असताना ज्ञानाच्या दीपस्तंभाप्रमाणे संस्थेला प्रकाश देण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम निष्ठेने व शांतपणे ते करत राहतात. डॉ.भारती कुटुंबाप्रती, मित्र परिवाराप्रती आणि प्रियजणांप्रती सदैव आपुलकीने व प्रेमाने राहिले. प्रत्येक काम खंडीत न होता सातत्यपूर्ण कसे राहील याकडे लक्षित राहतात. अशी निष्ठावान आणि कार्यावर प्रेम असणारे माणसं आज अभावानेच आढळतात. गर्वहीन, अभिमानहीन आणि सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत ते स्थितप्रज्ञ, धीरगंभीर आहे हे केवळ एखाद्या संघामुळे नव्हे तर वारसा हक्काने, वंशपरंपराने त्यांच्यात आले आहे.

त्यांच्या प्रयत्नपूर्वक कार्याला नेहमी यशाची चकाकी येते
आदर्श जीवन जगणारे ध्येयनिष्ठ जपणारे, सर्वांप्रती प्रेम, आपुलकी, आदरभाव बाळगणारे व वेळाप्रसंगी मदतीचा हात पुढे करणारे डॉ. सुदर्शन भारती एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. याचबरोबर ते एक चांगला मुलगा, मित्र, वडील, बंधू आणि सहकारी आहेत त्यांच्या ॠजू स्वभावाची व कणखर बाण्याची भूमिका नेहमी स्पष्ट राहिलेली आहे.
कामाबद्दल कुठल्याच अन्य विचारसरणीचा परस्पर संबंध व संघर्ष कधीच आपल्या चेहऱ्यावर येऊ दिला नाही” सर्वांना सांभाळणे हे माझं काम आहे” असेच सदैव म्हणताना ते दिसतात.

अशा चतुरस्त्र व सहस्त्रावधानी व्यक्तीबद्दल लिहीताना शब्द ही अपुरे पडतील. डॉ. सुदर्शन भारती शतायुषी व्हावेत अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते व जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा देते.

सौ. रूचिरा शेषराव बेटकर, नांदेड.
9970774211

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *