प्रतिनीधी – माधव गोटमवाड
कंधार तालुक्यातील कागणे कोचिंग क्लासेस च्या १६ विद्यार्थ्यांनी डिसेंबर-२०२३ मध्ये झालेल्या ”राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना” परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या ‘नॅशनल मेरीट कम मिन्स स्काॅलरशीप’ (एनएमएमएस) परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.
आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शाेध घेणे तसेच त्याला बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण करता यावे यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत ही शिष्यवृत्ती याेजना राबविली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यास इयत्ता ९ वी ते १२ पर्यंत दरमहा १ हजार रुपये (वार्षिक १२ हजार रुपये) शिष्यवृत्ती देण्यात येते.
एनएमएमएस २०२३-२४ या परीक्षेत कागणे कोचिंग क्लासेस कंधार चे १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले ते खालील प्रमाणे आहेत .
रोहन कंटिराम मुसळे ,कु मानसी उमेश बिजले, राठोड स्वप्नील बाळासाहेब , दिव्यांशा गौतम कांबळे ,राठोड सुरज भगवान ,शेख हाजी इसाक ,मुसळे कांचन सुभाष ,राजलक्ष्मी वैभव कुरुडे ,बंदुके ओंकार शंकर ,हेंडगे राजनंदिनी गोविंद ,गायकवाड राजश्री विलास ,जाधव पियूष विठ्ठल ,गुट्टे साक्षी माणिक ,मुंडे श्रुटी गंगाधर , प्रतिक कलवले ,प्रविण केंद्रे या सर्व एनएमएमएस-२०२४ या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे कै. पांडुरंग पाटील कागणे सेवाभावी संस्था आजमवाडी चे अध्यक्ष परमेश्वर कागणे सर, संस्थेचे उपाध्यक्ष भगवान कंधारे, सचिव आंतेश्वर कागणे सर , सहसचिव मिराताई मुसळे इन्स्टिट्यूट चे सहकारी गजानन माणिककामे सर, माधव गोटमवाड सर, सचिन गायकवाड सर, विकास चव्हाण सर, अयोध्या कागणे मॅडम यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.