कंधार : प्रतिनिधी
तालुक्यातील गुंटूर येथील प्रशासनाने बौद्ध मूर्ती हटवल्या प्रकरणीचा तिढा अध्यापही कायमच आहे.प्रशासनाने गंभीर दखल घेतली नसल्यामुळे अखेर गुंटूरच्या साखळी उपोषणातील चार महिलांनी शुक्रवार पासून कंधार तहसील समोर अमरण उपोषण चालू केले आहे. परिणामी उपोषणकर्त्या महिलांची तब्येत ढासळत चालली असून प्रशासणाने याकडे गंभीर लक्ष देणे गरजेचे आहे.
गुंटूर येथील बौद्ध मूर्ती प्रशासनाने हटवल्या नंतर गुंटूरच्या महिला आक्रमक होऊन कंधार तहसील समोर 2 तारखेपासून साखळी उपोषण सुरू केले आहे . या संदर्भात जिल्हाधिकारी आणी कंधार तहसील प्रशासनाला सविस्तर माहिती सादर करण्यात आली होती. दरम्यान गुंटूर येथील काही नागरिकांनी कंधार येथील उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी 14 जनावर कंधार पोलीस स्टेशन येथे ॲट्रॉसीटी दाखल करण्यात आली आहे.
परिणामी गुंटूर येथील सरपंचाचा कारनामा उघडकीस आला आहे. सदरील जमीन बौद्ध समाजाला मिळू नये याकरिता पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे गुंटूर येथील स्मशानभूमी गट क्रमांक 162 मधील जागेच्या ठरावात फसवणूक करून सही घेतल्याबद्दल गुंटूर येथील जि प शाळेचे मुख्याध्यापक श्री आनंद नागोराव सोनकांबळे यांनी थेट कंधार पोलीस स्टेशन येथे सरपंचा विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की,26 जानेवारी रोजी ग्रामपंचायत येथे बोलावून सचिव म्हणून कामकाज पाहण्यास तोंडी सांगीतले.
या संदर्भात गट विकास अधिकारी यांचा कुठलाही आदेश नव्हता. व तिथे परिपत्रक वाचण्यास दिले. तसेच ठरावामध्ये गुंटूर येथील 162 जागे बद्दल कोणताही ठराव मंजूर करण्यात आलेला नाही. शाळेचे कार्यालयीन कामकाज करत असताना गुंटूर येथील सरपंच योगेश उपे हे शाळेत येऊन माझी फसवणूक करून जिल्हाधिकारी यांना 5 फेब्रुवारी 2024 चा ठराव वाचन न करू देता माझी विश्वासाने सही घेतली आहे. गुंटूर ग्रामपंचायतने जिल्हाधिकारी यांना सादर केलेला ठराव मी लिहिलेला नाही, माझ्या समक्ष त्या ठरावावर कोणतीही स्वाक्षरी केली नाही. दिलेल्या ठराव पूर्णपणे खोटा असून माझी फसवणूक केली आहे. त्यामुळे योग्य ती कारवाई करण्यात यावी या संदर्भात कंधार पोलीसात गुंटूरच्या जि प शाळेच्या मुख्याध्याप आनंद सोनकांबळे यांनी
(ता ९ रोजी ) तक्रार अर्ज दाखल करून त्याची प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार यांना देण्यात आहे.
त्यामुळे गुंटूरच्या सरपंचावर ॲट्रॉसीटी नंतर आता दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
परिणामी गुंटूर प्रकरणाच्या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे अखेर गुंटूरच्या महिला तीव्र होऊन साखळी उपोषणातील महिला मनुबाई सोनकांबळे, रुक्मिणीबाई सोनकांबळे, सुवर्णाबाई सोनकांबळे, वचलाबाई सोनकांबळे, या चार महिलांनी (ता ९ शुक्रवार)पासुन कंधार तहसील समोर अमरण उपोषण चालू करण्यात आले.
उपोषणातील काही महिला वयोवृद्ध असल्यामुळे त्यांची तब्येत ढासळत चालली असून हवामान खात्याच्या बदलावामुळे थंडीत ह्या महिला तोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा लढा चालू असल्याचा पवित्रा गुंटूर च्या महिलांनी घेतल्यामुळे प्रशासनाने मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. उपोषणकर्त्याचे गांभीर्य लक्षात घेता.डॉक्टरांची टीम त्यांची त्यांना वेळोवेळी चेक अप करत आहेत. यामुळे अमरण उपोषणकर्त्या जीव धोक्यात सापडला आहे. जर उपोषणकर्त्या महिलांचे बरे वाईट झाल्यास त्यास प्रशासनच जिम्मेदार असल्याचे उपोषणकर्त्या महिलांनी सांगीतले.त्यामुळे आता प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देणे गरजेचे आहे.