हग या शब्दाचा मराठी अर्थ घ्या नाहीतर इंग्रजी घ्या.. दोन्हीमधे रीलीफ आहेच ना .. पण एक रोजचाच आणि दुसरा ??
दुसराही रोजच साजरा करायला हवा खरं तर..
आमच्याकडे तर सकाळी सकाळी हग ऐवजी मेथीपुराण सुरु झालं यार..
सचिनचं म्हणणं आहे , मला मेथीची भाजी जमत नाही आणि आज मेथीची भाजी भाकरी असा माझा प्लॅन आधीच झाला होता.. मेथी आवडत नाही की माझ्या हातची भाजी आवडत नाही हे २६ वर्षात आजही समजले नाही…
मग यात मिठी राहिली ना राव.. मेथी कडू लागते .. त्यापेक्षां पराठे कर.. तु ना बोअर करतेस यार असे प्रेमळ संवाद मिठी दिनी सुरु झाले .. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे रे ??..
उद्या किस डे ला मी तर कारल्याची भाजी करायचा प्लॅन केला आहे…. हेहेहे
शेवटी त्याला म्हटलं , सचिन तुझ्या हाताला खुप चांगली चव आहे .. तुच कर ना भाजी.. त्यावर तो म्हणाला , नको त्यापेक्षा तुच केलेली भाजी मी खाईन.. नवऱ्याला कशा भाज्या खायला लावायच्या याचं हे उत्तम उदाहरण आहे..
सखीनो न भांडता .. न चिडचिड करता नवरोबाला मस्त मिठी मारा आणि कारलं , मेथी , शेपु अशा न आवडणाऱ्या भाज्या हळूच ताटात सरकवा.. हेल्दी हेल्दी खाल्याने आणि आपल्या जिभेवर साखर ठेवल्याने नातीही हेल्दी रहातात त्या मेथीसारखी..
कशी वाटली आयडीयाची कल्पना ??.. चांगल्या गोष्टीसाठी ब्लॅकमेल करा पण फसवणूक, मानसिक शारिरीक टॉर्चर अजिबात नको हा.. आपल्या नवऱ्यासारखा भारी माणूस या जगात नाही.. हा जसा माझा अनुभव आहे तसा तुमचाही असेलच..
मेथी भाजी सोबत जवस चटणी , कारळ्याची चटणी loveyu म्हणत वाढा आणि बीट कोशींबीर ??.. त्यात तर आयर्न आहे त्यामुळे हीमोग्लोबिन चांगलं रहातं मग काय ??.. सखीनो कोशींबीरीला रोमॅन्टिक फोडणी द्या आणि वॅलेंटाइन च्या दिवशी अनेक फॅंटसीजने त्याला आनंदी करायला अजिबात विसरु नका..
मेथी पुराण , कारली पुराण , शेपु पुराण या सगळ्याला रोमान्स , प्रेम , या सगळ्याची जोड देउन आपण आपला संसार सुखी करुच शकतो..
जरा हटके.. काय मग सखीनो होवुन जाऊदेत मेथी पुराण प्लस हग…
सोनल गोडबोले